थंडीमुळे आजार वाढले : सर्वाधिक प्रादुर्भाव लहान मुलांना अमरावती : थंडीत वाढत असताना विन्टंर डायरीयांने सुध्दा तोंड वर काढले आहे. थंडीमुळे विन्टंर डायरीयाचा सर्वाधिक प्रभाव लहान बालकांवर झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. सोमवारी अमरावती जिल्ह्यात सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे. थंडीमुळे पसरणारे आजार वाढल्याने घराघरात सर्दी खोकल्यासह अन्य आजारांचे रुग्ण उपचार घेताना आढळून येत आहे. हिवाळ्यातील थंडीमुळे विन्टंर डायरीयाची लागण होण्याची शक्यता आहे. दररोज इर्वीनमध्ये विन्टर डायरीया सोबतच थंडीमुळे होणाऱ्या आजारांचे रुग्ण वाढले आहेत. त्यामध्ये सर्वाधिक रुग्ण लहान बालके असल्याचे निदर्शनास येत आहे. (प्रतिनिधी)
शहरात ‘विंटर डायरिया’ची साथ
By admin | Updated: December 29, 2014 23:33 IST