शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

नालवाडा परिसरात ढगफुटी; वेदर स्टेशनला नोंद ६ मिमी पावसाची

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: July 17, 2024 23:07 IST

शेती पिकांचे मोठे नुकसान : पीकविम्यासह शासन मदत मिळणार की नाही?

अमरावती : दर्यापूर तालुक्यातील नालवाडा व माटेगावात तीन दिवसांपूर्वी ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले. हे गाव ज्या महसूल मंडळात येते, त्या खल्लार मंडळातील वेदर स्टेशनवर त्या दिवशी फक्त सहा मिमी पावसाची नोंद झालेली आहे. त्यामुळे शेती पिकांच्या नुकसानासाठी पीक विमा व शासन मदतनिधी कसा मिळणार, हा प्रश्न निर्माण झाला आहे.           पावसाळ्यात २४ तासांत ६५ मिमीपेक्षा जास्त पाऊस झाल्यावर अतिवृष्टी झाल्याचे गृहीत धरून महसूल व कृषी यंत्रणेद्वारा आदेशाची वाट न पाहता नुकसानाचे सर्वेक्षण करण्यात येते. स्वयंचलित हवामान केंद्र असलेल्या भागात जर पाऊस पडल्यासच त्याची नोंद होईल. मात्र, त्या महसूल मंडळातील अन्य गावांत मुसळधार पाऊस झाल्यास त्याच्या नोंदी या वेदर स्टेशनवर होत नाहीत. त्यामुळे अन्य गावांत अतिवृष्टी झाल्याने पिकांचे नुकसान झाल्यास बाधित शेतकऱ्यांना पीकविम्याचा परतावा, तसेच पिकांच्या नुकसानासाठी शासन मदत मिळणे महत्त्वाचे आहे; मात्र त्या दिवशी संबंधित खल्लार मंडळातील वेदर स्टेशनवर फक्त ६ मिमी पावसाची नोंद असल्याचे स्कायमेटच्या अहवालात आहे.

नालवाडा, माटरगाव शिवारात पावसाने नुकसान झाले. येथे स्वत: भेट देऊन पाहणी केली. बाधित पिकांचे सर्व्हेक्षण करण्याचे निर्देश तलाठी व कृषी सहायकांना दिले आहेत. या पावसाची खल्लार वेदर स्टेशनला नोंद नाही. नुकसानाचा अहवाल जिल्हाधिकारी यांना पाठविण्यात येणार असल्याचे दर्यापूरचे तहसीलदार रवींद्र कानडजे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

‘त्या’ दिवशी तालुक्यात ४.५ मिमी पावसाची नोंदनालवाडा परिसरात मुसळधार पाऊस झाला, त्या २४ तासांत स्कायमेटच्या अहवालानुसार दर्यापूर तालुक्यात सरासरी ४.५ मिमी पावसाची नोंद झालेली आहे. शिवाय ही गावे समाविष्ट असणाऱ्या खल्लार महसूल मंडळात ६ मिमी पावसाची नोंद झालेली आहे. प्रत्यक्षात त्या दिवशी मुसळधार पावसाने शेतात तलाव साचले, नाल्याकाठची शेती खरडल्या गेली, तर दर्यापूर-आसेगाव रस्ता पाण्याखाली होता, याचे व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाले आहे.

पावसामुळे नुकसान झालेल्या या भागातील बाधित पिकांचे पंचनामे करण्यात येईल, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना पंचनाम्याबाबत सूचना केलेली आहे.- सौरभ कटियार,जिल्हाधिकारी 

टॅग्स :Amravatiअमरावती