शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

‘त्या’ कोचिंग क्लासेसचे संचालक अनुदानित शाळेत सेवारत

By admin | Updated: February 9, 2016 00:09 IST

अनुदानित विद्यालयात शिकविणाऱ्या शिक्षकांना शिकवणी वर्ग घेण्याची अनुमती नसतानाही त्यांनी शिकवणी वर्ग घेऊन विद्यार्थ्यांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केले.

विद्यार्थ्यांची सुरक्षा वाऱ्यावर : रिअल-एबल कोचिंग क्लासमधील प्रकारअमरावती : अनुदानित विद्यालयात शिकविणाऱ्या शिक्षकांना शिकवणी वर्ग घेण्याची अनुमती नसतानाही त्यांनी शिकवणी वर्ग घेऊन विद्यार्थ्यांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केले. हा धक्कादायक प्रकार सोमवारी राजापेठ परिसरातील रियल-एबल या शिकवणी वर्गाच्या इमारतीचे रेलिंग तुटून आठ विद्यार्थी पहिल्या माळ्यावरून खाली कोसळून जखमी झाल्यावर उघडकीस आला. राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राजापेठ स्पोर्टिंग क्लबनजीक शैलेंद्र सलुजा यांची इमारत आहे. त्यांच्या इमारतीमध्ये रियल-एबल टेस्ट सिरीजचे शिकवणी वर्ग आहेत. या शिकवणीवर्गांची जबाबदारी शिक्षक योगेश विरुळकर व अजय ठाकरे यांच्याकडे आहे. सोमवारी या शिकवणी वर्गातील आठ विद्यार्थी गॅलरीतील रेलिंगचे कठडे तुटल्याने पहिल्या माळ्यावरून खाली कोसळून जखमी झाले. या घटनेमुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. लोखंडी कठड्याखालील भागात टिनाचे शेड असल्यामुळे विद्यार्थी आधी टिनाच्या शेडवर आदळले आणि त्यानंतर ते खाली कोसळले. परिणामी गंभीर घटना टळली. मात्र, या घटनेमुळे खासगी शिकवणी वर्गातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच या शिकवणी वर्गात शिकविणारे शिक्षक हे शासन अनुदानित विद्यालयात विद्यार्थ्यांना शिकवत असल्याची धक्कादायक माहिती विश्वसनिय सूत्रांनी दिली आहे.शिक्षकांची चौकशी सुरूअमरावती : शिकवणीवर्ग घेणारे योगेश विरुळकर राजापेठ ठाण्याजवळ असणाऱ्या भारतीय बॉईज शाळेत शिकवत आहेत. अजय ठाकरे हे यवतमाळ येथील एका आश्रमशाळेवर शिकवत असल्याची माहिती आहे. या अनुषंगाने राजापेठ पोलिसांनी शिकवणी वर्ग घेणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले असून पुढील चौकशी सुरू आहे. त्यातच शिक्षणाधिकारी कार्यालया मार्फत याप्रकरणी चौकशी होणार असल्याची माहिती माध्यमिकचे शिक्षणाधिकारी सी.आर. राठोड यांनी 'लोकमत'शी बोलताना दिली. याबाबत शिक्षक योगेश विरुळकर यांच्याशी वारंवार संपर्क केला असता होऊ शकला नाही. जिल्ह्यात ठिकठिकाणी खासगी शिकवणी घेण्यात येतात. मात्र, तेथे शिकविणारे शिक्षक हे अनुदानित शाळांमधील कर्मचारी आहेत का, याकडे कोणीही लक्ष देत नाही. त्यामुळे अशांवर नियंत्रण कोणाचे, असा प्रश्न आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केल्याचे रियल-एबल टेस्ट सिरीजमधील घटनेमुळे निदर्शनास आले आहे.