शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेल"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
2
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
3
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
4
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
5
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
6
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
7
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
8
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
9
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
10
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
11
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
12
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
13
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
14
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
15
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
16
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
17
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
18
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
19
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
20
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची ’श्वानार्थ’ धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2017 22:31 IST

एखादे श्वान अपघातामुळे वा इतर कारणांनी जर्जर होऊन रस्त्याने विव्हळत पडले असेल, तर दु:ख व्यक्त करण्यापलीकडे कुणी काही करत नाही.

ठळक मुद्देविधायक कार्य : स्वखर्चातून उपचार, २०० प्राण्यांचे वाचविले प्राण

धीरेंद्र चाकोलकर ।आॅनलाईन लोकमतअमरावती : एखादे श्वान अपघातामुळे वा इतर कारणांनी जर्जर होऊन रस्त्याने विव्हळत पडले असेल, तर दु:ख व्यक्त करण्यापलीकडे कुणी काही करत नाही. मात्र, विद्यार्थिदशेतील काही युवक अशा श्वानांना वैद्यकीय उपचारापासून त्यांना सुरक्षित परिसर मिळवून देण्यापर्यंत धडपडतात.अमरावती शहरातील वसा या सामाजिक संस्थेने मागील एक वर्षापासून हा उपक्रम हाती घेतला आहे. वसाने सर्वप्रथम वाचविलेली कुत्री ही नागपूर येथे भांडेवाडीत प्राणी निवारा केंद्रात स्वखर्चाने रवानगी केली. आजही ती तेथे उपचार घेत आहे. श्वानप्रेमींचा कॉल आल्यानंतर बहुतांश महाविद्यालयीन विद्यार्थीच असलेले संस्थेचे प्रशिक्षित सदस्य तेथे पोहोचून श्वानाला पशू चिकित्सालयात नेतात. वैद्यकीय उपचार मिळाल्यानंतर धडपड असते पुनर्वसनाची. या श्वानांना पूर्वीच्या परिसरातील लोक स्वीकारत असतील, तर तेथेच त्यांच्याकरिता तंदुरुस्त होईपर्यंत भोजन उपलब्ध करून देण्यासाठी प्रबोधन केले जाते. वसाने केलेल्या शुश्रुषेच्या यादीत साप, अजगर, माकड, सायाळ, खार असे ८३ प्राणी व २०० हून अधिक प्राणी आहेत. या उपक्रमात मुकेश वाघमारे, गणेश अकर्ते, भूषण सायंके, रीतेश हंगरे, अभि पुल्लजवार, ऋग्वेद देशमुख, मोहन मालवे, अक्षय क्षीरसागर, सूरज वºहेकर, राहुल सुखदेवे आदींचे सक्रिय योगदान असते.उभी होऊ शकते यंत्रणापशुप्रेमापोटी अनेक जण या क्षेत्रात आहेत. ते पूर्णवेळ कार्यकर्ते आहेत. मात्र, रोजगार नसल्याने खर्चाला मर्यादा येतात. त्यामुळे संपूर्ण नवीन यंत्रणा याबाबत उभी राहू शकते. याशिवाय प्राणी रुग्णवाहिका, पशुुचिकित्सालयात क्ष-किरण यंत्रणा, गॅस अ‍ॅनेस्थेशियाची मागणीही यानिमित्ताने पुढे आली आहे.कोणत्याही क्षणी मदतयाबाबत वसाचे शुभम सायंके यांचा अनुभव बराच बोलका आहे. तो उत्तमसरा येथे राहतो. वडील प्राथमिक शिक्षक आहेत. तेच या कामात आर्थिक मदत करतात. अर्जंट कॉलवर एखादेवेळी उपाशीपोटीदेखील गावावरून यावे लागते. रात्री उशीर हा ठरलेला असतो.पॉकेटमनीतून उपचारसरकारी पशुचिकित्सालयाची सुविधा २४ तास उपलब्ध नसते. अशावेळी खासगी पशुचिकित्सकांकडून महागडे उपचार करून घेतले जातात. याकरिता कुठून पैसे मिळण्याची शाश्वती नसल्याने घरून मिळणारा पॉकेटमनी वाचवून किंवा आई-वडिलांकडून घेऊन हा सत्कार्याचा वसा हे विद्यार्थी चालवीत आहेत.