शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छ सर्वेक्षणमध्ये शहर १२२ व्या स्थानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 22:17 IST

देशभरातील ४,२०३ शहरांना उत्सुकता लागून राहिलेल्या बहुप्रतिक्षित ‘स्वच्छ सर्वेक्षण २०१८’ चे शहरनिहाय मानांकन शनिवारी घोषित करण्यात आले. या सर्व शहरांची अमृत आणि नॉन अमृत अशी वर्गवारी करण्यात आली होती. त्यात अमृत शहराच्या ‘नॅशनल रँकिंग’मध्ये अमरावतीला १२२ वे स्वच्छ शहर म्हणून मानांकन मिळाले. शहराला ४ हजारांपैकी २४८६.५४ गुण मिळाले.तर राज्यातील ४३ शहरांमध्ये अमरावतीचे मानांकन ३४ असे आहे.

ठळक मुद्दे२,४८६ गुण : गतवर्षी होता २३१ वा क्रमांक

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : देशभरातील ४,२०३ शहरांना उत्सुकता लागून राहिलेल्या बहुप्रतिक्षित ‘स्वच्छ सर्वेक्षण २०१८’ चे शहरनिहाय मानांकन शनिवारी घोषित करण्यात आले. या सर्व शहरांची अमृत आणि नॉन अमृत अशी वर्गवारी करण्यात आली होती. त्यात अमृत शहराच्या ‘नॅशनल रँकिंग’मध्ये अमरावतीला १२२ वे स्वच्छ शहर म्हणून मानांकन मिळाले. शहराला ४ हजारांपैकी २४८६.५४ गुण मिळाले.तर राज्यातील ४३ शहरांमध्ये अमरावतीचे मानांकन ३४ असे आहे.सन २०१७ मध्ये ४३४ शहरांमध्येच स्वच्छ सर्वेक्षण घेण्यात आले होते.निकालाने उत्सुकता शमलीमात्र २०१८ मध्ये ती संख्या ४२०३ शहरांवर पोहोचली. एकूण ४ हजार गुणांचे हे सर्वेक्षण होते. विशेष म्हणजे गतवर्षी अमरावती शहर स्वच्छ शहरांच्या यादीत २३१ व्या क्रमांकावर होते. मागील महिन्यात देशपातळीवरील पहिल्या ५० स्वच्छ शहरांची यादी घोषित करण्यात आली. त्यापासूनच आपले शहर स्वच्छ सर्वेक्षणात कुठे आहे, ही उत्सुकता प्रशासनासह सर्वसामान्यांनाही लागली होती. ती उत्सुकता शनिवारच्या निकालाने शमली. विशेष म्हणजे ४८५ अमृत शहरांच्या यादीत अमरावती शहराला १२२ वे तर अचलपूर शहराला ४८ वे मानांकन मिळाले. अचलपूरने अमरावतीपेक्षा अधिक अर्थात २९०२.९ गुण मिळविले.४ हजार गुणांपैकी प्रत्येकी १४०० गुण नागरिकांच्या प्रतिक्रिया व सेवास्तरावरील प्रगतीसाठी तर प्रत्यक्ष निरीक्षणाकरिता १२०० गुण होते. केंद्रीय शहरी विकास मंत्रालयाच्या अखत्यारितील क्वालिटी कौन्सिल आॅफ इंडियाच्या असेसर्सनी १५ ते २१ फेब्रुवारीदरम्यान शहराचे स्वच्छताविषयक सर्वेक्षण केले. त्यांनी सुकळी कंपोस्ट डेपोसह इतवाऱ्याचा वेस्ट आर्गेनिक प्रकल्प व मलशुद्धीकरण प्रकल्पासह अन्य प्रकल्पांचे निरीक्षण करून नागरिकांच्या प्रतिक्रिया प्रत्यक्ष जाणून घेतल्या. त्यानंतर राष्ट्रीय स्तरावर गुणांकन करण्यात आले.असे मिळाले गुणसेवास्तरावरील प्रगतीसाठी असलेल्या एकूण १४०० गुणांपैकी अमरावती शहराला ४१७ गुण मिळालेत, तर प्रत्यक्ष निरीक्षणासाठी असलेल्या १२०० गुणांपैकी ९६२.७७ गुण मिळाले. तसेच १४०० गुणांच्या नागरिकांच्या प्रतिक्रियांमध्ये शहराने ११०६.७७ गुण मिळविले. एकूणच ४ हजार गुणांपैकी अमरावती शहराला २,४८६.५४ गुण मिळाले आहेत. शहर सेवास्तरावरील गुणांकनामध्ये माघारल्याने अमरावतीला १२२ व्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.