शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

व्याघ्र प्र्रकल्प कार्यालयाची स्वच्छता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 22:47 IST

तांत्रिक कामांवर बहिष्कार टाकल्यानंतर झालेले दोन वनरक्षक आणि एका वनपालांचे निलंबन परत घ्यावे, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वनकर्मचाऱ्यांप्रति सकारात्मक भूमिका बाळगावी, या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आंदोलक वनकर्मचाऱ्यांनी सोमवारी मेळघाट व्याघ्र प्रकल्प कार्यालय परिसराची स्वच्छता मोहीम राबविली.

ठळक मुद्देगांधीगिरी : महिला वनरक्षक चिमुकल्यांसह आंदोलनात

आॅनलाईन लोकमतअमरावती : तांत्रिक कामांवर बहिष्कार टाकल्यानंतर झालेले दोन वनरक्षक आणि एका वनपालांचे निलंबन परत घ्यावे, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वनकर्मचाऱ्यांप्रति सकारात्मक भूमिका बाळगावी, या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आंदोलक वनकर्मचाऱ्यांनी सोमवारी मेळघाट व्याघ्र प्रकल्प कार्यालय परिसराची स्वच्छता मोहीम राबविली. गांधीगिरी पद्धतीने आंदोलन करून वरिष्ठांचे त्यांनी लक्ष वेधले.अगोदर अकोट, आता अमरावतीत मेळघाट व्याघ्र प्रकल्प कार्यालयाच्या परिसरात वनकर्मचाºयांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. ‘जंगल वाऱ्यावर अन् कर्मचारी संपावर’ अशी अमरावती वनविभागाची स्थिती आहे. काम बंद आंदोलनात प्रामुख्याने वनपाल, वनरक्षकांचा मोठ्या प्रमाणात भरणा आहे. २५ जानेवारीपासून सुरू झालेल्या काम बंद आंदोलनामुळे वन्यजीव, जंगलाची सुरक्षितता धोक्यात आली आहे. तीन कर्मचाºयांचे निलंबन मागे घ्यावे, या वनकर्मचाºयांच्या मागणीला वरिष्ठ वनाधिकाºयांकडून फारसा प्रतिसाद देत नसल्याचे चित्र आहे. परंतु, आंदोलनाला कोणतेही गालबोट लागू नये, हे आंदोलन शांतता, अंहिसेच्या मार्गानेच सुरु ठेवण्यावर महाराष्ट्र वनरक्षक, वनपाल संघटनेने जाहीर केले आहे. त्यानुसार सोमवारी स्वच्छता मोहीम राबवून काम बंद ठिय्या आंदोलनाला अभिनव स्वरूप दिले, हे विशेष.आंदोलनात इंद्रजित बायस्कर, प्रदीप बाळापुरे, अनुप साबळे, राजेश घागरे, प्रवीण सगणे, डी.एम. पोटे, एन.डी. तुपकर, पी.बी. फरतोडे, एस.एस. खराबे, टी.ए. ठाकरे, एस.एच. राठोड, ए.जे. अलोकार, डी.एम. हेरो, एम.एम. ठाकरे, डी.एन. पवार, एस.बी. शेगोकार, एस.आर. काळे, एस.एच. मेटकर, ए.बी. वानखडे, ए.एस. मोरे, ए.जी. चक्रवर्ती, पी,पी. मुंडे, पी.एस. सोगे, व्ही.जी. बनसोड आदी सहभागी झाले आहेत.