शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
3
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
4
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
5
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
6
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
7
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
8
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
9
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
10
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
11
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
12
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
13
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
14
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
15
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
16
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
17
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
18
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
19
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
20
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स

स्वच्छता कंत्राटदार बॅकफूटवर, सपशेल शरणागती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 22:42 IST

कंत्राटी स्वच्छता कामगारांना ४२३ रुपये मेहनताना द्यावा, अन्यथा १ जानेवारीपासून बेमुदत स्वच्छता बंदचा इशारा देणाऱ्या कंत्राटदारांनी सोमवारी प्रशासनासमोर सपशेल शरणागती पत्करली.

ठळक मुद्देबहिष्कारास्त्र मागे : आयुक्तांची ठाम भूमिका

आॅनलाईन लोकमतअमरावती : कंत्राटी स्वच्छता कामगारांना ४२३ रुपये मेहनताना द्यावा, अन्यथा १ जानेवारीपासून बेमुदत स्वच्छता बंदचा इशारा देणाऱ्या कंत्राटदारांनी सोमवारी प्रशासनासमोर सपशेल शरणागती पत्करली. आयुक्त हेमंत पवार यांनी ठाम प्रशासकीय भूमिका घेतल्याने या कंत्राटदारांनी प्रशासनाची माफी मागितली.नोव्हेंबर महिन्यापासून स्वच्छता कामगारांना २५० रुपयांऐवजी ४२३ रुपये दैनिक मोबदला द्यावा, आजच त्याबाबतची वर्क आॅर्डर द्यावी, अन्यथा नव्या वर्षाच्या पहिल्या दिवसापासून दैनंदिन स्वच्छतेचे काम करणार नाही, असा इशारा सर्व ४३ स्वच्छता कंत्राटदारांनी प्रशासनाला ३० डिसेंबर रोजी दिला होता. स्थायी समितीने शिक्कामोर्तब केल्यानंतरही प्रशासन टाळाटाळ करीत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्या पार्श्वभूमीवर सोमवारी आयुक्त हेमंत पवार यांनी अधिनस्थ अधिकारी-कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन कंत्राटदार प्रशासनाला वेठीस धरण्याचा प्रयत्न करीत असल्याची भूमिका व्यक्त केली. कंत्राटदारांच्या बेमुदत बंदच्या धमकीला न जुमानता महापालिका आस्थापनेवरील ८०० स्वच्छता कामगारांच्या बळावर शहराची स्वच्छता करण्याचा शब्द यंत्रणेकडून आयुक्तांना मिळाला. त्यामुळे तुम्ही खुशाल संपावर जा, आमच्याकडे पर्यायी सशक्त व्यवस्था असल्याचे आयुक्तांनी कंत्राटदार असोसिएशनला ठणकावून सांगितले. ४२३ रुपयांप्रमाणे प्रशासन सकारात्मकच आहे, त्याबाबत प्रशासकीय कार्यवाही सुरू आहे, काही तांत्रिक बाबींची पूर्तता केल्यानंतर प्रशासन त्याप्रमाणे देयके काढेल, असे आयुक्तांनी या कंत्राटदारांना बजावले.प्रशासन वाकत नसल्याचे पाहून कंत्राटदार असोशिएशनचे संजय माहूरकर आणि त्यांचे सहकारी बॅकफूटवर आले. सोमवारी दुपारीे माजी महापौर विलास इंगोले यांच्या नेतृत्वात अमरावती साफसफाई कंत्राटदार असोसिएशनच्या सदस्यांनी आयुक्तांची भेट घेतली. त्यात प्रशासनाची बाजू भक्कमपणे मांडण्यात आली.स्वच्छता कंत्राटदारांनी १ जानेवारीपावसून काम बंदचा इशारा दिला होता. सोमवारी सकाळी त्यांनी काम केले नाही.हा प्रशासनाला वेठीस धरण्याचा प्रयत्न होता.चर्चेनंतर कंत्राटदारांनी अटी-शर्तीशिवाय काम करण्यास तयार असल्याचे सांगितले.- हेमंत पवार, आयुक्त