शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

सहा अवैध सावकारांवर सहकार विभागाचे धाडसत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2018 21:46 IST

शहरातील सहा अवैध सावकारांवर मंगळवारी सहकार व पणन विभागाच्या पथकाने एकाच वेळा धाडी टाकल्या. उशिरापर्यंत सुरू असलेल्या या कारवाईत शेकडो कोरे धनादेशासह कोट्यवधींच्या व्यवहाराची कागदपत्रे जप्त केलीत. एकाचवेळी सहा सावकारांवर धाड टाकण्याची ही जिल्ह्यातील पहिलीच मोठी कारवाई आहे.

ठळक मुद्देआक्षेपार्ह दस्तऐवज सील : शेकडो धनादेशासह करोडोंच्या व्यवहारांच्या कागदपत्राचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहरातील सहा अवैध सावकारांवर मंगळवारी सहकार व पणन विभागाच्या पथकाने एकाच वेळा धाडी टाकल्या. उशिरापर्यंत सुरू असलेल्या या कारवाईत शेकडो कोरे धनादेशासह कोट्यवधींच्या व्यवहाराची कागदपत्रे जप्त केलीत. एकाचवेळी सहा सावकारांवर धाड टाकण्याची ही जिल्ह्यातील पहिलीच मोठी कारवाई आहे.सहायक निबंधक कार्यालयात शहरातील अवैध सावकारीविरुद्ध तक्रारी प्राप्त होत्या. त्याअनुषंगाने जिल्हा उपनिबंधक संदीप जाधव यांच्या मार्गदर्शनात सहा सहायक निबंधकांच्या पथकाने एकाचवेळी शहरातील अवैध सहा सावकारांकडे धाडी टाकल्या. यामध्ये कंवरनगरातील आंनद बुधलानी, दस्तुरनगरातील अंजली तरडेजा (बुधलानी), सत्यकृपा कॉलनीतील सुनील पंत, गाडगे नगरातील राजेंद्र चौधरी व मुदलीयार नगरातील मुरलीधर बांगडे यांचा समावेश आहे. धाडसत्र सहायक निबंधक आर.डी पालेकर, के.पी.धोपे, स्वाती गुडधे, आर.पी. सुने, ए.एस.उल्हे व आर.एम.मदार यांच्या नेतृत्वात व सहकार व पणनचे प्रत्येकी चार कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत राबविण्यात आले. प्रत्येक पथकात दोन पोलीस कर्मचारी व दोन पंचांचा सहभाग होता. पंचासमक्ष आक्षेपार्ह कागदपत्रे सील करून संबंधित कार्यालयाच्या सुपूर्द केली. या कागदपत्रांची पाहणी करून काही प्रकरणात एफआयआर व काही प्रकरणांत महाराष्ट्र सावकारी अधिनियम २०१४ च्या अन्वये कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सहकार विभागाने दिली.आक्षेपार्ह कागदपत्रे सीलया धाडसत्रात शेकडो कोरे धनादेश, व्याज नमूद असणाºया चिठ्या, खरेदी खत, गहाणखत, इसार पावती आदी आक्षेपार्ह व्यवहाराचे कागदपत्र पंचासमक्ष जप्त करीत सील करण्यात आले. या कागदपत्रे पडताळणीनंतर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती सहायक निबंधक के.पी.धोपे यांनी दिली.प्राप्त तक्रारींच्या आधारे सहा अवैध सावकारांकडे धाडसत्र राबविले. आक्षेपार्ह कागदपत्रे सील करण्यात आली. फसवणूक टाळण्यासाठी नागरिकांनी परवानाधारक सावकारांशीच व्यवहार करावा.- संदीप जाधव, जिल्हा उपनिबंधक, अमरावती