बंदचा आदेश : एक्साईजने मागितला अभिप्राय धामणगाव रेल्वे : सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय व राज्य महामार्गालगतची मद्यविक्री दुकाने व बियरबार बंदचा आदेश जारी केल्याने नागपूर-औरंगाबाद या मार्गावरील तालुक्यातील १२ बियरबारवर संक्रांत येणार आहे़ यासंदर्भातील राज्य उत्पादन शुल्क विभागाने(एक्साईज) राज्य रस्ते विकास महामंडळाला अभिप्राय मागितला आहे़ सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय व राज्य महामार्गावरील मद्यविक्रीचे दुकाने तसेच बियरबार बंद करण्याचे आदेश राज्य सरकारला दिलेत याविषयी शासनाने राज्य उत्पादन शुल्क विभागाला पत्रव्यवहार करून संबंधित रस्त्यावरील १०० मीटर व ५०० मीटर अंतराच्या आततील दुकानांची माहिती मागितली आहे़ विशेषत: वर्धा जिल्ह्यात दारूबंदी असल्याचा लाभ घेत पुलगावची हद्द संपताच धामणगाव तालुक्याच्या वर्धा नदी काठापासून नागपूर-औरंगाबाद मार्गावरील विटाळा, बोरगाव धांदे, भातकुली गावानजीक १२ बियरबार व तीन देशी दारूची दुकाने आहे़सर्वाेच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे संबंधित रस्त्यावरील मद्यविक्री व बियरबार दुकानासंदर्भातील माहिती गोळा करणे राज्य उत्पादन शुल्क विभागाने सुरू केले आहे़ तिवसा, कुऱ्हा, धामणगाव, बाभुळगाव, यवतमाळ या २३७ राज्य मार्गावरील दारू दुकानाच्या परवान्याची माहिती गोळा करणे सुरू केले़ मद्याचे चिन्ह व मद्य उपलब्धीच्या जाहिरातीतून काढण्याचे आदेश एक्सिस विभागाने संचालकांना दिले. सर्वोच्च न्यायालयाची अंमलबजावणी करण्यासाठी रस्ते विकास महामंडळाकडून नागपूर-औरंगाबाद व धामणगाव तालुक्यातून जाणाऱ्या राज्य महामार्गाच्या रूंदीच्या सीमारेषेची माहिती मागितली आहे़ तद्नंतर हद्दीत येणाऱ्या बियरबार व दुकानासंदर्भातील निर्णय घेतला जाईल़ - मोहन पाटील, निरीक्षक, उत्पादन शुल्क विभाग, चांदूररेल्वे
बियर बारवर येणार संक्रांत !
By admin | Updated: December 26, 2016 00:38 IST