शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
3
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
4
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
5
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
6
इराणनंतर लागणार पाकिस्तानचा नंबर...! इस्रायल हल्ल्यानंतर काय म्हणाले पाकिस्तानी 'एक्सपर्ट्स'? बसलीय RAW ची दहशत
7
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
8
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
9
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?
10
एकमेकांचे हात पकडले, धायमोकलून रडले अन् चालत्या ट्रेनसमोर उडी मारली; जोडप्याचा दुर्दैवी अंत
11
Health Tips: 'ही' जपानी टेक्निक ठेवेल तुम्हाला मधुमेह, रक्तदाब, हृदयविकारापासून दूर!
12
जळगाव: 13 वर्षाच्या तेजसचा कुणी चिरला गळा, का केला खून? 'त्या' दोघांनी काय सांगितले?
13
असीम मुनीर यांची भेट घेऊन ट्रम्प यांनी दिले संकेत; पाकिस्तान मित्र इराणला धोका देणार?
14
विमानाची मोठी दुर्घटना टळली! इंडिगोच्या फ्लाइटला पक्षी धडकला, पायलटने घेतला मोठा निर्णय
15
१० रुपयांची फाटकी नोट बदलणार राजा रघुवंशी प्रकरणाची कहाणी? संशयाच्या फेऱ्यात अडकला 'हा' व्यक्ती!
16
“पुढील आषाढी एकादशीला अजित पवार CM म्हणून शासकीय पूजा करतील”; कुणी घातले पांडुरंगाला साकडे?
17
Mumbai Rains: मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
18
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण: मिडकॅप, स्मॉलकॅपला मोठा फटका; 'या' क्षेत्रात मात्र तेजी!
19
मुलीच्या होणाऱ्या नवऱ्यासोबतच जुळलं सूत अन् झाली फरार, आता सपना देवी कुठे?
20
जुलै २०२५ वर खिळून आहेत इतिहास, खगोलशास्त्र आणि ज्योतिषशास्त्राच्या नजरा; पण का?

स्वच्छता कंत्राटात कोट्यवधींची उड्डाणे !

By admin | Updated: June 22, 2017 00:14 IST

प्रभागनिहाय कंत्राट बाजूला सारुन मल्टिनॅशनल कंपनीला स्वच्छतेता कंत्राट देण्याची भूमिका स्थायी समितीने घेतली आहे.

गौडबंगाल : विरोधी पक्षाची भूमिका ठरेना, प्रशासनाचा सावध पवित्रालोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : प्रभागनिहाय कंत्राट बाजूला सारुन मल्टिनॅशनल कंपनीला स्वच्छतेता कंत्राट देण्याची भूमिका स्थायी समितीने घेतली आहे. निविदा प्रक्रिया होण्यापूर्वीच त्यासाठी कोट्यवधींच्या हिशेबाचे खलबते रंगत आहेत. विशिष्ट कंपनीसाठी रेडकार्पेट अंथरले जात असल्याने या गुप्त खलबतांवर शिक्कामोर्तब झाले आहे. महापालिकेतील कंत्राट मिळविण्यासाठी विशिष्ट पदाधिकारी आणि प्रशासनातील काहींकडून केले जाणारे अर्थकारण अमरावतीकरांना नवे नाही. स्वच्छता कंत्राटात तर ती तजविज करण्यासाठी विशिष्ट कंपनीशी हातमिळवणी करण्यात आली. दैनंदिन स्वच्छतेच्या कंत्राटाचा पूर्वाभ्यास करण्यासाठी या कंपनीनीच मदत घेतली जात आहे. विशिष्ट कंपनीच्या प्रतिनिधींसोबत संबंधितांच्या निवासस्थानी गुप्त बैठकी झाल्या. त्यामुळे प्रभागनिहाय कंत्राटाला विरोध करुन नवी केंद्रीय पद्धती काार्यन्वित करण्यामागची भूमिकाही स्पष्ट झाली आहे. महापालिकेतील मोठ-मोठी कंत्राटे मिळविण्यासाठी किंवा साहित्याचा पुरवठा करण्यासाठी कुणाला बिदागी पोहोचविली जाते, हेही सर्वश्रृत आहे. मल्टीनॅशनल कंपनीला कंत्राट देण्याच्या मुद्दा ज्या गोपनियतेने हाताळला जात आहे, ती गोपनियता संशयाला वाव देणारी ठरली आहे. भाजपामधून या प्रस्तावाला जोरकस विरोध होत असताना स्थायी समितीचे सभापती तुषार भारतीय यांनी त्यासाठी चालविलेले प्रयत्न, प्रशासनाशी त्यांच्या सुरु असलेला पाठपुरावा शंकेला खतपाणी घालणारा आहे. दस्तुरखुद्द स्थायी समिती सदस्य असलेल्या काही भाजपजनांचाही ‘मल्टीनॅशनल’ कंपनीच्या प्रस्तावाला उघड विरोध आहे. तशी पत्र प्रशासनाला प्राप्त झाली आहे. तुर्तास दैनंदिन स्वच्छतेवर महिन्याकाठी सुमारे १ कोटी रुपयांचा खर्च होतो. मल्टिनॅशनल कंपनीला त्यासाठी वर्षाकाठी १८ ते २० कोटी रुपये मिळण्याचे संकेत आहेत. कंत्राटाचा कालावधी पाच वर्षे असल्यास ही उलाढाल १०० कोटींच्या घरात जावून पोहोचते. त्या पार्श्वभूमिवर विशिष्ट कंपनीवर विशिष्ट पदाधिकाऱ्यांची असलेली मेहरनजर आर्थिक अनियमिततेच्या मुद्याला खतपाणी घालणारी ठरली आहे. मग निविदेचा घाट कशाला ? निविदा प्रक्रिया होण्यापूर्वीच विशिष्ट कंपनीसोबत असलेले लागेबांधे आणि कंत्राट मिळविण्यासाठी पोषक अशा अटी शर्तीचा स्वत:हून समावेश केला जात असताना निविदा प्रक्रियेचा घाटच कशाला, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. याविषयी विरोधीपक्षाने अद्यापही स्पष्ट भूमिका जाहीर केलेली नाही. ‘त्या’ कंपनीसाठी पोषक शून्यातून विश्व निर्माण करण्याचा दावा करणाऱ्या त्या कंपनीशी संधान साधून चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या आहेत. हॉटेल आणि विशिष्ट एका पदाधिकाऱ्याच्या घरी या कंपनीच्या प्रतिनिधींनी टेंडर डाक्युमेंटबद्दल महापालिकेला अमोघ मार्गदर्शन केले आहे. निविदा प्रक्रिया, अटी, शर्तीचा अभ्यास या कंपनीकडून करवून घेतला जात असल्याने ही संपूर्ण प्रक्रिया संशयास्पद ठरली आहे. आमदारांच्या भूमिकेकडे लक्ष दैनंदिन स्वच्छतेचा कंत्राट मल्टिनॅशनल कंपनीलाच देण्यासाठी स्थायी समिती आग्रही आहे. तर दुसरीकडे सत्ताधिशांमधील बहुतांश सदस्यांचा त्याला विरोध आहे. त्या पार्श्वभूमिवर स्थायीच्या पुढील बैठकीत अटी-शर्तीसह सर्वंकष प्रस्ताव प्रशासनाकडून ठेवण्यात येईल. मल्टिनॅशनल कंपनी की प्रभागनिहाय कंत्राट पद्धती याबाबत स्थानिक आमदार आ. सुनील देशमुख यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे.