बॉक्स
बालकांनाही अस्थमा
बालकांना आधी सर्दी-खोकला होतो. मग दम लागतो. असा स्थितीत थंड वातावरण, पावसात भिजणे, थंड पदार्थ टाळणे, उग्र वासापासून लहान मुलांना दूर ठेवावे, असे उपाय करावे लागत असल्याची माहिती बालरोगतज्ज्ञ डॉ. धीरज कंठाळे यांनी दिली.
--
ही घ्या काळजी
ज्यांना दमा आहे त्यांनी आधीपासूनच थंड वातावरणात जाऊ नये, आपल्याला डॉक्टरांनी दिलेली औषधी कायम जवळ बाळगावी, ज्यांना पंप किंवा नेब्युलायझर देण्यात आले आहे त्यांनी ते सतत जवळ ठेवावे. संसर्ग होणार नाही, याची काळजी घ्यावी.
--
पावसाळी हवामानात काळजी घ्या (कोट)
या काळात सूर्यप्रकाश कमी असल्याने अनेक संसर्ग वाढतात. ज्यांना दम्याचा त्रास आहे, अशांनी आपली औषधी आणि पंप जवळ ठेवावेत. योग्य वेळी पंप न मिळाल्यास त्याचा परिणाम दम्याचा त्रास वाढण्यात होतो.
- डॉ. धीरज कंठाळे, अर्जूननगर, अमरावती