शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

समिती शोधणार शौचालय घोटाळ्याची पाळेमुळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2020 05:01 IST

बडनेरातील वैयक्तिक शौचालयाच्या ७५ लाखांच्या तीन नस्ती नऊ अधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षरी व शिक्क््यांसह अंतिम मान्यतेसाठी आयुक्त प्रशांत रोडे यांच्याकडे सादर झाल्यानंतर या प्रकरणाचे बिंग फुटले. त्यामुळे बनावट स्वाक्षरीद्वारे किंवा इतर कोणत्याही मार्गाने कंत्राटदारास निधी देण्यात आल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या सर्व प्रकरणांची सखोल चौकशी होणे महत्त्वाचे आहे.

ठळक मुद्देबनावट नस्तीचे प्रकरण : महापालिका आयुक्तांद्वारे १५ दिवसांची डेडलाईन

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : बडनेरा झोनमधील ७५ लाखांच्या बनावट नस्ती प्रकरणानंतर स्वच्छ महाराष्ट्र अभियान झालेल्या इतर कामांमध्ये गैरमार्गाचा अवलंब झाल्याची माहिती प्रशासनाला मिळाली. त्या अनुषंगाने सोमवारी रात्री उशिरा उपायुक्तांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय समिती आयुक्तांनी गठित केलेली आहे. या समितीद्वारे अभियानातील अनियमिततेची पाळेमुळे शोधली जातील. याबाबत आयुक्तांनी १५ दिवसांत अहवाल मागितला आहे.बडनेरातील वैयक्तिक शौचालयाच्या ७५ लाखांच्या तीन नस्ती नऊ अधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षरी व शिक्क््यांसह अंतिम मान्यतेसाठी आयुक्त प्रशांत रोडे यांच्याकडे सादर झाल्यानंतर या प्रकरणाचे बिंग फुटले. त्यामुळे बनावट स्वाक्षरीद्वारे किंवा इतर कोणत्याही मार्गाने कंत्राटदारास निधी देण्यात आल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या सर्व प्रकरणांची सखोल चौकशी होणे महत्त्वाचे आहे. या दृष्टीने आयुक्तांनी सर्व झोनचे सहायक आयुक्त, वैद्यकीय आरोग्य अधिकारी (स्वच्छता) व मुख्य लेखाधिकाऱ्यांना या अभियानातून वैयक्तिक शौचालयावर किती निधी खर्च झाला, याचा अहवाल मागितला आहे. त्याचदरम्यान या अभियानातील अनियमतिता व घोटाळ्याची पाळेमुळे शोधण्याकरिता त्रिसदस्यीय समितीचे गठण आयुक्तांनी केले. अध्यक्षपदी उपायुक्त सुरेश पाटील, तर सदस्य म्हणून शहर अभियंता रवींद्र पवार व झोन क्र. २ चे उपअभियंता सुहास चव्हाण यांचा समितीत समावेश आहे.ज्या नागरिकांच्या घरी शौचालयाची सुविधा नाही, अशा नागरिकांना घरी वैयक्तिक शौचालय, सामूहिक शौचालय, व सार्वजनिक शौचालय बांधकामाकरिता राज्य शासनाने वेळोवेळी निधी उपलब्ध केला आहे. महापालिका क्षेत्रातही या अभियानाद्वारे सर्व झोनमध्ये सन २०१५-१६ पासून मोठ्या प्रमाणात कामे झालीत. त्यावर लाभार्थींना १७ हजार रुपये प्रतिशौचालय निधी देण्यात आला होता. यामध्ये काहींनी कामे केली. काहींनी अनुदान घेतले, पण प्रत्यक्षात काहीच केले नाही. यावर पर्याय या अर्थाने कंत्राटदाराला ही कामे देण्यात आली. या कामांमध्येही गैरप्रकार झाल्याची शक्यता बडनेरा बनावट नस्ती प्रकरणाने बळावली आहे. या सर्व प्रकारांची पाळेमुळे समिती निखंदून काढणार आहे.बांधकाम न करता सादर देयक शोधणारस्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) अंतर्गत महापालिकेला देण्यात आलेले वैयक्तिक लक्ष्यांक व त्या अनुषंगाने प्रत्यक्षात नागरिकांकडून बांधण्यात आलेली शौचालये तसेच कंत्राटदारांकडून बांधण्यात आलेल्या शौचालयांची संख्या शोधण्यात येणार आहे. याशिवाय कंत्राटदारामार्फत अन्य झोनमध्येही बांधलेल्या वैयक्तिक शौचालयांची संख्या, वैयक्तिक शौचालय बांधण्याचे कार्यादेश, कंत्राटदाराने बांधकाम न करता देयक सादर केले असल्यास अशा देयकांची तपासणी आता करण्यात येणार आहे.संबंधितांवर जबाबदारी निश्चित करणारकंत्राटदाराने बांधकाम न करता देयक सादर केले असल्यास अशा देयकांची तपासणी समिती करेल व ही प्रक्रिया करताना प्रशासकीय कार्यप्रणालीचा व अनुदानाचा गैरवापर करण्यात आला असल्यास त्याचा समितीद्वारे शोध घेण्यात येईल. या प्रकरणांमध्ये सहभागी अधिकारी व कर्मचाºयांची चौकशी करून जबाबदारी निश्चित करण्यात येणार आहे. या विषयीचा अहवाल समितीला दोन आठवड्यांमध्ये महापालिका आयुक्तांना सादर करावा लागणार आहे.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिका