शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

दिलासादायक, कोरोना रुग्णांचे ६५ टक्के बेड शिल्लक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:14 IST

अमरावती : राज्यात कोरोना संक्रमित रुग्ण सर्वाधिक अमरावती जिल्ह्यात आढळून आल्याची नोंद झाली. मात्र, सरकारी आणि खासगी रुग्णालयात कोरोना ...

अमरावती : राज्यात कोरोना संक्रमित रुग्ण सर्वाधिक अमरावती जिल्ह्यात आढळून आल्याची नोंद झाली. मात्र, सरकारी आणि खासगी रुग्णालयात कोरोना रुग्णांचे तब्बल ६५ टक्के बेड रिकामे असल्याचा अहवाल जिल्हा आरोग्य प्रशासनाने शासनाकडे पाठविला आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांच्या रिकाम्या बेडसंख्या बघता ही बाब जिल्हावासीयांसाठी दिलासादायक मानली जात आहे.

आरोग्य यंत्रणेच्या निकषानुसार कोरोना संक्रमित रुग्णांवर उपचारासाठी तीन प्रकारच्या रुग्णालयांची व्यवस्था करण्यात आली आहे. यात डेडिकेडट कोविड हॉस्पिटल, डेडिकेडट कोविड आरोग्य केंद्र व कोविड केअर सेंटर असा समावेश आहे. खासगी आणि सरकारी दवाखान्यात ही सुविधा जिल्हा प्रशासनाच्या नियंत्रणात पुरविली जात आहे. खासगी, सरकारी दवाखान्यात आयसीयू, ऑक्सिजन, व्हेन्टिलेटर आणि जनरल अशा चार प्रकारच्या बेडवर कोराेना रुग्णांना उपचार सुरू आहे. त्याअनुषंगाने २६ डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये १,७४१ बेड असून, ९४८ बेड शिल्लक आहेत. ४ डेडिकेटेड कोविड आरोग्य केंद्रात १४५ बेड असून, ६३ बेड शिल्लक आहेत. तसेच १५ कोविड केअर सेंटरमध्ये १२०५ बेड असून,९९८ बेड शिल्लक आहे. त्यामुळे कोरोना संक्रमित रुग्ण अथवा त्यांच्या नातेवाईकांना आता बेड नाही म्हणून उपचार मिळत नाही, ही ओरड होणार नाही, असे शिल्लक बेड संख्येवरून स्पष्ट होत आहे.

जिल्ह्यातील १५ कोविड केअर केंद्रात एकूण १,२०५ ची बेडसंख्या आहे. त्यापैकी २०७ बेडवर रुग्ण उपचार घेत आहेत. ९९८ बेड शिल्लक आहेत. चार डेडिकेटेड कोविड आरोग्य केंद्रात १४५ बेड क्षमता असून, ८२ बेडवर रुग्ण उपचार घेत आहेत. ६३ बेड आजही शिल्लक आहेत. २६ डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये १,७४१ बेड आहे. आयसीयूचे ४९१ पैकी २२१ बेड शिल्लक आहेत. ऑक्सिजनचे ७१७ पैकी ३८५ बेड शिल्लक आहे. व्हेंटिलेटरचे १७८ पैकी १३७ बेड शिल्लक आहेत.

-----------------------

२६ डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलची बेड क्षमता

अचलपूर ट्रामा (५०), अंबादेवी हॉस्पिटल (६५), ॲक्झॉन (१५०), बख्तार (२८), बेस्ट (५०), भामकर अचलपूर (४१), सीटी हॉस्पिटल (४५), दयासागर (६०), दुर्वांकुर (२०), एकता दर्यापूर (६०), गेटलाईफ (६०), गाेडे (६०), हिलटॉप (६०), किटुकले (२१), महावीर (४०), आर्चिड (३०), पीडीएमसी (१०५), रिम्स (९८), श्रीपाद कोविड (५६), श्री साई (१९), सनराईज (३५), सुपर स्पेशालिटी (४५०), वरूड हॉस्पिटल (२५), यादगिरे हॉस्पिटल (१७), झेनिथ (१०५)

------------------------

चार डेडिकेटेड कोविड आरोग्य केंद्रातील बेडची संख्या

दर्यापूर एसडीएच (२५), मोर्शी एसडीएच (२०), तिवसा ट्रामा सेंटर (५०), नांदगाव खंडेश्र्वर ट्रामा केअर सेंटर (५०)

--------------------------------

१५ कोविड केअर केंद्राची बेड संख्या

अचलपूूर - ६५

अंजनगाव सुर्जी (पांढरी) १५०

बुरघाट- १००

चांदूर बाजार- ४०

चांदूर रेल्वे - १००

चिखलदरा- ५०

दर्यापूर सामदा- ५०

धामणगाव रेल्वे - १६०

धारणी-६०

अमरावती होमगार्ड- ६०

मोर्शी- ६५

नांदगाव प्रियदर्शनी - ५०

विदर्भ महाविद्यालय- १३०

वलगाव गाडगेबाबा - ७५

वरूड बेनाेडा- ६०

------------------

कोविड रुग्णालयात शिल्लक बेड

आयसीयू: २२१

ऑक्सिजन : ३८५

व्हेनिंलेटर: १३७

जनरल : ३४२

-------------

गेल्या आठवड्यापासून कोरोना संक्रमितांची संख्या चिंताजनक नाही. रुग्णालयातही बेड शिल्लक आहे. डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल, डेडिकेटेड कोविड आरोग्य केंद्र व कोविड केअर सेंटरमध्ये बेड मिळत नाही, अशी ओरड नाही.

- श्यामसुंदर निकम, जिल्हा शल्यचिकित्सक, अमरावती.