निर्णय : प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांचे आदेशअमरावती : सध्या हिमालयात बर्फवृष्टी तसेच मध्यप्रदेशात थंडीची लाट आहे. त्यामुळे तेथील थंड वारे विदर्भासह राज्यभरात वाहत आहेत. परिणामी शहरासह जिल्ह्यात कडाक्याची थंडीची लाट पसरली असल्याने जिल्हा परिषदेच्या सकाळच्या सत्रात भरणाऱ्या सर्व शाळांच्या वेळापत्रकात बदल करण्याचा निर्णय प्राथमिक शिक्षणाधिकारी एस.एम.पानझाडे यांनी शुक्रवारी घेतला आहे. दोन दिवसांपासून शहरासह जिल्ह्यात थंडीचा जोर वाढला आहे. विद्यार्थ्यांचे आरोग्य जपण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेतल्याचे आदेशात म्हटले आहे. त्यामुळे एरवी सकाळी ६.४५ वाजता भरणाऱ्या शाळा आता सकाळी ८.३० वाजता भरणार आहेत. वाताचा, दम्याचा त्रास वाढला! अमरावती : आरटीई कायद्यानुसार अभ्यास तासिकेचा वेळ पूर्ण होईपर्यंत शालेय कामकाज करावे, असे निर्देश सुद्धा सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे. शिक्षण विभागाच्या यानिर्णयामुळे कडाक्याच्या थंडीतही शाळेत जाणाऱ्या लहान मुलांना मोठा दिलासा मिळणार आहे.जिल्हा गारठल्याने वृद्धांना संधीवाताचा त्रास वाढतो. दम्याने बाधित रूग्णांचा दमाही यादिवसांत उफाळून येतो. अर्धांगवायूचा धोकाही या दिवसांत काळजी घेणे गरजेचे आहे.दोन वर्षांत यंदा तापमानाचा निचांकजम्मू-कश्मिरसह हिमालयावर बर्फवृष्टी होत असून तेथील शीतवारे महाराष्ट्राच्या दिशेने येत आहेत. परिणामी या थंड वाऱ्यामुळे विदर्भात थंडीची लाट परसली आहे. मागील दोन वर्षांतील जानेवारी महिन्यातील तापमानाचा आढावा घेतला असता यंदा तापमानाने निचांक गाठला आहे. पुढील दोन ते तीन दिवस ही थंडीची लाट कायम राहण्याचे संकेत हवामानतज्ज्ञ अनिल बंड यांनी दिले आहे. शुक्रवारी श्रीशिवाजी कृषी महाविद्यालातील हवामान विभागाने घेतलेल्या नोंदींमध्ये शहरात किमान २७ तर कमाल ७.५ डिग्री सेल्सीअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. मागील दोन वर्षांत जानेवारी महिन्यातील तापमानाचा अंदाजात यंदाचे तापमानाने निचांक गाठल्याचे निदर्शनास येत आहे. सर्वात कमी तापमानात २९ जानेवारी २०१४ रोजी कमाल तापमान ७.५ असल्याची नोंद झाली होती. त्यानंतर २०१५ मध्ये ९ डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून यंदा किमान तापमान ८.५ पर्यत घसरले आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळी होऊ लागले आहे.
थंडीची लाट; शाळेच्या वेळा बदलल्या
By admin | Updated: January 14, 2017 00:08 IST