शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

शहर सीसीटीव्हीच्या नजरकैदेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2018 22:43 IST

शहरातील गुन्हेविषयक घडामोडींवर लक्ष ठेवण्यासाठी लवरकच सीसीटीव्ही लावण्यात येणार आहे. यासाठी जिल्हाधिकारी यांनीही प्रस्तावाला मान्यता दिल्याने पोलीस विभागाच्या प्रस्तावाला जिल्हा नियोजन समिती (डीपीसी) कडून हिरवी झेंडी मिळाली आहे. ९० लाख ९२ हजारांच्या निधीतून शहरातील प्रमुख ठिकाणी तब्बल ३६ सीसीटीव्ही लावण्यात येणार आहेत.

ठळक मुद्दे९९ लाखांचा निधी : डीपीसीकडून हिरवी झेंडी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहरातील गुन्हेविषयक घडामोडींवर लक्ष ठेवण्यासाठी लवरकच सीसीटीव्ही लावण्यात येणार आहे. यासाठी जिल्हाधिकारी यांनीही प्रस्तावाला मान्यता दिल्याने पोलीस विभागाच्या प्रस्तावाला जिल्हा नियोजन समिती (डीपीसी) कडून हिरवी झेंडी मिळाली आहे. ९० लाख ९२ हजारांच्या निधीतून शहरातील प्रमुख ठिकाणी तब्बल ३६ सीसीटीव्ही लावण्यात येणार आहेत.शहरात वाढत्या गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्याच्या उद्देशाने सीसीटीव्ही बसविण्याचा प्रस्ताव तयार केला होता. कायद्याचे उल्लंघन करणारे व गुन्हेगारी रोखण्यासाठी हे सिसीटीव्ही उपयोगी पडणार असून, सीसीटीव्हीची पोलीस तपासात मोठी मदत होणार आहे. त्याअनुषंगाने शहरातील प्रमुख व महत्त्वाच्या चौकांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला होता. राजकमल, जयस्तंभ चौक, राजापेठ, मालवीय चौक, इर्विन चौक, पंचवटी चौक, अशा १४ ठिकाणी ३६ सीसीटीव्ही लावण्याच्या प्रस्तावाला मान्यता मिळाली असून, सीसीटीव्ही बसविण्याचा निधीसुध्दा पोलीस विभागाला लवकरच प्राप्त होणार आहे. त्याअनुषंगाने पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी पुढील कार्यवाहीची प्रक्रिया सुरू केली आहे.पोलीस मुख्यालयात नियंत्रण कक्षशहरात सीसीटीव्ही लागल्यानंतर त्याचे नियंत्रण पोलीस मुख्यालयातील नियंत्रण कक्षातून केले जाणार आहे. सीसीटीव्हीत कैद होणाऱ्या प्रत्येक बाबीवर पोलीस मुख्यालयातील पोलीस अधिकारी व कर्मचारी लक्ष ठेवून राहणार आहे. काही घडामोडी आढळून आल्यास त्यावर तत्काळ कार्यवाही करण्यात येणार आहे.