शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
3
बड्या उद्योगपतीकडून फडणवीसांचा 'पंतप्रधान' म्हणून उल्लेख; CM स्वतःही अवाक्! नेमकं काय घडलं?
4
कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
5
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
6
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
7
YouTube वर ५ लाख सबस्क्रायबर्स होताच 'महाभंडारा'; दीड किमीच्या रांगा, ५ हजार लोकांची गर्दी
8
गौरव म्हणाला, 'रात्र झालीये इथेच थांबा'; मैत्रीण बाहेर गेली अन् २३ वर्षीय खेळाडू तरुणीवर हॉटेलमध्ये बलात्कार
9
वाळवंटी सौदीच्या बर्फाने डाव मांडला! विश्वास बसेना, पण अरब व्हिडीओ पोस्ट करू लागले...; उणे ४ अंशांवर गेला पारा
10
'AQI आणि फुफ्फुसांच्या आजारांमध्ये थेट संबंध नाही...', राज्यसभेत पर्यावरण राज्यमंत्र्यांचे उत्तर
11
बंदुकीच्या धाकावर अल्पवयीन मुला-मुलीला शारीरिक संबंधास पाडले भाग; MMS बनवून पैसे उकळले
12
बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
13
गुडन्यूज! 'लाफ्टर क्वीन' भारती सिंह दुसऱ्यांदा झाली आई, 'गोला'नंतर आता मुलगा की मुलगी?
14
"तू घाणेरडे Video बघतोस, आमच्याकडे डेटा...", DCP असल्याचं सांगून तरुणाला ४६ हजारांचा गंडा
15
जीएसटी कपातीचा फायदा संपत चालला...! एमजीने पहिली घोषणा केली, जानेवारीपासून कारच्या किंमतीत होणार मोठी वाढ
16
जर्मनी दौऱ्यात राहुल गांधींना Rolls-Royce ची भुरळ; भारतात 'ही' लक्झरी कार कितीला मिळते?
17
एआयमुळे कोणत्या नोकऱ्यांना सर्वाधिक धोका, कोणत्या नोकऱ्यांची घेतोय जागा? जाणून घ्या
18
महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामा
19
"उंच भरारी, पण पाय जमिनीवर!" आजारी असताना एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी केली मदत; अमृता खानविलकर भारावली
20
'३ इडियट्स'च्या सीक्वलचे शीर्षक असेल '४ इडियट्स'! आमिर खानच्या सिनेमासाठी निर्माते चौथ्या अभिनेत्याच्या शोधात
Daily Top 2Weekly Top 5

पूर्णा काठावरील नागरिक भयग्रस्तच

By admin | Updated: July 29, 2016 00:24 IST

दोन वर्षांपूर्वी पूर्णानदीला आलेल्या महापुराने ब्राम्हणवाडा थडी, चिंचोली, देऊरवाडा येथील नदीकाठी राहणाऱ्या अनेक नागरिकांचे घरे उध्वस्त झाले असून

दोन वर्षांपूर्वीचा प्रलय : उद्ध्वस्त घरे अद्यापही तशीच, नागरिकांना सतावते पुराची भीती विलास खाजोने ब्राम्हणवाडा थडी दोन वर्षांपूर्वी पूर्णानदीला आलेल्या महापुराने ब्राम्हणवाडा थडी, चिंचोली, देऊरवाडा येथील नदीकाठी राहणाऱ्या अनेक नागरिकांचे घरे उध्वस्त झाले असून शासनाच्या दुर्लक्षामुळे मोडलेल्या झोपड्यांमध्ये भयकंप स्थितीत अनेक नागरिक जीवन जगत आहे. दोन वर्षांपूर्वी २७ जुलै २०१४ ला पूर्णा एकट्या ब्राम्हणवाडा थडी येथील १७१ कुटुंबांतील ८५५ सदस्यांना या पुराचा फटका बसला. काही लोकांचे पूर्णत: तर काहींचे अंशत: घराचे नुकसान झाले. तात्पुरती मलमपट्टी म्हणून तहसील कार्यालयाच्यावतीने या १७१ कुटुंबांना खाण्यापिण्यासाठी निधी दिला. सामाजिक जाणिवेतून काही सामाजिक संघटनांनी या कुटुंबांना मदत केली. याकाळात काही राजकीय नेत्यांनी त्या काळात या ठिकाणी येऊन मोठमोठी आश्वासने दिली. परंतु प्रत्यक्षात या पूरग्रस्तांचे पूनर्वसन करण्यासाठी शासनस्तरावर ठोस पावले अजूनपर्यंत न उचलल्याने दोन वर्षे उलटूनही पूरग्रस्त कुटुंबे चंद्रमौळी झोपड्यांमध्ये भयग्रस्त स्थितीत जीवन जगत आहेत. या १७१ कुटुंबांपैकी १०० कुटुंबांनी पालकमंत्री, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्तांनायांना त्यांनी ५ आॅगस्टला निवेदन देऊनही शासनाने याची दखल न घेतल्याने असे जीणे जगावे लागत असल्याचे पूरग्रस्तांचे म्हणणे आहे. पूर ओसरल्यानंतर तातडीने ग्रामसभा घेऊन पूरग्रस्तांचे पुनर्वसन करावे, असा ठरावा ग्रामसभेने घेऊन तो शासनाकडे पाठविण्यात आला. परंतु जागा उपलब्ध नसल्याचे कारण दाखवून शासनाने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यासंबंधी पुढे कारवाई केली नाही. आम्ही पूरग्रस्तांच्या बाजूने आहोत. गरज भासल्यास नागरिकांसाठी पुन्हा शासनस्तरावर प्रयत्न करू. - नंदकिशोर वासनकर, सरपंच, ब्राम्हणवाडा थडी मी म्हातारा असून माझेकडून कोणतेही कामधंदा होत नसल्याने मी शासनाचे श्रावणबाळ योजनेवर जगत आहे. पूर्णेच्या पुरात घर वाहून गेल्याने मला राहायची सोय नाही. मी नातेवाईकांकडे राहून दिवस काढीत आहे. शासनाकडून घरकुलाची अपेक्षा आहे. - महादेव जांगतोड, पूरग्रस्त, ब्राम्हणवाडा थडी पूर्णेच्या महापुराने आमचे सर्वस्व नेले. घर तर पडलेच त्यासोबत घरातील १०० क्विंटल कांदे, गहू व भांडेकुंडी सर्व वाहून गेले. आज आम्ही तात्पुरती खोली बांधून त्यामध्ये सर्व कुटुंब राहत आहोत. शासनाने घरकूल द्यावे किंवा पुनर्वसनामध्ये घर बांधून द्यावे. - महादेव यावले, पूरग्रस्त, ब्राम्हणवाडा थडी