शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

शहरबस दरवाढ दुपटीने!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2018 00:55 IST

शहर बससेचे दर वाढविण्याचा निर्णय मागील आमसभेत घेण्यात आला. त्यानंतर लगेच शहर बस सेवेचे दर दुपटीने वाढविण्यात आले. यासाठी डिझेल दरवाढीचे कारण देण्यात आले असले तरी प्रवास भाडेवाढ केली असली तरी प्रवाशांना सुविधेचा अभाव असल्याने नागरिक संताप व्यक्त करीत आहे.

ठळक मुद्देप्रवाशांना सुविधा कुठे? : डिझेलच्या दरवाढीचे दर्शविले कारण

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहर बससेचे दर वाढविण्याचा निर्णय मागील आमसभेत घेण्यात आला. त्यानंतर लगेच शहर बस सेवेचे दर दुपटीने वाढविण्यात आले. यासाठी डिझेल दरवाढीचे कारण देण्यात आले असले तरी प्रवास भाडेवाढ केली असली तरी प्रवाशांना सुविधेचा अभाव असल्याने नागरिक संताप व्यक्त करीत आहे.शहर बससेवेच्या प्रवासी वाहतुकीचे दर डिझेल ५६ रूपये लिटर असतानाचे आहेत. आता डिझेलचे ७५ दर झाल्याने शहर बससेवेच्या प्रवासी भाड्यात वाढ करण्याचा प्रस्ताव यापूर्वीच्या आमसभेत सभापतींनी मांडला असता, ही भाववाढ कशा पद्धतीची राहील, याविषयीचा प्रस्ताव पहिले सभागृहासमोर ठेवावा, अशी मागणी काही सदस्यांनी केली होती. मात्र, याच आमसभेत प्रवास भाडेवाढीस मंजुरी दिली होती. त्यामुळे शहर बस वाहतुकीत सुविधा वाढवाव्यात, अशी मागणी होत आहे.महापालिकेचा शहर बससेवेचा कंत्राट ज्या कंपनीकडे आहे, त्यांच्याद्वारा अनेक मार्गांवर बससेवा मिळत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. या कंपनीद्वारा शहरात केवळ २५ बसेसद्वारा वाहतूक सुविधा देण्यात येते. मात्र, शहराचा विस्तार झाल्याने ही सेवा तोकडी पडत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.महापालिका क्षेत्रात सन २००६ पासून शहर बससेवा उपक्रम राबवित आहेत. प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाद्वारा १ मार्च २०१४ पासून सुधारित तिकिटांच्या दरपत्रकास मंजुरी प्रदान केल्यानंतर याच दराने आतापर्यंत तिकीट विक्री करण्यात येत होती. डिझेलचे दर व वाहानाचे सुटे भाग यांच्या दरात वाढ झाल्याने तिकिटांच्या दरात वाढ करण्याची मागणी कंत्राटदाराने केली होती.या दरवाढीच्या प्रस्तावास आयुक्तांनी एक सप्टेंबर व प्राधिकरणाने ९ आॅक्टोबर रोजी मंजुरी प्रदान केलेली आहे. आता आमसभेच्या मंजुरीनंतर ही दरवाढ लागू करण्यात आली आहे. मात्र, नागरिकांचा याला विरोध आहे.अशी झाली दरवाढसध्या दोन किमी अंतरापर्यंत प्रौढांचे आठ रूपये, तर बालकांचे चार रूपये, दोन ते चार किमी अंतरापर्यंत प्रौढांचे दहा रूपये, तर बालकांचे पाच रूपये, चार ते सहा किमी अंतरापर्यंत प्रौढांचे १३ रूपये, तर बालकांचे सात रूपये, सहा ते १० किमी अंतरांपर्यंत प्रौढांसाठी १५ रूपये व बालकांसाठी आठ रूपये, दहा ते १४ किमी अंतरापर्यंत प्रौढांसाठी २० रूपये, तर बालकांसाठी १० रूपये, १४ ते १८ किमी अंतरापर्यंत प्रौढांसाठी २५ रूपये, बालकांसाठी १३ रूपये व १८ ते २२ किमी अंतरापर्यंत प्रौढांसाठी २८ रूपये व बालकांसाठी १४ रूपयांनी ही दरवाढ झालेली आहे.२० किमीपर्यंत सेवाही विस्तारणारशहरालगतच्या नांदगाव पेठ एमआयडीसी, वलगाव, भातकुली, ांजनगाव बारी, कोंडेश्वर, लोणी आणि एसआरपीएफजवळील वैष्णोदेवी मंदिरापर्यत शहर बस सेवा सुरू करण्यात येणार आहे. या सर्व ठिकाणावरून अमरावती शहरासाठी ही बससेवा राहणार असल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. शहरालगतच्या या भागातील नागरिकांचे दैंनदिन व्यवहार शहराशी असतांना या ठिकाणी बससेवेचा अभाव असल्यामुळे नागरिकांना अ‍ॅटोशिवाय पर्याय नव्हता . याविषयीचा प्रस्ताव जिल्हा वाहतुक प्रधिकरणाकडे पाठविलाअसल्याची माहिती आहे.