शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती जिल्ह्यातील रासेगावात निर्दयतेचा कळस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 12:31 IST

अचलपूर तालुक्यातील रासेगाव येथे एका शेतात निघालेल्या अजगराला तेथील टवाळखोरांना दगड काठ्यांनी ठेचून ठार केले. त्यानंतर एका झाडाला टांगून दिल्याची घटना घडली.

ठळक मुद्दे बारा फुटांच्या अजगराला मारून झाडावर टांगलेसर्पमित्र हळहळले

नरेंद्र जावरेलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : अचलपूर तालुक्यातील रासेगाव येथे एका शेतात निघालेल्या अजगराला तेथील टवाळखोरांना दगड काठ्यांनी ठेचून ठार केले. त्यानंतर एका झाडाला टांगून दिल्याची घटना  घडली. परतवाडा येथून पकडण्यास गेलेल्या सर्पमित्रांना सदर प्रकार दिसताच संताप व्यक्त करीत हळहळ करीत परत आले.  रासेगाव येथील एका शेतात अंदाजे १२ फूट लांबीचा अजगर निघाल्याची माहिती दूरध्वनीवर परतवाडा येथील सर्पमित्र मोनी इर्शीद यांना एका अज्ञात इसमाने दिली. त्यावरून त्या अजगरावर केवळ लक्ष ठेवा तुम्ही काहीच करू नका, असा सल्ला दिला आणि लगेच आपले सहकारी मोनू जयस्वाल, शुभम गुप्ता, प्रदीप आमझरे यांना घेऊन मोनी इर्शीद यांनी रासेगाव गाठले. तेथील काही नागरिकांना विचारणा केली असता, कुणी सांगण्याचे धाडस करीत नव्हता. शोध घेतला असता एका झाडावर त्या अजगराला ठेचून मारून नायलॉनच्या दोरीने झाडावर टांगून देण्यात आले होते, हा संतापजनक प्रकार पाहता सर्पमित्रांनी या टवाळखोरांना खडेबोल सुनावले आणि झाडावरून अजगराला खाली आणून त्याचा दफनविधी करण्याची विनंती करत निघून आले.ससा गिळल्याने होता सुस्तअजगराने ससा गिळल्याची चर्चा संपूर्ण रासेगावात पसरली. त्यामुळे त्या शेताजवळ गावातीलच टवाळखोर मुलेही आली. परतवाडा येथील सर्पमित्रांना बोलावल्याची माहिती दिल्यावरही कुठलीच तमा न बाळगता दगड काठ्यांनी १२ फूट लांबीचा अजगर ठेचून काढला. अजगराने सशाची शिकार केली असताना पोटावरच काठ्यांचा मार बसल्याने अजगराचा मृत्यू झाला. त्याला एका झाडावर टांगून ठेवल्याच्या घटनेचा सर्पमित्रांमध्ये संताप होत आहे. या सर्पमित्रांनी परिसरात कुठेही साप निघाल्यास त्याला न मारता संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

टॅग्स :snakeसाप