शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

इयत्ता १२ वीच्या पेपर तपासणीस ‘असहकार’

By admin | Updated: March 1, 2017 00:10 IST

क निष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या आश्वासित व मान्य मागण्यांची पूर्तता व अंमलबजावणीसाठी ३ मार्चपासून सुरु होणाऱ्या ....

कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचा पवित्रा : प्रलंबित मागण्या पूर्ण कराअमरावती : क निष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या आश्वासित व मान्य मागण्यांची पूर्तता व अंमलबजावणीसाठी ३ मार्चपासून सुरु होणाऱ्या इयत्ता १२ वी पेपर तपासणीस ‘असहकार’ पवित्रा घेण्याचा निर्णय कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी घेतला आहे. याबाबतचे निवेदन शिक्षक संघटनेच्यावतीने विभागीय शिक्षण मंडळाच्या अध्यक्षांना देण्यात आले आहे.कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचा मागण्या दीर्घकाळ प्रलंबित असून बैठकीत सर्व मागण्यांची पूर्तता महिनाभरात करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्याची पूर्तता न झाल्याने डिसेंबर २०१६ मध्ये आंदोलन करण्यात आले आहे. त्यानंतर जोनवारीमध्ये जेलभरो आंदोलन करण्यात आले. त्यावेळी १५ दिवसात मागण्यांची पूर्तता केली जाईल, असे आश्वासन देण्यात आले. मात्र शासन, शिक्षण विभागाने कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले, असा आरोप शिक्षक संघटनांनी केला आहे. शिक्षकांना दिलेल्या आश्वासनाची पुर्तता करण्यात आली नाही. त्यामुळे शिक्षक आयुक्तपद रद्द करावे, अशी मागणीसह अन्य मागण्यांच्या पुर्ततेसाठी शिक्षक महासंघाने असहकार आंदोलनाचा आक्रमक पवित्रा घेतला आहे. शिक्षक दररोज एक पेपर तपासणार असून कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक दररोज एक उत्तर पत्रिका तपासतील व त्याचे नियमन करतील, असा असहकार आंदोलनाचा भाग असल्याचे शिक्षक संघटनांनी स्पष्ट केले आहे. यासर्व बाबीला शासन जबाबदार राहील, असेही निवेदनातून म्हटले आहे.दहावी, बारावीसाठी१० भरारी पथके!महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता बारावी) २८ फेब्रुवारी ते मार्च या कालावधीत होत आहे. माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता दहावी ७ मार्च ते १ एप्रिल या कालावधीत होत आहे. या परीक्षा होऊ घातलेल्या केंद्रावर कॉपीसारखे गैरप्रकार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाचे व शिक्षण विभाग तसेच शिक्षण मंडळाने जवळपास १० पथके तयार केली आहेत. इयत्ता बारावीच्या परीक्षा जिल्ह्यातील १२५ परीक्षा केंद्रावर होत आहे. एकूण ४२ हजार ५३ विद्यार्थी बारावीची परीक्षा देत आहेत. परीक्षेदरम्यान परीक्षा केंद्रावर होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी कॉपीमुक्त परीक्षा अभियान राबविण्यात येत. उपजिल्हाधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, उपविभागीय अधिकारी तसेच तहसीलदार यांच्या अधिपत्याखाली काही भरारी पथके तैनात करण्यात आली आहेत. याशिवाय शिक्षण विभाग आणि शिक्षण मंडळाचे भरारी पथकांचाही वॉच राहणार आहे. या पथकांना जिल्ह्यातील केंद्रांवर जाऊन परीक्षेच्या वेळी होणाऱ्या गैरप्रकारास प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांकडून दिल्या आहेत. अशा आहेत प्रमुख मागण्याआॅनलाईन संच मान्यतेतील तृट्या दूर करण्यात याव्या. प्रचलित निकषानुसार संच मान्यता द्यावी. कायम अनुदानित तत्वावरील मुल्यांकनास पात्र महाविद्यालयांना अनुदान देण्यात यावे. सन २०११-१२ पासून वाढीव पदांना त्वरित मान्यता द्यावी. इयत्ता अकरावीच्या आॅनलाईन प्रवेशात प्रथम तीन फेऱ्या अनुदानित कराव्यात. कनिष्ठ महाविद्यालयांचे प्रशासन स्वतंत्र करावे. २००५ नंतरच्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी. शिक्षक सेवक योजना करावी आदी मागण्यांचा समावेश आहे.कनिष्ठ महाविद्यालयांच्या विनाअनुदानित शिक्षकांनी मागण्यांच्या पूर्ततेसाठी कामावर बहिष्कार टाकण्याबाबतचे पत्र दिले आहे. मात्र पेपर तपासणीसाठी अनुदानित, कायम अनुदानित अशा दोन्ही शिक्षकांचे आदेश काढले आहेत. मात्र पेपर तपासणीला अुदानित शिक्षकांना प्राधान्य दिले जाईल.- संजय यादगिरे, सचिव, विभागीय शिक्षण मंडळ, अमरावती.