शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे सोपवणार सूत्रे
2
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
3
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
4
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार
5
UNESCO 12 Forts: "जेव्हा आपण गौरवशाली मराठा साम्राज्याबद्दल बोलतो, तेव्हा..."; PM मोदींनी व्यक्त केला आनंद
6
काँग्रेसला धक्का! धंगेकर, थोपटेनंतर काँग्रेसचा आणखी एक माजी आमदार भाजपमध्ये करणार प्रवेश
7
Ahmedabad Plane Crash : विमानात नेमका कुठे असतो 'फ्यूअल स्विच'? कोण करू शकतं याला चालू-बंद?
8
जनसुरक्षा विधेयकाला उद्धवसेनेचा विरोध; भाजपाची टीका, नेते म्हणाले, “महाविकास आघाडी...”
9
राज ठाकरे मुख्यमंत्री झाले तर महाराष्ट्र कसा असेल?, तेजस्विनी पंडितने दिली प्रतिक्रिया
10
“एसटीने घडविले ९ लाख ७१ हजार भाविक-प्रवाशांना विठ्ठल दर्शन”; प्रताप सरनाईकांची माहिती
11
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
12
ना कोणता साईड बिझनेस, ना जास्त पगार.., ४५ व्या वर्षी रिटायरमेंट आणि ४.७ कोटींची नेटवर्थ, कसं झालं हे शक्य?
13
Viral Video: भाजप नेत्याला एका महिलेसोबत कारमध्ये नको त्या अवस्थेत पाहिलं, व्हिडीओ व्हायरल!
14
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड
15
छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यावर गोळीबार, कर्मचाऱ्याच्या पोटात लागली गोळी
16
Radhika Yadav : राधिकाला मारण्यापूर्वी स्वत:लाच संपवणार होते वडील; टेनिसपटूच्या हत्या प्रकरणात पुन्हा नवा ट्विस्ट
17
अल्पवयीन मुलासह दोघांना करायला लावला ओरल सेक्स; मुंबईतून अपहरण, पुण्याला नेईपर्यंत बेदम मारहाण, घडलं काय?
18
पत्नीच्या शस्त्रक्रियेसाठी जामीन मिळवला अन् बाहेर येताच फरार झाला सिद्धू मूसेवाला हत्याकांडातील आरोपी!  
19
चातुर्मासातील पहिले पंचक रविवारपासून, अजिबात करू नका ‘ही’ कामे; ५ दिवस ठरणार अत्यंत अशुभ?
20
"राधिका यादवला लग्न करायचं होतं, पण..."; शेजाऱ्यानं काही भलतंच सांगितलं! काय म्हणाला?

स्वच्छता देयकांमधील साखळी ‘ब्रेक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2017 00:02 IST

दैनंदिन सफाईची देयके प्रदान करताना उफाळलेली टक्केवारीच्या बजबजपुरीला आयुक्त हेमंत पवार यांनी लगाम घातला आहे.

आयुक्तांचा घणाघाती निर्णय : प्रशासकीय वर्तुळात खळबळ अमरावती : दैनंदिन सफाईची देयके प्रदान करताना उफाळलेली टक्केवारीच्या बजबजपुरीला आयुक्त हेमंत पवार यांनी लगाम घातला आहे. महापालिकेत अनेक वर्षांपासून चालत आलेल्या या साखळीला पवारांनी ब्रेक दिला आहे. यातील पाच जणांना डच्चू देण्यात आला आहे. पवारांच्या या घणाघाती निर्णयाने आरोग्य आणि स्वच्छता विभागात खळबळ माजली असून भ्रष्ट कर्मचारी अधिकाऱ्यांचे चेहरे पडले आहेत. दैनंदिन स्वच्छतेची देयके सादर करताना त्यात अधिकारी कर्मचाऱ्यांची बरीच मोठी साखळी असल्याने ही देयके प्रदान करण्यासाठी मोठा विलंब होत असल्याचे निरीक्षण नोंदवून आयुक्तांनी या देयकांचा प्रवासाचा मार्ग नव्याने निश्चित करून दिला आहे. २ मार्चला काढलेल्या या कार्यालयीन परिपत्रकान्वये आयुक्तांनी दैनंदिन स्वच्छतेच्या देयकांचा प्रवास संबंधित स्वच्छता निरीक्षक, सहायक आयुक्त, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, उपायुक्त आणि अतिरिक्त आयुक्त किंवा आयुक्त असा आखून दिला आहे. अर्थात या नव्या मार्गातून झोन स्तरावरील २ कर्मचारी व मुख्य कार्यालयातील लिपिक, स्वास्थ्य अधीक्षक अरुण तिजारे व स्वच्छता अधिकारी अजय जाधव अशी पाच कर्मचारी, अधिकारी वगळण्यात आली आहेत. आता तिजारे किंवा जाधव किंवा शाम चावरेंकडे स्वच्छता देयकांची फाईल जाणार नाही. आरोग्य विभागातील काही कर्मचाऱ्यांनी, अंगिकारलेली टक्केवारीचे बजबजपुरी आयुक्तांच्या नव्या घणाघाती निर्णयाने संपुष्टात येईल, अशी शक्यता आहे. प्रत्येक टेबलवर कमी अधिक प्रमाणात देण्यात येणारी बिदागीला आयुक्तांनी लगाम घातल्याने भ्रष्ट अधिकारी-कर्मचाऱ्यांचे चेहरे पडले आहेत.असे आहेत नवे आदेश दैनंदिन स्वच्छतेची देयके सादर करताना त्यात अधिकारी - कर्मचाऱ्यांची बरीच मोठी साखळी असल्याने ही देयके प्रदान करण्यासाठी अवाजवी विलंब होत असल्याचे आयुक्त कार्यालयाच्या निदर्शनास आले आहे. याचा विपरित परिणाम दैनंदिन स्वच्छतेच्या कामावर पडतो. या बाबी टाळण्यासाठी दैनंदिन स्वच्छतेची देयके आता नव्या मार्गाने सादर होतील. असा राहील फाईलचा प्रवास टेबल कमी करुन आरोग्य विभागातील साखळी संपुष्टात आणल्या गेली आहे. आता संबंधित स्वच्छता निरीक्षक देयक तयार करतील व ते सहायक आयुक्तांना सादर करतील. सहायक आयुक्त हे सरळ वैद्यकीय आरोग्य अधिकारी सीमा नैताम यांच्याकडे देयके पाठवतील. ‘एमओएच’ नैताम या उपायुक्त (सामान्य) मार्फत सदर देयक अतिरिक्त आयुक्त-आयुक्तांना सादर करतील. या नव्या साखळीने झोन स्तरावरील दोन आणि मुख्य कार्यालयातील तिघे बाद झाले आहेत. या निर्णयामुळे फोफावलेल्या टक्केवारीला ब्रेक बसणार आहे. लेटलतिफी नकोचस्वच्छता निरीक्षक, सहायक आयुक्त, एमओएच, उपायुक्त, अतिरिक्त आयुक्त किंवा आयुक्त अशा प्रकारे संचिका हाताळताना प्रत्येक स्तरावर एक दिवसापेक्षा अधिक कालावधी लागणार नाही, याची सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी नोंद घ्यावी. एखादा अधिकारी त्या दिवशी रजेवर असल्यास तो अधिकारी रजेवर आहे, अशी नोंद घेऊन ती त्याच दिवशी पुढील अधिकाऱ्याकडे सादर करावी. ती संचिका त्या स्तरावर प्रलंबित ठेवू नये, असे आदेश आयुक्तांनी पारित केले आहेत. दैनंदिन स्वच्छतेची देयके सादर करतानाची साखळी ब्रेक करण्यात आली. या साखळीतून पाचजण बाद करण्यात आले.- हेमंत पवार, आयुक्त, महापालिका