शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

सीपींनी घेतला शिकवणी वर्गशिक्षकांचा क्लास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 23:23 IST

अलीकडे होत असलेली गुन्ह्यांची नोंद व सोशल मीडियाचा धुडगूस पाहता, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी शिकवणी वर्गाच्या शिक्षकांचा क्लास घेतला.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सूचना : पोलीस आयुक्तालयात बैठक

आॅनलाईन लोकमतअमरावती : अलीकडे होत असलेली गुन्ह्यांची नोंद व सोशल मीडियाचा धुडगूस पाहता, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी शिकवणी वर्गाच्या शिक्षकांचा क्लास घेतला. पोलीस आयुक्तालयात शुक्रवारी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.बैठकीला पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी संबोधित केले. आठवीपासूनचे विद्यार्थी अधिकाधिक काळ शिकवणी वर्गातच घालवतात. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी आपसूकच शिकवणी वर्गाच्या शिक्षकांवर येते. या विषयात पोलीस आयुक्तालयाकडून जारी केलेल्या सूचनांचे पालन शिकवणी वर्गाकडून केले जावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.यावेळी पोलीस उपायुक्त शशिकांत सातव, चिन्मय पंडित, सहायक पोलीस आयुक्त पी.डी. डोंगरदिवे यांच्यासह पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे, नीलिमा आरज, अनिल कुरुळकर, उमेश पाटील, दत्ता गावडे यांच्यासह खासगी शिकवणी वर्ग घेणारे शंभरावर शिक्षक उपस्थित होते.पोलीस आयुक्तांनी सूचना देऊन त्यांचे पालन करण्याचे निर्देश शिक्षकांना दिले. यावेळी शिक्षकांनीही त्यांच्या काही समस्या पोलिस आयुक्त समक्ष मांडल्या. रात्री ९ वाजता वर्ग सुटल्यानंतर पालकांनीच त्यांच्या मुलामुलींना घेऊन जाण्याचा मुद्दा शिक्षकांनी माडला. या मुद्द्यावर पोलीस आयुक्तांनी सहमती दर्शविली आणि तशा सूचना पालकांना देण्यात याव्यात, असे सांगितले.सूचनांचे पालन न झाल्यास नोटीस बजावणारविद्यार्थ्यांच्या सुरक्षेचे दृष्टीने पोलीस आयुक्तांनी दिलेल्या सूचनांचे पालन शिकवणी वर्गाच्या शिक्षकांना करणे अनिवार्य राहणार आहे. या सूचनांचे पालन न झाल्यास पोलिसांकडून शिक्षकांना नोटीस बजावून त्यांच्याविरुद्ध कलम १८८ अन्वये कारवाईसुद्धा करण्यात येणार आहे.या आहेत सूचनामुलांची हजेरी घ्या. विद्यार्थी गैरहजर असल्यास त्यांच्या पालकांना कळवा. सुरक्षा रक्षकाची नेमणूक करा. शिकवणी वर्गातील मुलांशिवाय बाहेरील कोणतीही व्यक्ती परिसरात फिरणार नाही, याची दक्षता घ्या. मुले गैरहजर असतील, तर त्यांच्या पालकांच्या व्हॉट्स अ‍ॅपवर संदेश पाठवा. वर्गातील मुलामुलींना बाहेरील व्यक्तीसोबत सोडू नका. शिकवणी वर्ग परिसरात बोर्ड लावा. मुला-मुलींना ओळखपत्र द्या. सीसीटीव्ही लावा. शिकवणी वर्गाच्या परिसरात सुरक्षित पार्किंगची व्यवस्था करा.पोलीस देतील भेटशहरात १०३ शिकवणी वर्गांची पोलीस दप्तरी नोंद आहे. या शिकवणी वर्गांना पोलीस कर्मचारी भेट देऊन तेथील घडामोडींचा आढावा घेतील. काही संशयित किंवा टवाळखोर तरुण आढळले, तर त्यांची चौकशी करून त्यांना ताब्यात सुद्धा घेतील. शिकवणी वर्ग परिसरात जर बाहेरील तरुण टवाळखोरपणा करीत असतील, तर त्या तरुणांच्या दुचाकीचे क्रमांक घ्यावेत व मोबाइलमध्ये चित्रीकरण करावे. ती माहिती प्राप्त होताच पुढील कारवाई पोलीस करतील, अशा सूचनाही पोलीस आयुक्तांनी शिक्षकांना दिल्या.