शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

चिखलातून पोहचली अंत्ययात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2018 22:42 IST

येथील वादग्रस्त स्मशानभूमीचा विषय अधिक जटील झाला असून रस्त्याअभावी सोमवारी चिखलातून स्मशानभूमीपर्यंत चिखल तुडवीत माजी ग्रामपंचायत सदस्यांचा मृतदेह गावकऱ्यांना न्यावा लागला. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देरस्त्याची दुरवस्था : स्थानिक प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कगुरूकुंज (मोझरी) : येथील वादग्रस्त स्मशानभूमीचा विषय अधिक जटील झाला असून रस्त्याअभावी सोमवारी चिखलातून स्मशानभूमीपर्यंत चिखल तुडवीत माजी ग्रामपंचायत सदस्यांचा मृतदेह गावकऱ्यांना न्यावा लागला. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.गुरुकुंजातील डॉ. श्रीकृष्ण माहुलकर (६८) यांचे रविवारी निधन झाले. त्यांच्यावर सोमवारी अंत्यसंस्कार करण्याचे ठरले होते. पण स्मशानभूमित जाण्याकरिता रस्ताच नाही मग पोहचणार कसे, हा सवाल ग्रामस्थांनी व्यक्त केला. बैलबंडी जाणे शक्यच नसल्याने अंत्यविधीसाठी लागणारी लाकूडफाटा चक्क चिखलातून खांद्यावर वाहून न्यावी लागली. त्यामुळे हा नाहक मन:स्ताप ग्रामस्थांना सहन करावा लागला. असाच प्रकार काही दिवसांपूर्वी गुरुकुंज येथे घडला असून, चक्क बसस्थानकापुढे संतप्त गावकºयांनी अंत्यसंस्कार उरकविले होते. कारण त्याच ठिकाणी जुनी समशानभूमी होती. आताही तीच परिस्तिथी निर्माण झाली आहे. नुकत्याच झालेल्या दमदार पावसामुळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल साचला असून, ग्राम प्रशासन, तहसील प्रशासनामार्फत यावर कुठलीच व्यवस्था अद्यापही करण्यात आलेली नाही. त्यामुळे आजही नागरिक लाखो रुपये खर्चून उभारलेल्या स्मशानभूमीचा रस्ता शोधत आहे. हाच मुद्दा येत्या निवडणुकीत विरोधकांच्या हाती कोलीत देण्यासाठी पुरेशा असून, त्यादृष्टीने गावकºयांच्या होणाºया हालअपेष्टा शासन दरबारी मांडण्याचा प्रयत्न सोशल मीडियातून चालविला आहे, हे विशेष.