शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
2
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
3
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
4
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
5
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
6
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
7
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
8
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
9
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
10
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
11
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
12
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
13
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!
14
ही तरुणी बनणार मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती, कोण आहे एलिसा कार्सन, म्हणते सुखरूप परतले तर...
15
'डियर क्रिकेट... डोन्ट गिव्ह वन मोअर चान्स' असं म्हणायची वेळ! करुण नायर चौथ्या प्रयत्नातही 'नापास'
16
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
17
Sushil Kedia Office Vandalise: सुशील केडिया यांच्या मुंबईतील कार्यालयाची तोडफोड, मनसेच्या ५ कार्यकर्त्यांना अटक
18
Himachal Flood : पावसाचे थैमान! ७२ जणांचा मृत्यू, ३७ बेपत्ता; हिमाचलमध्ये ढगफुटीमुळे नुकसान, रेड अलर्ट जारी
19
PNB घोटाळ्यातील फरार आरोपी नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदी अटकेत, अमेरिकेत मुसक्या आवळल्या
20
Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava Marathi : "अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?"; राज ठाकरेंनी यादीच वाचली...

स्वच्छ अमरावतीला स्वास्थ्य अधीक्षकांचे ‘नख’

By admin | Updated: January 14, 2017 00:07 IST

केंद्र शासनाच्या २००० गुणांच्या स्वच्छ सर्वेक्षणाच्या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी महापालिका प्रशासन रात्रीचा दिवस करीत असताना ...

तिजारेंना ‘शो-कॉज’ : कंत्राटदारांचे हित जपण्याचा आरोप अमरावती : केंद्र शासनाच्या २००० गुणांच्या स्वच्छ सर्वेक्षणाच्या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी महापालिका प्रशासन रात्रीचा दिवस करीत असताना स्वास्थ्य अधीक्षकाकडून ‘स्वच्छ अमरावती मिशन’ला नख लावण्याचा प्रकार होत आहे. स्वास्थ्य अधीक्षकाकडून महापालिकेचे नव्हे, तर साफसफाई कंत्राटदाराचे हित जोपासले जात असल्याचे निरीक्षण अतिरिक्त आयुक्तांनी नोंदविले आहे.केंद्र शासनाची क्यूसीआय टीम ‘स्वच्छ सर्वेक्षण २०१७’ अंतर्गत १७ ते १९ डिसेंबर या कालावधीत स्वच्छ अमरावतीची तपासणी करणार आहे. २ हजार गुणांच्या स्वच्छ सर्वेक्षणात उत्तीर्ण होण्यासाठी आयुक्त हेमंत पवार, अतिरिक्त आयुक्त सोमनाथ शेटे यांच्यासह दोन्ही उपायुक्त, पाच सहायक आयुक्त, वैद्यकीय आरोग्य अधिकारी आणि स्वच्छता अधिकाऱ्यांनी गृहपाठ चालविला आहे. घनकचरा व्यवस्थापनासह कचरा संकलन, वाहतूक प्रक्रिया यासह दैनंदिन साफसफाई टार्गेट करण्यात आली आहे. यासंदर्भात उच्चाधिकारी बैठकांवर बैठकी घेत असून स्वच्छताविषयक कामे करण्याची जबाबदारी अधिनस्थ यंत्रणेवर आहे. वैयक्तिक शौचालयासह अनेक प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी यंत्रणेचे जोरदार प्रयत्न सुरु आहेत. स्वच्छ सर्वेक्षणात उत्तीर्ण होण्यात कोणतीच कसर राहू नये, म्हणून अख्खी यंत्रणा कामाला लागली असताना अरुण तिजारे नामक स्वास्थ्य अधीक्षकाने या मोहिमेला गालबोट लावण्याचा प्रकार केला आहे. याप्रकरणी तिजारेंना ‘शो कॉज’ नोटीस बजावण्यात आली आहे.शहरातील स्वच्छतेविषयक तक्रारींचे निराकरण करण्यासाठी ‘स्वच्छ अ‍ॅप’ तयार करण्यात आला. या अ‍ॅपवर आलेल्या तक्रारी विनाविलंब सोडवाव्यात, असे केंद्र आणि राज्य शासनाचे निर्देश आहेत. यंत्रणा यासमस्या सोडविण्यासाठी पाठपुरावा करीत असताना तिजारे यांनी ‘आपले सरकार’ या पोर्टलवरील २५ तक्रारी ३०० दिवस होऊनही निकाली काढण्याचे सौजन्य दाखविले नाही. याशिवाय ‘स्वच्छ अ‍ॅप’वर दाखल तक्रारी निकाली काढण्याकरिता कोणतेही प्रयत्न न केल्याचा ठपका ठेवला.तिजारेंना सक्तीची रजा ?महापालिकेचे आर्थिक हित न पाहता कंत्राटदाराचे किवा पुरवठाधारकांचे हित जोपासत असल्याने आपणाला सक्तीच्या रजेवर का पाठवू नये, अशी विचारणा अरूण तिजारे यांना दिलेल्या कारणे दाखवा नोटीसमधून करण्यात आली आहे.सर्व प्रभागांत कचरा कचरा संकलनासाठी शहरात अंदाजे ५५० ठिकाणी कंटेनर आहेत. स्वच्छ सर्वेक्षणाच्या अनुषंगाने साफसफाईसाठी अधिकचे कामगार लावण्यात आलेत. मात्र, बहुतांश प्रभागांमध्ये कंटेनरच्या आसपास कचरा पसरलेला असतो. याचा अर्थ कचरा उचलला जात नसताना स्वास्थ्य अधीक्षक करतात तरी काय, असा प्रश्न अतिरिक्त आयुक्तांकडून उपस्थित करण्यात आला आहे.