शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

ढगाळ वातावरण, तापमान घटले

By admin | Updated: May 4, 2015 00:28 IST

काही दिवसांपूर्वी तापमान ४५ अंशांवर पोहोचले होते. आता आकाशात ढग जमा होत असल्याने तापमानात चढउतार ...

८ मे नंतर पावसाची शक्यता : उकाड्यापासून दिलासा अमरावती : काही दिवसांपूर्वी तापमान ४५ अंशांवर पोहोचले होते. आता आकाशात ढग जमा होत असल्याने तापमानात चढउतार जाणवत आहे. त्यामुळे तापमानात २ अंशांनी घट झाली असून नागरिकांना उन्हाच्या तप्त झळांपासून थोडा दिलासा मिळाला आहे. ८ मे नंतर पुन्हा पावसाची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तविली आहे. उन्हाळा सुरु झाल्यापासून अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे सुरुवातीला वातावरणात थोडाफार गारवा निर्माण झाला होता. मार्च महिन्यात फारसा उन्हाचा प्रभाव जाणवला नाही. त्यातच एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने तापमानात चढउतार कायम होता. मात्र, एप्रिल महिन्याच्या शेवटच्या दिवसांत तापमान ४० ते ४४ डिग्री सेल्सिअसवर पोहोचल्याने उन्हाचा तडाखा जाणवला. आता मे महिन्याच्या सुरुवातीलाच ढग आणि उन्हाचा खेळ सुरु झाल्याने नागरिकांना तापमानापासून थोडा दिलासा मिळाला आहे. नेपाळमध्ये भूकंप झाला. त्यानंतर पावसानेही हजेरी लावली. तेथील हवामानाचा प्रभाव विदर्भातही जाणवत आहे. नेपाळमधील ढग वाऱ्याच्या दिशेने विदर्भाकडे आले आहेत. त्यामुळे विदर्भातही ऊन सावलीचा खेळ सुरू झाला आहे. मे महिन्यात तापमान ४२ ते ४५ डिग्री सेल्सिअसदरम्यान राहण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तविली आहे. त्यातच ८ मे नंतर पावसाचे वातावरणसुध्दा निर्माण होण्याचे संकेत आहेत. मे महिन्याच्या शेवटी व जूनच्या सुरुवातीला तापमान वाढण्याचे संकेत आहेत. मागील वर्षी मे व जून महिन्याचे तापमान ४४ ते ४७ डिग्रीपर्यंत पोहोचले होते. मात्र, यंदा तापमान मागील वर्षांपेक्षा कमी राहण्याचे संकेत आहेत. (प्रतिनिधी)ढगाळ वातावरणामुळे तापमानात चढ-उतार सुरू आहे. मागील वर्षीपेक्षा यंदा कमी तापमान राहण्याचे संकेत आहेत. मे महिन्याच्या अखेरीस पावसाची शक्यता दिसून येत आहे. - अनिल बंड, हवामान तज्ज्ञ,