शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छता ‘ब्रँड अ‍ॅम्बेसिडरच्या आज ‘कॉलेजियन्स’शी गुजगोष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 23:53 IST

महापािलकेचे स्वच्छता ब्रँड अ‍ॅम्बेसिडर तथा अभिनेता भारत गणेशपुरे २९ व ३० नोव्हेंबर रोजी महाविद्यालयीन तरुणांशी संवाद साधारण आहेत.

ठळक मुद्देभारत गणेशपुरे : विद्यार्थ्यांसोबत साधणार संवाद

आॅनलाईन लोकमतअमरावती : महापािलकेचे स्वच्छता ब्रँड अ‍ॅम्बेसिडर तथा अभिनेता भारत गणेशपुरे २९ व ३० नोव्हेंबर रोजी महाविद्यालयीन तरुणांशी संवाद साधारण आहेत. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठासह शहरातील अन्य महाविद्यालयांतील तरुणार्इंशी गुजगोष्टी करणार आहेत.स्वच्छ सर्वेक्षण २०१८ च्या अनुषंगाने अमरावती शहर स्वच्छ शहराच्या मानांकनात अग्रक्रमावर यावे, या हेतूने प्रसिद्ध अभिनेता भारत गणेशपुरे यांची बँ्रड अ‍ॅम्बेसिडर म्हणून निवड करण्यात आली. स्वच्छतेमध्ये लोकसहभाग अत्यंत महत्त्वाचा असून तो वाढविण्यासाठी गणेशपुरेंची प्रतिमा वापरली जाणार आहे. आयुक्त हेमंतकुमार आणि स्थायी समिती सभापती तुषार भारतीय यांच्या संयुक्त प्रयत्नातून भारत गणेशपुरे यांनी ब्रँड अ‍ॅम्बेसिडर होण्यास होकार दर्शविला. त्या अनुषंगाने आपले अमरावती स्वच्छ ठेवण्यासाठी गणेशपुरे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना साद घालणार आहेत. महत्तम लोकसहभागातून स्वच्छ अमरावती साकारण्यासाठी व कचरा विलगीकरणाचा मंत्र गणेशपुरे देणार आहेत. शहराची वाढती लोकसंख्या, महापालिकेचे अल्प मनुष्यबळ आणि अत्यल्प साधनसामग्रीच्या पार्श्वभूमीवर स्वच्छतेत अमरावतीकरांनी सहकार्य करावे, असे आवाहन गणेशपुरे करणार आहेत.२९ नोव्हेंबरला सकाळी १० वाजता गणेशपुरे नुतन कन्या विद्यालय व महिला महाविद्यालय व दुपारी १२ वाजता केशरबाई लाहोटीमध्ये संवाद साधतील.बुधवार आणि गुरुवारी होणाºया या संवादपर्वात महापालिका पदाधिकारी व अधिकारी सहभागी होणार आहेत.३० नोव्हेंबरलासकाळी १० वाजता भारत गणेशपुरे भारतिय महाविद्यालय, दुपारी १ वाजता अमरावती विद्यापिठ व त्यानंतर दुपारी ४ वाजता महापालिकेच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृहात पदाधिकारी व माध्यमांशेी संवाद साधतील .या संवादाची जबाबदारी विविध अधिकाºयांवर सोपविण्यात आली.जानेवारी २०१८ मध्ये अमरावती महापालिका ४००० गुणांच्या स्वच्छ सर्वेक्षणास सामोरे जात असून यंदा पहिल्या शंभर क्रमांकामध्ये येण्याचा संकल्प महापालिका पदाधिकारी व प्रशासनाने केला आहे.