शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

स्पर्धा परीक्षार्र्थींची धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 22:23 IST

शासनाने सरकारी नोकरभरतीबाबत लादलेल्या जाचक अटी-शर्तींच्या विरोधात शुक्रवारी जिल्हाभरातील बेरोजगार तरुण जिल्हा कचेरीवर धडकले.

ठळक मुद्देहजारो उमेदवारांचा उत्स्फूर्त सहभाग : नोकरकपातीचा निर्णय जाचक

आॅनलाईन लोकमतअमरावती : शासनाने सरकारी नोकरभरतीबाबत लादलेल्या जाचक अटी-शर्तींच्या विरोधात शुक्रवारी जिल्हाभरातील बेरोजगार तरुण जिल्हा कचेरीवर धडकले. यावेळी कठोरा नाक्याहून शेकडोंचा मोर्चा निघाला. जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांच्यामार्फत शासनाकडे निवेदन देत, जाचक अटी दूर करण्याची मागणी त्यांनी केली.स्पर्धा परीक्षेसाठी रात्रंदिवस अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांची भरमसाठी शुल्क घेऊन शासनाने गळचेपी केली आहे. एकीकडे बेरोजगारी व त्यासोबतच युवकांची शैक्षणिक पात्रता वाढत आहे. राज्यात १ लाख ७० हजार व केंद्रात ४ लाख २० हजार पदे रिक्त आहेत. त्याबाबत कुठलेही धोरण शासनाकडे नाही. परीक्षा शुल्कदेखील जीएसटीसह घेतले जात आहे. सर्व घटकांतील उमेदवारांना एकसमान शुल्क व चलान भरण्याची मागणी यावेळी युवकांनी केली. अपंग, सैनिक, विधवा शुल्कातून वगळावे, साबांविच्या कनिष्ठ अभियंत्यांची सरळ सेवा भरती त्वरित करावी, पोलीस भरतीच्या संख्येत वाढ करावी, सरकारी नोकºयांच्या कपातीचे धोरण रद्द करावे, अभियोग्यता चाचणीनुसार पात्र शिक्षक उमेदवारांची भरती करावी आदी मागण्याही करण्यात आल्या. कोणत्याही संघटनेच्या नेतृत्वाशिवाय निघालेल्या मोर्चात सारंग जवखेडे, अक्षय नरगडे, सुशांत पोरे, सिद्धार्थ तायडे, चंदन तिडके, हर्षद धांडे, रोहित कोणटके यांच्या संयोजनात शेकडो विद्यार्थी सहभागी झाले.घोषवाक्यांनी वेधले लक्षमोर्चातील विद्यार्थ्यांनी विविध लक्षवेधी घोषवाक्याचे फलक हातात घेऊन प्रशासनाचे लक्ष वेधले. ‘आमचा हक्क - आमचा अधिकार’, ‘कमी पदामुळे विद्यार्थी त्रस्त - शासन मात्र आपल्या धुंदीत मस्त’, ‘नोकरी आमच्या हक्काची - नाही कुणाच्या बाप्पाची’ असे घोषवाक्य हातात घेत उमेदवारांनी जिल्हा कचेरी परिसर घोषणांनी दणाणून गेला होता.