शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
4
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
5
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
6
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
7
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
8
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
9
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
10
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
11
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
12
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
13
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
14
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
15
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
16
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
17
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
18
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
19
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
20
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
Daily Top 2Weekly Top 5

परतवाड्यात कोल्ड स्टोेरेज, जिनिंग प्रेसिंगचा प्रस्ताव

By admin | Updated: July 31, 2016 23:58 IST

दि विदर्भ को-आॅपरेटिव्ह फेडरेशनच्या कोट्यवधी रूपये किमतीच्या सहा एकर जागेवर शेतकऱ्यांसाठी कोल्ड स्टोरेज ...

कोट्यवधींची जागा पडून : राजेंद्र शिंगणेंकडून फेडरेशनच्या जागेची पाहणीनरेंद्र जावरे परतवाडादि विदर्भ को-आॅपरेटिव्ह फेडरेशनच्या कोट्यवधी रूपये किमतीच्या सहा एकर जागेवर शेतकऱ्यांसाठी कोल्ड स्टोरेज आणि अत्याधुनिक जिनिंग प्रेसिंग साकारण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. त्यासंदर्भात शनिवारी फेडरेशनचे अध्यक्ष तथा माजीमंत्री राजेंद्र शिंगणे यांनी या जागेची पाहणी केली. विदर्भ को-आॅपरेटिव्ह फेडरेशनची दोन दिवसीय बैठक चिखलदरा येथे आयोजित करण्यात आली होती. त्यासाठी शनिवारी अध्यक्ष राजेंद्र शिंगणे, उपाध्यक्ष सुभाष धोटे, अचलपूर बाजार समितीचे सभापती अजय पाटील, पद्मा भडांगे, सुनील केदार, सुरेश देशपांडे, जयंत बैरागडे, ययाती नाईक, संतोषकुमार कोरपे, अरविंद पोरेट्टीवार, सुहास तिडके, दिलीप काळे, व्यवस्थापक एस.हरिबाबू, मीना मोहितकर, विलास निस्ताने आदी २१ संचालक व अधिकारी उपस्थित होते.राजेंद्र शिंगणे यांना राष्ट्रवादी पक्षासंदर्भात छेडले असता, ते म्हणाले, नुकतीच पुण्याला राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक झाली. त्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीवर चर्चा करण्यात आली. तसेच पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी मेळावे घेण्याचे सुचविण्यात आले. भाजपचे शासन पाच वर्षांचा कालावधी पूर्ण करणार काय, या प्रश्नाच्या उत्तरादाखल शिंगणेनी केवळ स्मितहास्य करून वेळ मारून नेली. मात्र, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीला पूर्ण ताकदीने लागणार असल्याचे सूतोवाच त्यांनी यावेळी केले. -तर शेतकऱ्यांना होणार फायदा चिखलदरा येथे आयोजित विदर्भ फेडरेशनच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी जाताना फेडरेशनचे अध्यक्ष राजेंद्र शिंगणेंसह इतर संचालकांनी सहा एकर जागेची पाहणी केली. परिसरात कोल्ड स्टोरेज व आधुनिक उपकरणांनी युक्त जिनिंग-प्रेसिंग सुरू करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आल्याचे शिंगणे यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले. पुढील आठवड्यात तो प्रस्ताव येण्याची अपेक्षा त्यांनी वर्तविली. येथे कोल्ड स्टोरेज झाल्यास शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा संभवतो.हैद्राबाद, केरळात जातो संत्राअचलपूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात संत्रा उत्पादन घेतले जाते. सोबतच केळी, डाळिंब, भाजीपाला आणि कडधान्याचा समावेश आहे. मात्र येथील संत्रा उत्पादकांसह इतर शेतपिकांसाठी कोल्ड स्टोरेजची सोय नाही. परिणामी लाखमोलाने पिकविलेले पीक अत्यल्प दरात व्यापाऱ्यांना विकावे लागते. दुसरीकडे विदर्भ मार्केटिंग फेडरेशनची सहा एकर जागा नुसती पडून आहे. सन २००४ पासून या जागेचा वापर नाही. या पडीक जागेचा योग्य उपयोग व्हावा, अशी परिसरातील शेतकऱ्यांची मागणी आहे.परतवाडा येथील सहा एकर जागेवर कोल्ड स्टोरेज व आधुनिक पद्धतीचे तंत्रज्ञानाने युुक्त असे अद्ययावत जिनिंग-प्रेसिंग सुरू करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. लवकरच त्यावर अंमलबजावणी होईल.- राजेंद्र शिंगणे,अध्यक्ष, दि.विदर्भ फेडरेशन अचलपूर तालुक्यात कोल्ड स्टोरेज व जिनिंग-प्रेसिंग झाल्यास शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल. त्यासाठी सहा एकर जागा वापरण्यात येईल. शेतकऱ्यांच्या अडचणी दूर होतील. - अजय टवलारकर,संचालक, बाजार समिती