शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छ सर्वेक्षणाचे ‘क्रॉस व्हेरिफिकेशन’

By admin | Updated: February 7, 2017 00:08 IST

स्वच्छ सर्वेक्षण २०१७ अंतर्गत पुन्हा एकदा अमरावती शहराचे स्वच्छताविषयक सर्वेक्षण केले जात आहे. मंगळवारी (७ फेब्रुवारी) ही पुनर्तपासणी होत आहे.

आज पुनर्तपासणी : गुणांकनावर होणार शिक्कामोर्तबअमरावती : स्वच्छ सर्वेक्षण २०१७ अंतर्गत पुन्हा एकदा अमरावती शहराचे स्वच्छताविषयक सर्वेक्षण केले जात आहे. मंगळवारी (७ फेब्रुवारी) ही पुनर्तपासणी होत आहे. क्यूसीआयचे पथक सकाळी महापालिकेत पोहोचणार आहेत. या पथकाकडून होणाऱ्या पुनर्तपासणीच्या अहवालावर अमरावती महापालिकेचे गुणांकन ठरणार आहे. सोमवारी दुपारी याबाबत ‘क्यूसीआय’कडून अतिरिक्त आयुक्तांना मोबाईल संदेश मिळाला असून पुनर्तपासणीच्या पूर्वतयारीला वेग देण्यात आला आहे. मंगळवारी हे ‘इव्हॅॅल्यूशन’ होणार आहे. स्वच्छ भारत मिशनमधील स्वच्छ भारत अभियान (नागरी) अंतर्गत देशातील ५०० शहरांमध्ये ४ जानेवारी ते ४ फेब्रुवारी या कालावधीत ‘क्वालिटी कौन्सिल आॅफ इंडिया’कडून स्वच्छ सर्वेक्षण २०१७ राबविण्यात आले. २००० गुणांच्या स्वच्छताविषयक स्पर्धेमध्ये शहरांचे गुणांकन ठरविण्यासाठी एका खासगी कंपनीच्या ‘असेसर्स’कडून तपासणी करण्यात आली. त्या अनुषंगाने क्यूसीआयने नेमलेल्या चारूदत्त पाठक, गोविंद घिमिरे आणि विजय जोशी या पथकाने १७ ते १९ जानेवारीदरम्यान अमरावती शहराचे स्वच्छताविषयक पाहणी केली. चारूदत्त पाठक यांनी महापालिकेत बसून महापालिकेचे दस्तऐवज तपासले. घिमिरे आणि जोशींनी ‘स्पॉट व्हिजीट’ करत स्वच्छ सर्वेक्षणाची तपासणी केली. घनकचरा व्यवस्थापन, वाहतूक प्रक्रिया आणि विल्हेवाटीच्यासंदर्भात २००० गुणांचीही तपासणी करण्यात आली आणि महापालिकेचा जीव भांड्यात पडला. क्यूसीआय पथकाच्या सर्वेक्षणावेळी यंत्रणेने जय्यत तयारी केली होती. स्वच्छताविषयक सर्वच डाटावर पाठक यांनी समाधान व्यक्त केल्याने पहिल्या २० शहरांमध्ये येणाऱ्या महापालिकेच्या आशा या समाधानातून पल्लवित झाल्या होत्या. मात्र पुन्हा एकदा क्यूसीआयचे पथक एक दिवसासाठी पुनर्तपासणी करण्यात येत असल्याने अतिरिक्त आयुक्त शेटे आणि त्यांची टीम कामाला लागली आहे. शेटे यांच्यानुसार, मंगळवारी येणारे क्यूसीआयचे ‘असेसर’ १७ ते १९ जानेवारीदरम्यान पार पडलेल्या सर्वेक्षणवजा तपासणीचेच क्रॉस व्हेरिफिकेशन करणार आहेत. (प्रतिनिधी)लाचखोरीचा संदर्भजोशी आणि घिमिरे यांचा समावेश असलेले क्यूसीआयचे एक पथक औरंगाबाद महापालिकेत १ लाख ७० हजारांची लाच घेताना ‘एसीबी’ने पकडले होते. अन्य ठिकाणी तर असा प्रकार केला नाही ना? आणि केला असेल, तर त्या शहराच्या सर्वेक्षणाची वास्तविकता काय? हे तपासण्यासाठी पुन्हा एकदा अमरावती महापालिका क्षेत्रात स्वच्छ सर्वेक्षण होत आहे की काय, अशी शंका उपस्थित करण्यात आली आहे. अमरावती महापालिकेने या पथकाची उत्तम बडदास्त राखली होती, हे येथे विशेष उल्लेखनीय.