शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

ओला-सुका कचऱ्याची विल्हेवाट एकत्रच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2018 22:58 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : ओला व सुका कचरा वेगवेगळा ठेवा, अशी ध्वनिक्षेपकाद्वारे जनजागृती करणाऱ्या महापालिकेचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला ...

ठळक मुद्देमहापालिकेचा भोंगळ कारभार : नागरिक सुधारले, प्रशासन झोपेतच

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : ओला व सुका कचरा वेगवेगळा ठेवा, अशी ध्वनिक्षेपकाद्वारे जनजागृती करणाऱ्या महापालिकेचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. ‘लोका सांगे ब्रम्हज्ञान...’ असा महापालिकेचा कारभार सद्यस्थितीत शहरात सुरू आहे. नागरिक ओला व सुका कचरा वेगवेगळा टाकतात. मात्र, महापालिकेची वाहने पुन्हा दोन्ही कचरा एकत्रित घेऊन जात असल्याचा धक्कादायक प्रकार सुरू आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियान सुरू केले. स्वच्छतेवर विशेष भर देण्यासाठी देशभरात जनजागृती केली जात आहे. इंटरनेवर अ‍ॅप तयार करून अस्वच्छतेच्या तक्रारीची सोय केली. स्वच्छतेविषयी शासन गांभीर्याने विचार करीत असतानाही ही महापालिका मात्र दुर्लक्ष करीत आहे. शहरात रोगराईचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. शहरात डेंग्यूने उच्छाद याशिवाय डासांच्या प्रकोपाने अमरावतीकरांची झोप उडाली आहे. जिकडे-तिकडे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. इतके मोठे संकट अमरावतीकरांसमोर असताना महापालिका प्रशासन झोपेचे सोंग घेत आहे. शहराच्या स्वच्छतेचे कामकाज पाहणाºया महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून प्रत्येक प्रभाग व वॉर्डात स्वच्छता कर्मचारी कार्यरत आहेत. कचरा गोळा करण्यासाठी घंटीकटला भिरभिरत आहेत. ध्वनिक्षेपकाद्वारे सुका व ओला कचरा वेगवेगळा गोळा करण्याचे नागरिकांना सांगण्यात येते. त्या अनुषंगाने नागरिक वेगळेवेगळ्या खोक्यात कचरा टाकतात. मात्र, महापालिकेच्या घंटीकटल्यात सुका व ओला कचरा वेगळे ठेवण्याची सोयच नसल्याने तो एकत्रच वाहून नेला जातो. परिणामी नागरिकांचे परिश्रम व शासनाची जनजागृती व्यर्थ ठरत संताप शहरात उफाळून आला आहे.सातुर्णा, नवाथेनगरात हाच प्रकारसातुर्णा स्थित प्रसादनगर, मेहेरबाबा कॉलनी, सिद्धिविनायक कॉलनीत घंटीकटल्याद्वारे कचरा गोळा केला जातो. मात्र, ओला व सुका कचरा एकत्रित घंटीकटल्यात टाकला जात आहे. याशिवाय नवाथेनगरात घंटीकटला नियमित येतच नाही. येथेसुद्धा घंटीकटल्यात ओला व सुका कचरा एकत्रितच टाकला जात आहे. कित्येक दिवसांपासून हा प्रकार सुरू आहे.ओला व सुका कचरा वेगवेगळा ठेवण्यासंबंधी महापालिका घंटीकटल्यातील ध्वनिक्षेपकाद्वारे सांगितले जाते. मात्र, दोन्ही कचरा घंटीकटल्यात एकत्र नेला जातो. महापालिकेने हा काय प्रकार चालविला आहे?पी.आर.पाटील, नागरिक.स्वच्छ भारत अभियान राबविणारी महापालिकेचेच स्वच्छतेकडे दुर्लक्ष आहे. नाल्या तुंबल्या आहेत. खुल्या प्लॉटमध्ये झाडे वाढली आहेत. कचरा उचलताना योग्य पद्धत नाही.- राजेश जगताप, नागरिक.