शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
7
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
8
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
9
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
10
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
11
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
12
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
13
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
14
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
15
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
16
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
17
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
18
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
19
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

स्वच्छ नगर पालिका, पंचायतींवर ‘धनवर्षाव’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2018 22:17 IST

स्वच्छ महाराष्ट्र अभियानाअंतर्गत हागणदरीमुक्त झालेल्या जिल्ह्यातील १३ नगर पालिका-नगर पंचायतींना राज्य शासनाने ४.५० कोटी रुपयांचा निधी दिला आहे.

ठळक मुद्दे४.५० कोटींचा निधी : प्रोत्साहनात्मक अनुदानाचा पहिला-दुसरा टप्पा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : स्वच्छ महाराष्ट्र अभियानाअंतर्गत हागणदरीमुक्त झालेल्या जिल्ह्यातील १३ नगर पालिका-नगर पंचायतींना राज्य शासनाने ४.५० कोटी रुपयांचा निधी दिला आहे.हागणदरीमुक्त शहरे अभियानांतर्गत उत्तम काम करणाऱ्या नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना प्रत्येकी दोन, दीड व एक कोटी रुपये प्रोत्साहनात्मक अनुदान देण्याचा निर्णय राज्यस्तरावर घेण्यात आला. त्याअनुषंगाने भातकुली व धारणी या दोन नगर पंचायतींना पहिल्या टप्प्यातील प्रत्येकी ३० लाख रुपये प्राप्त होणार आहेत, तर उर्वरित ११ नगरपरिषदा व नगर पंचायतींना ३.९० कोटी रुपये दुसरा हप्ता वितरित करण्यास नगरविकास खात्याने मान्यता दिली आहे.स्वच्छ महाराष्टÑ अभियानाच्या अंमलबजावणीपासून आतापर्यत हागणदारीमुक्त झालेल्या शहरांपैकी केंद्रशासनाच्या क्यूसीआय या त्रयस्थ संस्थेमार्फत करण्यात आलेल्या तपासणीमध्ये जी शहरे हगणदरीमुक्त झाल्याचे दिसून आली आहेत, अशा शहरांना अनुज्ञेय प्रोत्साहन अनुदान रकमेच्या ३० टक्के निधीचा पहिला हप्ता देण्यात येतो.ज्या शहरांना अनुदान रकमेचा पहिला हप्ता वितरति करण्यात आला होता व ज्या शहरांची केंद्र शासनाच्या क्यूसीआय या त्रयस्थ संस्थेमार्फत पुनर्तपासणी करण्यात आली, या पुनर्तपासणीत जी शहरे हगणदरीमुक्त आढळून आलीत, अशा शहरांना प्रोत्साहनपर अनुदान रकमेचा ३० टक्के निधीचा दुसरा हप्ता वितरित केला जातो.भातकुली, धारणीला प्रत्येकी ३० लाखस्वच्छ महाराष्ट्र अभियानाअंतर्गत हागणदरीमुक्त झालेल्या भातकुली व धारणी या दोन नगर पंचायतींना प्रत्येकी एक कोटी रुपये प्रोत्साहनपर अनुदान देय असून, त्यापैकी प्रत्येकी ३० लाख रुपये त्यांना वितरित करण्यात आले आहेत. ३० टक्के रकमेचा हा पहिला हप्ता आहे.