शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
5
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
6
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
7
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
8
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
9
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
10
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
11
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
12
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
13
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
14
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
15
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
16
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
17
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
18
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
19
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
20
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?

हॉटेलसमोरील पार्किंगमुळे कलेक्टर कॉलनीवासी आक्रमक

By admin | Updated: February 23, 2016 00:08 IST

शहरातील प्रख्यात हॉटेलजवळील पार्किंगमुळे निर्माण होणाऱ्या वाहतुकीच्या कोंडीमुळे रविवारी कलेक्टर कॉलनीवासी आक्रमक झाले.

पोलिसांनी बजावली नोटीस : वाहतुकीस अडथळा निर्माण करणारी कार जप्त अमरावती : शहरातील प्रख्यात हॉटेलजवळील पार्किंगमुळे निर्माण होणाऱ्या वाहतुकीच्या कोंडीमुळे रविवारी कलेक्टर कॉलनीवासी आक्रमक झाले. रात्री शेकडो वाहने रस्त्यावर उभी असल्यामुळे स्थानिक रहिवाशांनी रोष व्यक्त केला. त्यामुळे पोलिसांना पाचारण करावे लागले. शहर कोतवाली पोलिसांनी कलेक्टर कॉलनीमार्गावर उभी असलेली कार जप्त केली असून हॉटेल संचालकाला नोटीस बजावली आहे. कॅम्प रोड स्थित या हॉटेलमध्ये रविवारी रात्री लग्न समारंभाचा कार्यक्रम सुरु होता. या कार्यक्रमासाठी आलेल्या नागरिकांनी हॉटेलसमोरील पार्कीगमध्ये वाहने उभी केली होती. तसेच अपुऱ्या पार्कींग व्यवस्थेमुळे अधिकाअधिक वाहने कलेक्टर कॉलनी मार्गावर उभी होती. रस्त्यावरच वाहने उभी असल्यामुळे कलेक्टर कॉलनीतील रहिवाशांना घरी जाण्यासाठी मार्गाच उरला नव्हता. रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्यामुळे शेकडो रहिवाशांमध्ये रोष उफाळून आला. याबाबत काही रहिवाश्यांनी पोलीस नियंत्रण कक्षाला फोनवर माहिती दिली. रात्री ११.३० वाजताच्या सुमारास शहर कोतवाली ठाणेदार आर.के.शर्मा हॉटेलसमोर पोहोचले. त्यांनी पार्कींगमधील वाहनांची कोंडी सोडविण्याचे प्रयत्न केले. मात्र, लग्नसमारंभात मग्न असलेले वाहनधारक बाहेर आलेच नाही. याबाबत रहिवाशांनी रोष व्यक्त केल्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. नागरिक वाहनांची तोडफोड करण्याच्या बेतात असताना पोलिसांनी हॉटेल संचालकासोबत चर्चा केली. मात्र, ही समस्या नेहमीचीच असल्यामुळे कलेक्टर कॉलनीवासी रोष व्यक्त केला.लग्नसमारंभाच्या कार्यक्रमात आलेल्या नागरिकांनी वाहने कलेक्टर कॉलनी मार्गावर लावले होते. स्थानिक रहिशावाशांना त्यांची वाहने नेता येत नव्हती. यासंदर्भात हॉटेल संचालकाला नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच एक कार सुध्दा जप्त करण्यात आली. - आर.के.शर्मा, पोलीस निरीक्षक,