शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
3
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
4
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
5
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
6
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
7
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
8
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
9
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
10
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
11
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
12
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
13
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
14
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
15
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
16
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
17
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
18
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
19
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली

३०० स्कूल बसच्या परमीटवर गंडांतर

By admin | Updated: June 13, 2016 23:59 IST

शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक सुरक्षित व्हावी, यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाने स्कूल बस व व्हॅनची तपासणी मोहीम सुरु केली आहे.

आरटीओेंची धडक तपासणी : १५ जूनची ‘डेडलाईन’अमरावती : शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक सुरक्षित व्हावी, यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाने स्कूल बस व व्हॅनची तपासणी मोहीम सुरु केली आहे. ही तपासणी मोहीम १५ जूनपर्यंत चालणार असून वाहन तपासणीकडे पाठ फिरविणाऱ्या तब्बल ३०० पेक्षा अधिक वाहनांचे परमीट रद्द होण्याची शक्यता आहे, तसे संकेत अधिकाऱ्यांनी दिले आहेत. शहरात ६३० बस व व्हॅन असून त्यातील ३३६ वाहनांचीच तपासणी करण्यात आली आहे. उर्वरित ३०० वाहनधारकांनी त्यांची वाहने तपासणीसाठी अद्याप आणलेली नाहीत. त्यामुळे त्यांच्याविरूद्ध कठोर कारवाई करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी दरवर्षी आरटीओतर्फे ही मोहीम राबविली जाते. यंदा तर उच्च न्यायालयाने निर्देश दिले आहेत. ३१ मे ही पुनर्तपासणीची डेडलाईन होती. मात्र, त्यात आता वाढ करण्यात आली असून १५ जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या स्कूल बस व व्हॅनची फेरतपासणी शाळा सुरु होण्यापूर्वी करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार ३३६ वाहनांची तपासणी पूर्ण झाली आहे. १५ जूनपर्यंत फेरतपासणीची मुदत दिली असून त्यापूर्वी वाहन सादर न केल्यास संबंधितांचा परवाना निलंबित केला जाणार आहे. पुढे जाऊन संबंधीत स्कूल बस व व्हॅनचे परमीट रद्द करण्याची कारवाई यात प्रस्तावित आहे. विद्यार्थी संख्येवर निर्बंध कोणाचा ?सध्या स्कूल बस व व्हॅनच्या फेरतपासणीद्वारे उपलब्ध सुविधांचा आढावा घेतला जात आहे. मात्र, या वाहनातून क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची ने-आण केली जाते. व्हॅनमध्ये तर विद्यार्थी अक्षरश: कोंबले जातात. अपघात किंवा अप्रिय घटना टाळण्यासाठी स्कूल बस आणि व्हॅनमध्ये पुरेशा सुविधा आवश्यकच आहेत. मात्र, त्यावेळी विद्यार्थ्यांच्या दाटीवाटीच्या प्रवासावर कायमस्वरुपी तोडगा निघावा, अशी अपेक्षा पालकांची आहे. या हव्यात सुविधाविद्यार्थ्यांची वाहतूक सुरक्षित व्हावी यासाठी व्हॅन आणि स्कूल बससाठी राज्य सरकारने नियमावली तयार केली आहे. यात स्पिड गव्हर्नर, बे्रक, फर्स्ट एड बॉक्स, ईमर्जन्सी एक्झिट, वायपर आदी महत्त्वपूर्ण पैलू आहेत. व्हॅन आणि स्कूल बसमध्ये या सुविधा आहेत की नाही, यासाठी आरटीओकडून ही तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. सुट्टीच्या कालावधीत आणि शाळा सुरु होण्यापूर्वी ही फेरतपासणी करण्याचे स्पष्ट निर्देश आहेत. स्कूल बस आणि व्हॅनमध्ये अग्निरोधक यंत्रे, दप्तरे ठेवण्याची जागा, रॉड व अन्य सुविधा बंधनकारक आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. सोमवारपर्यंत ३३६ वाहनाची फेरतपासणी करून घेतली आहे. उर्वरित वाहनधारकांनी १५ जूनपूर्वी तपासणी करून फिटनेस प्रमाणपत्र घ्यावे, अन्यथा वाहनाचे परमिट रद्द करण्याची कारवाई करण्यात येईल. - विजय काठोळे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, अमरावती.