लोकमत न्यूज नेटवर्कबडनेरा : ‘लोकमत’द्वारे राबविला जाणारा ‘स्पर्धा परीक्षा लेखमाला’ हा उपक्रम विद्यार्थी घडविणारा आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने उज्ज्वल भविष्यासाठी स्पर्धा परीक्षांकडे कल वाढवावा, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी किरण कुलकर्णी यांनी केले.येथील आरडीआयके व के.डी. महाविद्यालयात ‘लोकमतच्या स्पर्धा परीक्षा लेखमाला’ मार्गदर्शन कार्यक्रम बुधवारी पार पडला. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर लोकमतचे उपमहाव्यवस्थापक सुशांत दांडगे, आरडीआयकेचे प्राचार्य राजेश देशमुख, पोलीस निरीक्षक दिलीपसिंह पाटील उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी विचलित न होता लक्ष्य निर्धारित करून त्या दिशेने वाटचाल केल्यास अनेक संधी मिळतात, विद्यार्थ्यांना कोणत्याही क्षेत्रात करिअर घडविता येते. आवडीचे क्षेत्र निवडल्यास यशप्राप्तीचा मार्ग सुकर होतो. स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून यश मिळविणे अधिक सोपे आहे, असेही कुळकर्णी म्हणाले.‘लोकमत’वृत्तपत्रात प्रकाशित स्पर्धा परीक्षा लेखमालेची माहिती सुशांत दांडगे यांनी दिली. आपल्या आई-वडिलांचे स्वप्न साकार करण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्न करावेत. नवनवीन तंत्रज्ञान पुढे येत आहे. त्याचा लाभ स्पर्धा परीक्षार्थ्यांनी घ्यावा, असे मत पोलीस निरीक्षक दिलीप पाटील यांनी मांडले. प्राचार्य देशमुख म्हणाले, प्रत्येक विद्यार्थ्याने लोेकमतमध्ये प्रकाशित स्पर्धा परीक्षा लेखमालेचे वाचन केल्यास त्याचा भविष्यात निश्चितच लाभ होईल.उपस्थितांचा परिचय लोकमतचे सहायक व्यवस्थापक (वितरण) रवींद्र खांडे यांनी करून दिला. प्रास्ताविक विष्णू गढीकर, संचालन वैशाली भाकरे तर आभार प्रदर्शन अतुल पाटील यांनी केले. याकार्यक्रमाला महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाºयांची लाक्षनीय उपस्थिती होती. यावेळी विद्यार्थ्यांनी आपली मते देखील व्यक्त करीत ‘लोकमत’च्या उपक्रमाची प्रशंसा केली.प्राध्यापकांनीही केली प्रशंसा‘लोकमत’मध्ये दररोज प्रकाशित होणारी ‘स्पर्धा परीक्षा लेखमाला’ यूपीएससी, एमपीएससी तसेच अन्य स्पर्धा परीक्षार्थ्यांसाठी उपयुक्त असल्याचे मत कार्यक्रमाला उपस्थित प्राध्यापकांनी व्यक्त केले. त्यांनी लोकमतच्या या उपक्रमाची प्रशंसा केली. विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा लोकमतच्या या उपक्रमाची चर्चा होती.
‘स्पर्धा परीक्षा लेखमाला’ फायद्याची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2017 23:59 IST
‘लोकमत’द्वारे राबविला जाणारा ‘स्पर्धा परीक्षा लेखमाला’ हा उपक्रम विद्यार्थी घडविणारा आहे.
‘स्पर्धा परीक्षा लेखमाला’ फायद्याची
ठळक मुद्देलोकमतचा उपक्रम : आरडीआयके महाविद्यालयात तज्ज्ञांचे मार्गदर्शन