शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

शहर विकास आराखडा सर्वेक्षण युद्धस्तरावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2016 08:33 IST

शहराची वाढती लोकसंख्या, मूलभूत सोयीसुविधा, आरोग्य, शिक्षण, वाहतूक आदी बाबींचा समावेश करुन शहर विकास आराखडा (डिपीआर) तयार करण्याला युद्धस्तरावर प्रारंभ झाला आहे.

२० वर्षांचा वेध घेणार : डिजिटायझेशन मॅपिंग, सर्वेक्षण सुरुअमरावती : शहराची वाढती लोकसंख्या, मूलभूत सोयीसुविधा, आरोग्य, शिक्षण, वाहतूक आदी बाबींचा समावेश करुन शहर विकास आराखडा (डिपीआर) तयार करण्याला युद्धस्तरावर प्रारंभ झाला आहे. पुढील २० वर्षांचा वेध घेत नागरिकांच्या समस्या, प्रश्नांना यात प्राधान्य दिले जात असून मौजे प्रगणेनुसार सर्वेक्षण सुरु करण्यात आले आहे. एकूणच शहराचे डिजीटायलेझन मॅपिंग केले जाईल. नगर विकास विभागाने मान्यता दिल्यानुसार १९९२ नंतर आता २०१५ मध्ये अमरावती शहराचा विकास आराखङा तयार केला जात आहे. महापालिका हद्दीत असलेल्या नागरी वस्त्यांचे सर्वेक्षण केले जात आहे. यात अमरावती, बडनेरा शहरासह १७ समाविष्ट खेड्यांचेही सर्वेक्षण केले जाणार असून मूलभूत सुविधांना प्राधान्य दिले जाणार आहे. शहर विकास आराखड्याचे सर्वेक्षण आणि डिजीटायझेशन मॅपिंगची जबाबदारी पुणे येथील मोनार्च सर्वेअर इंजिनियरिंग प्रा. लि. कडे सोपविण्यात आली आहे. या कंपनीने मौजे शेगाव भागातून सर्वेक्षणाचे काम देखील सुरु केले आहे. नवीन, जुन्या नागरी वस्त्यांची वस्तुस्थिती सर्वेक्षणात नमूद केली जाणार आहे. सद्याची लोकसंख्या आणि येत्या २० वर्षांनंतर शहराचे रुपडं कसे राहील, ही बाब डिपीआरमध्ये समाविष्ट केली जात आहे. एमआरटीपी अ‍ॅक्टनुसार विद्यमान जमिनीचा वापर नकाशा तयार करुन तो नगररचना विभागाच्या चमुकडून मंजूर करुन घेतला जाणार आहे. शहराचा डिपीआर तयार करण्यासाठी राज्य शासनाने नाशिक येथील नगर रचना विभागाची विशेष चमू अमरावतीत पाठविली आहे. या चमुचे कामकाजही सुरु झाले आहे. मात्र, डिपीआरचे सर्वेक्षण आणि डिजीटायझेनचे मॅपिंगचा कालावधी प्रशासनाने मोनार्च कंपनीला १० महिने ठरवून दिला आहे. खरे तर शहराचा डिपीआर तयार करण्यासाठी २०१२ मध्ये सर्वेक्षण करुन तो शासनाच्या मान्यतेसाठी पाठविणे आवश्यक होते, तथापि, महापालिका प्रशासनाच्या दिरंगाईने तीन वर्षे तो उशिरा तयार केला जात आहे. (प्रतिनिधी)