शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

शहर काँग्रेसची जिल्हाकचेरीवर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 01:13 IST

केंद्र व राज्य शासनाने ऐन दिवाळीच्या तोंडावर गोर-गरिबांना रेशन दुकानातून दिली जाणारी साखर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देनिवेदन : साखरेचा पुरवठा पूर्ववत करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : केंद्र व राज्य शासनाने ऐन दिवाळीच्या तोंडावर गोर-गरिबांना रेशन दुकानातून दिली जाणारी साखर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. भाजप शासनाच्या या निर्णयाचा शहर काँग्रेसने निषेध केला. हा अन्यायकारक निर्णय मागे घेण्याची मागणी करीत जिल्हाकचेरीवर शुक्रवारी धडक दिली. यावेळी माजी आमदार रावसाहेब शेखावत, काँग्रेसचे शहराध्यक्ष किशोर बोरकर यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाºयांना निवेदन सोपविण्यात आले.भाजप सरकारने शेतकºयांना अद्यापही कर्जमाफीचा लाभ दिला नाही. अशातच वाढत्या महागाईमुळे गोरगरीब नागरीकांचे जगणे कठीण झाले आहे. परिणामीे जनतेत संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे हा निर्णय त्वरीत मागे घेण्यात यावा, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. सध्या राज्यभरातील ४५ लाख कुटुंबांना रेशन दुकानातून मिळणारी साखर बंद केली आहे. परिणामी या निर्णयाचा फटका जिल्ह्यातील ३ लाखांवर एपीएल, बीपीएल कार्डधारकांना बसला आहे. प्रत्येकी ५ युनिट याप्रमाणे व्यक्तीनुसार महिन्याकाठी १ लाख ८३ हजार २६२ क्विंटल साखर बंद केली आहे. त्यामुळे शासनाने अंत्योदयसह एपीएल, बीपीएल, कार्डधारकांना रेशन दुकानातून पूर्वरत दिवाळीपूर्वी साखर वाटप करावे, काँग्रेस सरकारच्या काळात देशातील गरिबांसाठी सुरू केलेल्या अंत्योदय योजनेत तीन रूपये किलो तांदूळ, २१ रुपये किलो गहू व १ रुपये किलो ज्वारी ही योजना नियमितपणे सुरू करावी, आदी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्यामार्फत शासनाकडे पाठविले आहे. यासंदर्भात योग्य कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन जिल्हाधिकारी अभिति बांगर यांनी दिले. यावेळी विलास इंगोले, बबलू शेखावत, माजी आ. केवलराम काळे, हरीभाऊ मोहोड, पुरूषोत्तम मुंदडा, अभिनंदन पेंढारी, उत्तमराव भैसने, सुरेश स्वर्गे, चंद्रभागा इंगोले, योगिता गिरासे, राहूल येवले, अक्षय भुयार, मनोज भेले, अनिल माधोगडीया, मिर साजीद अली, भैय्यासाहेब निचळ, बी.आर. देशमुख, नाना सोनी, वंदना कंगाले, देवायनी कुर्वे, संजय वाघ, साहेबराव घोगरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.रेशन दुकानासमोर लागणार फलकशहरासह जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानांमध्ये धान्याचे दरफलक नाहीत. त्यामुळे रेशनकार्ड धारकांना दुकान उघडण्याची व बंद होण्याची वेळ कळत नाही. एवढेच नव्हे तर दूकाने बरेचदा बंद असतात. त्यामुळे धान्यापासून लाभधारक वंचित राहतात, ही बाब लक्षात घेता रविवारीही दुकाने सुरू ठेवावीत. फलकावर तक्रारीसाठी टोल फ्रि क्रमांक,संर्पकासाठी अधिकाºयांचे नाव व मोबाईल नंबर असावा, अशी मागणी किशोर बोरकर यांनी केली. ही मागणी जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी तुर्तास मान्य केली.