शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

शहराला वायू प्रदूषणाचा धोका नाही

By admin | Updated: June 4, 2014 23:23 IST

जागतिक आरोग्य संघटनेच्यावतीने जगातील ९१ देशामधील १६00 शहरांचा हवेच्या गुणवत्तेबाबत नुकताच अहवाल प्रकाशित करण्यात आला. मात्र या अहवालात अमरावतीला वायू प्रदूषणाचा धोका नाही,

मुलाखत : महापालिका पर्यावरण संवर्धन अधिकार्‍यांची माहितीअमरावती : जागतिक आरोग्य संघटनेच्यावतीने जगातील ९१ देशामधील १६00 शहरांचा हवेच्या गुणवत्तेबाबत नुकताच अहवाल प्रकाशित करण्यात आला. मात्र या अहवालात अमरावतीला वायू प्रदूषणाचा धोका नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. ९७ मायक्र ोग्रॅम क्युबिक ३ हे वायू प्रदूषणाचे प्रमाण विकसनशील शहरासाठी धोकादायक नसल्याचा माहिती महापालिकेचे पर्यावरण संवर्धन अधिकारी महेश देशमुख यांनी लोकमतशी बोलताना दिली.     गुरुवार ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिन असल्याच्या पार्श्‍वभूमीवर देशमुख यांच्याशी शहराच्या वायूप्रदूषणाबाबत चर्चा केली असता त्यांनी वायूप्रदूषणाचा शहराला कोणताही धोका नसल्याचे सांगितले. हवेच्या गुणवत्ताबाबतचा अहवाल प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत गोळा केला जातो. त्यानंतर हा अहवाल कें द्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळास पाठविला जातो. ही आकडेवारी जागतिक आरोग्य संघटनेला दिली जाते. ऐतिहासिक शहरे, औद्योगिक केंद्र, खानकाम उद्योग असणारी शहरे, किंवा विभागीय ठिकाणांचा हवेचा गुणवत्तेबाबतची तपासणी केली जाते. त्याचअनुषंगाने २00८ ते २0१३ या कालावधीत अमरावती शहराच्या हवेच्या गुणवत्तेची आकडेवारी जागतिक आरोग्य संघटनेला कळविण्यात आले. जागतिक पातळीवर हवा प्रदूषणाबाबत विकसित देश, विकसनशील देश व अविकसित देश अशी विभागणी करण्यात आली. विकसनशील देशाची औद्योगिकीकरणाची तीव्र गती, लोकसंख्यावाढ, कच्चा मालाची उपलब्धता, पक्क्या मालाची बाजारपेठ, जीवनशैलीतील बदल आदी कारणामुळे जागतिक पातळीवर कुठल्याही विकसनशील देशाची हवा प्रदूषण पातळी ही ७0 मायक्रो ग्रॅम क्युबिक ३ ते १५0 मायक्रो ग्रॅम क्युबिक ३ च्या दरम्यान म्हणजे काही प्रमाणात अधिक आढळून आले. भारताचा विचार केल्यास जागतिक आरोग्य संघटनेच्या मानांकनानुसार पर्टिक्युलेट मॅटर १0चे हवेतील प्रमाण औद्योगिक क्षेत्रात १२0 मायक्रो ग्रॅम क्युबिक ३, रहिवासी क्षेत्रात ६0 मायक्रो ग्रॅम क्युबिक ३ पर्यंंत परमिशेबल आहे. अमरावती शहराचे प्रमाण ९७ मायक्रो ग्रॅम क्युबिक ३ असे असून काहींना हे प्रमाण जास्त वाटत असले तरी सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड, एसपीएमचे प्रमाण परमिशेबल लिमिटपेक्षा कमी आहे. प्रदूषण मानांकाची उच्चतम पातळी विकसित देशामध्ये जास्तीची असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालातून लक्षात असल्याचे देशमुख यांनी सांगितले. दरवर्षी वायूप्रदूषणामुळे जागतिक पातळीवर १५ लक्ष लोक मृत पावल्याचे या अहवालात नमूद आहे. आरोग्य संपन्न जीवन जगण्यासाठी हवेची स्थिती महत्त्वाची आहे. साधारणत: हवेची स्थिती विरळ, लोकसंख्येचे ठिकाणी, निसर्गाचे प्राबल्य असणारे ठिकाण हे अधिक चांगले ठरते. यामध्ये चिखलदरा, मेळघाट, सेमाडोह किंवा दुर्गम भागातील वसाहती यांचा समावेश केला जाऊ शकतो. आरोग्यसंपन्न जीवन जगण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. परंतु निसर्गाने उपलब्ध करून दिलेल्या साधन सामग्रीचा उपयोग करूनच पुढे गेल्यास पर्यावरण संतुलन कायम राहील, असे देशमुख यांनी सांगितले.