अमरावती : जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांवर उपचार करणारी कोविड रुग्णालये, नॉनकोविड रुग्णालये व कोविड केअर सेंटर या ठिकाणी ऑक्सिजनचा सुरळीत पुरवठा होण्याच्या दृष्टीने संनियंत्रण समिती गठित करण्यात आली आहेत. जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी शुक्रवारी याबाबत आदेश जारी केला.
राज्य शासनाने वैद्यकीय वापरासाठी ८० टक्के ऑक्सिजन पुरवठा बंधनकारक केला आहे. आरोग्य विभागाने यासंदर्भातील अधिसूचना काढली आहे. त्यामुळे ऑक्सिजन पुरवठ्याच्या संनियंत्रणासाठी जिल्हास्तरावरही समिती गठित करण्यात आली आहे. अन्न व औषधे प्रशासनाचे सहायक आयुक्त, महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेचे विभागीय व्यवस्थापक यांचा या समितीत समावेश करण्यात आला आहे. या समितीने अमरावतीच्या वल्लभ गॅसेस व अन्य ऑक्सिजन वितरकांनी संपर्क ठेवावा तसेच रुग्ण व रुग्णालयांची परिस्थिती पाहून वितरण नियमित ठेवावे. जिल्ह्यात कुठेही अनावश्यक वितरण होऊ नये. वल्लभ गॅसेस यांनीही समितीशी समन्वय ठेवून वितरण करावे. समितीने सोपविण्यात आलेल्या कामकाजानुसार कार्यवाही करून त्याबाबतचा अहवाल वेळोवेळी सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
---------------------------