शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
2
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
3
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
4
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
5
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
6
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
7
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
8
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
9
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
10
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
11
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
12
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
13
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
14
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
15
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
16
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
17
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
18
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
19
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
20
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा

ज्येष्ठांच्या लसीकरणाला को-विन ॲपचा खोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:13 IST

अमरावती : सध्या ज्येष्ठांसह सहव्याधी असणाऱ्या ४५ वर्षांवरील नागरिकांचेही लसीकरण सुरू आहे. या व्यक्तींनी डॉक्टरचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक ...

अमरावती : सध्या ज्येष्ठांसह सहव्याधी असणाऱ्या ४५ वर्षांवरील नागरिकांचेही लसीकरण सुरू आहे. या व्यक्तींनी डॉक्टरचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असल्याचे महपालिकेच्या आरोग्य यंत्रणेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तीन दिवसांत ५८० नागरिकांना लसीकरण करण्यात आले. दरम्यान चवथ्या दिवशीही को-विन ॲपचा खोडा कायम होता.

प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेत नोंदणीकृत रुग्णालये, केंद्र सरकारच्या आरोग्य योजनेत नोंदणीकृत रुग्णालये तसेच राज्य शासनाच्या आरोग्य विमा योजनेत नोंदणीकृत रुग्णालये अशा योजनांमध्ये नोंदणीकृत असलेल्या आठ खासगी रुग्णालयात शासकीय निकषानुसार जागा, लस साठवणुकीची सोय, आवश्यक परिचारिका व इतर मनुष्यबळ असल्यास याठिकाणी कोरोना लसीकरण सेंटर निश्चित करण्यात येऊन गुरुवारपासून सुरू करण्यात आले. दरम्यान, महापौर चेतन गावंडे यांनी बुधवारी पीडीएमसी व डेंटल कॉलेजमधील लसीकरण केंद्राला भेट देऊन पाहणी केली. ज्येष्ठांच्या लसीकरणास सुरुवात करण्यात आली आली. त्यात ६० वर्षांपेक्षा अधिक वयोगटातील नागरिक, तसेच सहव्याधी (को-मॉर्बेडिटी) असणारे ४५ ते ५९ वर्ष वयाच्या नागरिकांचे लसीकरण होत आहे.

बॉक्स

को-मॉर्बेडिटी रुग्णांना प्रमाणपत्र अनिवार्य

को-मॉर्बेडिटीमध्ये पल्मनरी आर्चरी हायपरटेन्शन आणि हायपरटेन्शन, डायबेटीज ऑन ट्रिटमेंट, अंजायना आणि हायपरटेन्शन, डायबेटीज ऑन ट्रिटमेंट व इतर आजारांचा समावेश आहे. केंद्र सरकारमार्फत वैद्यकीय सेवा देणाऱ्या नोंदणीकृत व्यावसायिक यांच्याकडून घ्यावयाच्या प्रमाणपत्राचा नमुना निश्चित करण्यात आलेल्या नमुन्यात प्रमाणपत्र अपलोड करणे बंधनकारक आहे.

बॉक्स

लसीकरण लाभार्थ्यांची नोंदणी करताना ओपन स्लॉटमध्ये लाभार्थी स्वत:चा मोबाईल नंबर ‘कोविन. जीओव्ही.इन’ या वेबसाईटवर भरून येणाऱ्या ओटीपीनुसार नोंदणी करून लसीकरणाची वेळ व दिनांक स्वत: निश्चित करू शकता. याशिवाय रिझर्व्ह स्लॉटमध्ये स्वत:हून नोंदणी करणे शक्य नाही, असे लाभार्थी महापालिकेने स्थापन केलेल्या बुथवर आपली नोंदणी करून लस घेऊ शकतात.

बॉक्स

ही कागदपत्रे अनिवार्य

लसीकरणासाठी ६० वर्षांवरील नागरिकांनी आधारकार्ड, पॅनकार्ड, कार्यालयीन, निवडणूक ओळखपत्र इत्यादी वयाबाबतच्या योग्य पुराव्याची कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे सहव्याधी असणाऱ्या नागरिकांनी वयाच्या पुराव्यासोबतच वैद्यकीय सेवा देणाऱ्या नोंदणीकृत व्यावसायिकाकडून विहीत नमुन्यात प्रमाणित केलेले प्रमाणपत्र लसीकरण केंद्र ठिकाणी दाखविणे आवश्यक आहे.

बॉक्स

खासगीत २५० रुपये डोज

महापालिकेच्या रुग्णालयात प्रत्येक डोज मोफत देण्यात येईल. केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेत नोंदणीकृत रुग्णालये, सीव्हीसी नोंदणीकृत रुग्णालयात लस घेण्यासाठी प्रतिलाभार्थी २५० रुपये प्रतिडोज शुल्क आकारण्यात येत आहे. पहिला डोज घेतल्यानंतर लाभार्थ्याने २८ ते ४२ दिवस अंतरात दुसरा डोज घेणे बंधनकारक आहे.