शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुमचं वक्तव्य लाजिरवाणं, आम्ही हमासचे दहशतवादी मारले", प्रियंका गांधींच्या 'त्या' दाव्यामुळे इस्राइल संतप्त   
2
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
3
खऱ्याखुऱ्या विराट कोहलीने पान टपरीवाल्याला केला कॉल, नंतर पोलीस त्याच्या घरी पोहचले अन्...
4
HDFC-ICICI बँकेच्या शेअर्समुळे बाजार गडगडला! पण, 'या' क्षेत्राने दिली साथ; कशात झाली वाढ?
5
माझा काही संबंध नाही, काँग्रेसने परवानगीशिवाय 'तो' व्हिडिओ वापरला; केके मेननचे स्पष्टीकरण
6
Maharashtra Police Bharti 2025: १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
7
शाओमी YU7 च्या खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड, अवघ्या दोन मिनिटांत ३ लाख बुकींग!
8
१९ वर्षे असते शनि महादशा, ‘या’ राशींना मिळतो अपार पैसा, भाग्योदय; भरभराट, भरघोस लाभच लाभ!
9
धक्कादायक! लोकोपायलटच्या जाग्यावर तिसराच व्यक्ती बसला, मोठा गोंधळ उडाला, अनेकांचा जीव धोक्यात; व्हिडीओ व्हायरल
10
"तिसरं मूल झाल्यास गाय अन् ५०००० रुपयांचं बक्षीस"; घोषणा करणाऱ्या खासदाराचं पंतप्रधान मोदींनी केलं कौतुक!
11
प्रेमविवाहानंतर अवघ्या १० दिवसांत पत्नीचा काटा काढला; पोलीस शिपाई का बनला गुन्हेगार?
12
पैशांचा पाऊस! अदानींच्या संपत्तीत एका दिवसात ५० हजार कोटींची वाढ, टॉप-२० श्रीमंतांच्या यादीत पुन्हा स्थान!
13
Video: एकाच महिलेचं ६ वेळा मतदार यादीत नाव, EPIC क्रमांक वेगळे...; महाराष्ट्रातील प्रकार व्हायरल
14
ना करुण नायर, ना श्रेयस अय्यर, ना साई सुदर्शन... ३ नंबर बॅटिंगसाठी गांगुलीची कुणाला पसंती?
15
एका झटक्यात ₹४००० नं घसरला शेअरचा भाव; शेअर विकण्यासाठी गुंतवणुकदारांच्या रांगा, पाहा कोणता आहे स्टॉक?
16
कोण आहेत १२४ वर्षीय मिंता देवी? ज्यांच्या नावाचं टी-शर्ट घालून विरोधकांचा संसदेत राडा!
17
पंजाब पोलिसांची मोठी कारवाई; बब्बर खालसा संघटनेशी संबंधित ५ दहशतवाद्यांना अटक
18
आसिम मुनीर यांना सारखं अमेरिकेत बोलावून भारतच नव्हे, तर 'या' तीन देशांनाही इशारा देतायत डोनाल्ड ट्रम्प!
19
'परम सुंदरी'च्या रोमँटिक केमिस्ट्रीवर भाळले प्रेक्षक, सिनेमात कॉमेडीचाही तडका; ट्रेलर रिलीज
20
१४, १५ की १६ ऑगस्ट? नेमकी कधी आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी? पाहा, शुभ मुहूर्त, महत्त्व, मान्यता

इतवारा परिसरातील अतिक्रमण साफ

By admin | Updated: July 14, 2016 23:57 IST

महानगरपालिका तथा पोलीस प्रशासनाकडून सुरू असलेली अतिक्रमण मोहिम गुरुवारी आठव्या दिवशी धडाक्यात राबविण्यात आली.

संयुक्त मोहीम :लालखडी, वलगावरोड,पठाणपुरा, नागपुरीगेटमध्ये कारवाईअमरावती : महानगरपालिका तथा पोलीस प्रशासनाकडून सुरू असलेली अतिक्रमण मोहिम गुरुवारी आठव्या दिवशी धडाक्यात राबविण्यात आली. यात इतवारा बाजारस्थित संकुलामधील दुकानदारांनी रस्त्यावर बांधलेल्या ओट्यांवर बुलडोजर फिरविण्यात आला. चित्रा चौक, प्रभात चौक, इस्माईल कटपिस ते गांधी चौक या मुख्य रस्त्यावरील फुटपाथवर असलेले अतिक्रमण काढण्यात आले. तेथून हा फौजफाटा जयस्तंभ चौकात पोहचला. तेथिल फुटपाथवर, पार्किंगच्या जागेवर असलेले अतिक्रमण काढण्यात आले. कारवाईवेळी वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अजय मालवीय, अतिक्रमण विभागातील पीएसआय विजय चव्हाण, अतिक्रमण विभाग प्रमुख गणेश कुत्तरमारे, निरीक्षक उमेश सवाई उपस्थित होते. कारवाईवेळी संभाव्य विरोध लक्षात घेता पोलिसांची अतिरिक्त कुमक तैनात करण्यात आली होती. याशिवाय दुपारच्या सत्रात नागपुरी गेट ,पठानपुरा,वलगाव रोड,चांदणी चौक लालखडी या भागातील पानटपरी,मासविक्रेते,हॉटेल व्यावसायिकांचे अतिक्रमण काढण्यात आले.भाजीविक्रेत्यांच्या हातगाड्यासह पानटपरी जप्त करण्यात आल्या. दुर्गा सॉ मिल परिसरातील अतिक्रमित टिनशेड काढण्यात आले. मागील तीन दिवसांपासून या भागामध्ये अव्याहतपणे अतिक्रमणाची धडक मोहीम राबविली जात आहे. अतिक्रमणधारकांचा विरोध मावळला !शहरातील अन्य भागांमध्ये धडाक्यात अतिक्रमण निर्मूलन मोहिम राबविली गेली. त्याचवेळी इतवारा बाजारासारख्या विशिष्ट भागातील अतिक्रमणधारकांना झुकते माप दिले जात असल्याची ओरड होती.त्या अनुषंगाने शुक्रवारी सलग तिसऱ्या दिवशी याच भागाला लक्ष्य करण्यात आले.या भागातील फुटपाथ तर शोधूनही सापडत नाहीत. अनेक व्यावसायिकांनी या भागात पक्के अतिक्रमण थाटले आहे. त्या बहुतांश अतिक्रमणावर महापालिकेच्या पथकाने बुलडोजर फिरविला. ही कारवाई होत असताना फारसा विरोध झाला नाही.