शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पक्षात परत या! आप्तांच्या माध्यमातून आमदारांना आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2022 05:00 IST

राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आमदारांनी बंड पुकारल्यानंतर शिवसेनेत उभी फूट पडली आहे. ‘शिवसेना की शिंदेसेना?’ असे चित्र उभे झाल्याच्या पार्श्वभूमीवर बुधवारी मुंबईच्या शिवसेना भवनातून जिल्ह्यातील लोकभावना जाणून घेण्यात आल्या. ज्या जिल्ह्यात शिवसेनेचे आमदार आहेत, अशा जिल्ह्यांतील सेना पदाधिकाऱ्यांद्वारे आमदारांचे नातेवाईक, आप्तांच्या संपर्कातून शिवसेनेत परत या, अशी विनंती करण्यात येत आहे. जिल्ह्यात सेनेचा एकही आमदार नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे असा सत्तासंघर्षाचा नवा राजकीय डाव उभा ठाकला आहे. एकनाथ शिंदे यांच्या कंपूत सेनेचे ४० पेक्षा जास्त आमदार असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे शिवसेेनेची ‘ग्राऊंड लेव्हल’ पकड मजबूत राहावी व या घटनेच्या अनुषंगाने शिवसैनिकांच्या व्यथा, वेदना  जाणून घ्याव्यात, यासाठी सेना भवनातून आढावा बैठक घेण्यात आल्याची माहिती आहे. राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आमदारांनी बंड पुकारल्यानंतर शिवसेनेत उभी फूट पडली आहे. ‘शिवसेना की शिंदेसेना?’ असे चित्र उभे झाल्याच्या पार्श्वभूमीवर बुधवारी मुंबईच्या शिवसेना भवनातून जिल्ह्यातील लोकभावना जाणून घेण्यात आल्या. ज्या जिल्ह्यात शिवसेनेचे आमदार आहेत, अशा जिल्ह्यांतील सेना पदाधिकाऱ्यांद्वारे आमदारांचे नातेवाईक, आप्तांच्या संपर्कातून शिवसेनेत परत या, अशी विनंती करण्यात येत आहे. जिल्ह्यात सेनेचा एकही आमदार नाही. तथापि,  वरिष्ठांकडून शिवसैनिकांसह जिल्ह्यातील लोकभावना जाणून घेतल्याची माहिती आहे. अमरावती जिल्ह्यात शिवसेनेचा एकही आमदार नाही. त्यामुळे येथे फारशी राजकीय घडामोडीची शक्यता नाही, असे स्थानिक शिवसेना पदाधिकाऱ्यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

कोणत्याही आमदारांशी संपर्क साधण्याबाबत सेनाभवनातून निरोप नाही. मात्र, जिल्ह्यातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेण्यात आला.- सुनील खराटे, जिल्हाप्रमुख, शिवसेना

जिल्ह्यात शिवसेनेचा एकही आमदार नाही. सेना भवनातून तशी कोणतीही विचारणा नाही. मात्र, जिल्ह्यात सतर्क राहण्याचे कळविले आहे.- पराग गुडधे, महानगर प्रमुख, शिवसेना

पदाधिकाऱ्यांना गृह जिल्ह्यात थांबण्याचे आदेश आहेत. कोणत्याही आमदारांना संपर्क अथवा मोबाईलने संवाद साधण्याचे कळविले नाही.- राजेश वानखडे, जिल्हाप्रमुख, शिवसेना

 

टॅग्स :Shiv Senaशिवसेना