शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती खड्ड्यांचे शहर

By admin | Updated: September 27, 2016 00:16 IST

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारात येत असलेले शहरातील अनेक रस्ते उखडले आहेत.

बांधकाम विभागाचे दुर्लक्ष : अपघात घडण्याची प्रतीक्षासंदीप मानकर अमरावतीसार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारात येत असलेले शहरातील अनेक रस्ते उखडले आहेत. त्यामुळे अमरावती खड्ड्यांचे शहर, अशी ओळख या शहराची झाली आहे. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंत्यांचे दुर्लक्ष होत असून रस्त्यांच्या दुरुस्तीवर कोट्यवधींचा खर्च केला जातो. तरीही रस्ते का उखडले जातात, हा प्रश्न अंबानगरीच्या जनतेला पडला आहे. अमरावती-नागपूर, अमरावती- परतवाडा हा राज्य महामार्ग आहे. स्थानिक शहरातून जाणारा रस्ता अमरावती मध्यवर्ती बस आगारापासून तर पंचवटी चौकापर्यंतच्या रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. या रस्त्यावर डांबरीकरण का करण्यात आले नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. हा रस्ता झाल्यानंतर पहिल्याच पावसात सार्वजनिक बांधकाम विभागाची पोलखोल झाली आहे. राजापेठकडून बडनेराकडे जाणाऱ्या रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. ये-जा करणाऱ्या वाहनांना यामुळे अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच रस्त्यावर असलेले खड्डे व त्यामध्ये साचलेल्या पावसाच्या पाण्यामुळे वाहनांचे किरकोळ अपघातही होत आहेत. राजापेठ चौकातील रस्ता पूर्णपणे उखडला आहे. शनिवारी कोसळलेल्या पावसाचे पाणी या रस्त्यावरील खड्डयांमध्ये साचले आहे. यामुळे नागरिकांना तारेवरची कसरत करीत वाहने चालवावी लागत आहेत.अमरावती शहरातून जाणाऱ्या येथील विद्युतनगरपासून तर वलगावपर्यंत मुख्य महामार्ग हा अतिशय खराब झाला, असून या रस्त्याच्या मधोमद चाकोऱ्या पडल्या आहेत. त्यामुळे दुचाकीचालकांना तारेवरची कसरत करीत वाहने चालवावी लागत आहे. हा रस्ता प्रस्तावित करण्यात आला असून याकरिता निधीच नसल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे अंबानगरीचे रस्ते विकासाच्या प्रतीक्षेत आहेत. हा विकास होणार केव्हा, असा प्रश्न विचारला जात आहे. (प्रतिनिधी)अनेकदा अपघात, प्राणही गेले पण समस्या मात्र ‘जैसे थे’नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात कर वसूल केला जातो. मात्र, त्यानुसार सोयी पुरविल्या जात नाहीत. शहरातील जवळपास सर्वच रस्त्यांची दुर्दशा पाहता हेच का अमरावतीचे स्मार्टनेस, असा प्रश्न पडतोच. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अनेकदा अपघात झालेत. काही किरकोळ तर काही गंभीर अपघात झाले. अनेकांचे प्राणही गेलेत. कित्येकांना अपंगत्व आले. मात्र, तरीही शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांची समस्या काही मार्गी लागत नाही.