शहरं
Join us  
Trending Stories
1
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
2
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
3
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
4
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
5
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
6
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
7
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
8
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
9
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
10
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
11
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
12
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
13
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
14
बेडरूममध्ये कॅमेरा बसवून खासगी व्हिडीओ काढले अन् परदेशात...; पत्नीने समोर आलं पतीचे किळसवाणं कृत्य
15
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
16
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
17
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
18
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
19
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
20
भारीच! महागडे प्रोडक्ट सोडा... गळणाऱ्या केसांवर रामबाण उपाय; एकदा करून बघाच

बंद संमिश्र मुद्दा इंधन दरवाढीचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2018 23:36 IST

पेट्रोल, डिझेलसह जीवनावश्यक वस्तंूची मोठ्या प्रमाणात दरवाढ झाल्याने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. याच्या निषेधार्थ काँग्रेसने सोमवारी बंदची हाक दिली. राष्ट्रवादी काँग्रेस, डावे पक्ष, मनसेसह इतर पक्ष व विविध संघटनांनी पाठिंबा दिला. शहरात संमिश्र, तर ग्रामीणमध्ये उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.

ठळक मुद्देकाँग्रेसची हाक, अनेकांचे समर्थन : मनसेचे १० 'डिटेन'

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : पेट्रोल, डिझेलसह जीवनावश्यक वस्तंूची मोठ्या प्रमाणात दरवाढ झाल्याने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. याच्या निषेधार्थ काँग्रेसने सोमवारी बंदची हाक दिली. राष्ट्रवादी काँग्रेस, डावे पक्ष, मनसेसह इतर पक्ष व विविध संघटनांनी पाठिंबा दिला. शहरात संमिश्र, तर ग्रामीणमध्ये उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.जयस्तंभ चौकात सकाळी ९ वाजता माजी आ. रावसाहेब शेखावत, शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किशोर बोरकर यांच्यासह पदाधिकाऱ्यांंनी महात्मा गांधींच्या पुतळ्याला हारार्पण करून बाजारपेठ बंदचे आवाहन केले. यावेळी शहरातील प्रमुख मार्गाने दुचाकी रॅली काढण्यात आली. दरम्यान अन्य पक्षाच्यावतीने देखील दुचाकी रॅली काढण्यात येऊन नागरिकांना बंदमध्ये सहभागी होण्याचे तसेच व्यापाºयांनी त्यांची दुकाने बंद करण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी शहरातील प्रमुख बाजारपेठ कडकडीत बंद होती. अत्यावश्यक सेवा वगळता बंदला शहरात संमिश्र प्रतिसाद मिळाला. दरम्यान मनसेच्या १० कार्यकर्त्यांना 'डिटेन' करण्यात आले.महागाईने सर्वसामान्यांचे जगणे महागलेअत्यावश्यक सेवा वगळता शाळा-महाविद्यालय, बाजारपेठ बंदप्रत्येक तालुक्यात काँग्रेससह इतर पक्षांनी पाठिंबा देत सकाळपासूनच बंद पाळला. बाजारपेठही सकाळपासून बंद होती.पेट्रोल, डिझेलच्या किमती वाढल्या असताना केंद्र व राज्य शासन मौन पाळून आहे. साधारणत: मे २०१४ नंतर शासनाने पेट्रोलच्या दरात २२१ टक्के, तर डिझेलच्या दरात ४४३ टक्क्यांनी वाढ केल्याचा आरोप काँग्रेससह इतर पक्षांनी केला. या वस्तूंवर अवास्तव कर लावल्यामुळेच किमती वाढलेल्या आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. सर्वसामान्यांचा हा आवाज केंद्र व राज्याच्या कानापर्यंत पोहोचण्यासाठी सोमवारच्या बंद शहरासह जिल्ह्यात पाळण्यात आला.आंदोलनात महापालिकेतील विरोधी पक्षनेता बबलू शेखावत, माजी महापौर विलास इंगोले, वसंतराव साऊरकर, भैया पवार, माजी जिल्हाध्यक्ष प्रल्हाद ठाकरे, संजय वाघ, महिला काँग्रेस अध्यक्ष देवयानी कुर्वे, राजू भेले, बाबूसेठ खंडेलवाल, करीमाबाजी, वंदना थोरात, आनंद भंबोरे, अनिल माधोगडिया, चंद्रभागा इंगोले, राजा बांगडे, निजामभाई, अमोल ठाकरे, भाऊराव पोटे, योगिनी गिरासे, पद्मीनी जाधव, विद्याधर देशमुख, राहुल तायडे, सतीश कडू, विनय देशमुख, राजेश देशमुख, किशोर रायबोले, तन्वीर आलम, भैयासाहेब हाडोळे, गणेश पाटील, राजेंद्र कडू, विनिता गोपाल, वंदना सुराडकर, एजाज पहिलवान, समीर जवंजाळ, संजय मापले, दीपक सलुजा, श्यान खेरडे, गोपाल हिवराळे, आकाश तायडे, चेतन यादव, हेमंत ठाकूर, गजानन तायडे, मोंटू वाटकर, चेतन सरदार, सागे पटेल, कुबेर जाधव, बबलू बेलसरे आदींचा सहभाग होता.बंदला या संघटनांचा पाठिंबाकाँग्रसने पुकारलेल्या सोमवारच्या बंदला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, डावे पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, पेट्रोल पंप असोसिएशन, चेंबर आॅफ कॉमर्स, किराणा असोसिएशन, संभाजी ब्रिगेड यासह अन्य पक्ष व संघटनांचा पाठिंबा असल्याचे शहराध्यक्ष किशोर बोरकर यांनी सांगितले.दुचाकी रॅलीने बंदचे आवाहनशहरात सकाळी शहर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, डाव्या पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांद्वारा दुचाकी रॅली काढून शहर बंदचे आवाहन करण्यात आले. यावेळी केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात नारेबाजी करण्यात आली. बंददरम्यान अत्यावश्यक सेवा वगळता मुख्य बाजारपेठा बंद होत्या.निषेध, चक्काजाम, अनुचित प्रकार नाहीसोमवारच्या बंद दरम्यान शहरात बंद पाळण्यात आला. ग्रामीणमध्ये बंदचे पडसाद तीव्र उमटले. आंदोलनकर्त्यांनी शासन निषेधाच्या घोषणा देत चक्काजामही केला. मात्र, यामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडल्याची नोंद नाही, प्रत्येक आंदोलनस्थळी पोलिसांचा कडक बंदोबस्त होता. जो मार्ग सुरू होता, त्या मार्गाने बसची सेवादेखील सुरू होती.वलगावला रास्ता रोकोमहाराट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव प्रकाश साबळे यांच्या नेतृत्वात जिल्हा परिषदेचे सभापती जयंत देशमुख, हरिभाऊ मोहोड, ऐन्युला खान, वीरेंद्र जाधव यांच्या नेतृत्वात वलगावात चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त होता. मार्गाच्या दुतर्फा शेकडो वाहनांची रांग लागलेली होती.