शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
5
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
6
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
7
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
8
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
9
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
10
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
11
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
12
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
13
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
14
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
15
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
16
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
17
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
18
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
19
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
20
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा

आयुक्तांची खुर्ची उड्डाणपुलास टांगली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 23:12 IST

शहरातील रखडलेल्या कामांना आयुक्त हेमंत पवार हेच जबाबदार असल्याचा आरोप करत युवा स्वाभिमान संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांची खुर्ची दालनाबाहेर काढली. ती उड्डाणपुलाला टांगण्यात आली.

ठळक मुद्देयुवा स्वाभिमानचा ‘गनिमी कावा’ : प्रशासनप्रमुखांचा निषेध

आॅनलाईन लोकमतअमरावती : शहरातील रखडलेल्या कामांना आयुक्त हेमंत पवार हेच जबाबदार असल्याचा आरोप करत युवा स्वाभिमान संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांची खुर्ची दालनाबाहेर काढली. ती उड्डाणपुलाला टांगण्यात आली. मंगळवारी दुपारी झालेल्या या आंदोलनामुळे महापालिका आवारात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर ती खुर्ची शहर कोतवालीने जप्त केली व आयुक्तांच्या दालनात आणून ठेवली. लोकप्रतिनिधींशी त्यांचे वागणे सौजन्यपूर्ण नसल्याचा आरोप करत युवा स्वाभिमानने पवार यांच्या खुर्चीवर लत्ताप्रहार केला.पीएम आवास योजना, रमाई आवास योजना, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, मालमत्ता मूल्यांकन प्रकल्प, छत्री तलावाचे सौंदर्यीकरण आणि इतर विकासकामे आयुक्तांच्या कचखाऊ वृत्तीने रखडलीत. अस्वच्छतेलाही तेच जबाबदार असल्याचा आरोप आ. रवि राणाप्रणीत युवा स्वाभिमान संघटनेने केला. पवार यांचा निषेध नोंदवत युवा स्वाभिमानचे कार्यकर्ते मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास आयुक्तांच्या दालनात शिरले व त्यांनी खुर्ची बाहेर काढून राजकमल चौकातील उड्डाणपुलाला टांगली. यावेळी त्यांनी निदर्शने केली. आयुक्त पवार आंदोलनावेळी दालनात उपस्थित नव्हते. आयुक्तांच्या दालनासमोर चार सुरक्षा रक्षक असताना युवा स्वाभिमान कार्यकर्त्यांना कुणीही अडविले नाही. खुर्चीला दोर बांधून ती उड्डाणपुलावरून काही अंतरावर लोंबकळत सोडण्यात आली. या आंदोलनाची माहिती मिळताच शहर कोतवाली पोलीस घटनास्थळी पोहोचले. या आंदोलनापूर्वी आ. राणा आणि आयुक्तांमध्ये शाब्दिक चकमक झाल्याची माहिती आहे.

अधिकाऱ्यांना बैठकीची सूचनाआ. रवि राणा दुपारी १.३० वाजता विविध विषयांवर आढावा बैठक घेणार आहेत, अशी सूचना राणा यांच्या कार्यालयाकडून मनपा प्रशासनाला देण्यात आली. आयुक्तांच्या अनुपस्थितीत उपायुक्तांसह सर्वच विभागप्रमुख त्यासाठी आयुक्तांच्या दालनाशेजारी असलेल्या कॉन्फरंस हॉलमध्ये एकत्र आले. मात्र, प्रत्यक्षात राणा बैठकीसाठी आलेच नाहीत. अधिकाऱ्यांना सभागृहात ठेवून युवा स्वाभिमानच्या अभिजित देशमुख, शैलेंद्र कस्तुरे व अन्य जणांनी आयुक्तांची खुर्ची पळविली. दरम्यान आयुक्त हेमंत पवार हे १५ दिवस रजेवर गेले आहेत.कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हे दाखलमहापालिका आयुक्तांच्या दालनातून त्यांची खुर्ची पळविणाऱ्या युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांविरुद्ध कार्यालय अधीक्षक दुर्गादास मिसाळ यांच्या तक्रारीनुसार कोतवाली पोलिसांनी आरोपी अनूप अग्रवाल, अभिजित देशमुख, नितीन सोळंके, मंगेश कोकाटे, रौनक किटकुले, निलेश शहा, श्याम नरवणे, अमर काळमेघ, संगीता काळबांडे यांच्याविरुद्ध भादंविच्या कलम ४४८, ४२७, १४७, १४९, सह कलम १३५ कायद्यान्वये गुन्हा नोंदविला.