शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

नरबळी प्रकरणाची सीआयडी चौकशी करा

By admin | Updated: August 24, 2016 00:02 IST

पिंपळखुटा येथील शंकर महाराज आश्रमशाळेतील विद्यार्थी प्रथमेश सगणे व अजय वणवे या विद्यार्थ्यांचा नरबळी देण्यासाठी त्यांच्यावर जीवेघणे हल्ले करण्यात आलेत.

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : अ.भा.अंधश्रद्धा निर्मूलन समितीची मागणीअमरावती : पिंपळखुटा येथील शंकर महाराज आश्रमशाळेतील विद्यार्थी प्रथमेश सगणे व अजय वणवे या विद्यार्थ्यांचा नरबळी देण्यासाठी त्यांच्यावर जीवेघणे हल्ले करण्यात आलेत. याप्रकरणाची आश्रमाची सीआयडी चौकशी करण्यात यावी, अशी मागणी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या तिवसा शाखेने केली आहे.जिल्हाधिकारी किरण गित्ते यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात धामणगाव रेल्वे तालुक्यातील पिंपळखुटा येथील शंकर महाराज आश्रम ट्रस्टद्वारा संचालित वसतिगृहात शिकणारा इयत्ता पाचवीतील विद्यार्थी प्रथमेश सगणे याचा वसतिगृहातील कर्मचारी सुरेंद्र मराठे व त्याच्या साथीदाराने ब्लेडने गळा चिरून नरबळी देण्याचा प्रयत्न केला. प्रथमेश मृत्युशी झुंज देत आहे, तर अजय वणवे जखमी आहे. या विद्यार्थ्यांसोबत झालेले कृत्य अतिशय घृणास्पद आहे. या घटनेचा अंनिसने तीव्र शब्दांत निषेध केला आहे. विद्यार्थ्यांवर झालेले हल्ले आश्रम ट्रस्टच्या आवारात घडल्याने त्याला शंकर महाराज ट्रस्ट व त्यांचे आश्रम ट्रस्ट जबाबदार आहे. त्यामुळे या घटनेच्या अनुषंगाने केंद्रीय अन्वेषण विभागामार्फत आश्रमाची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच प्रथमेश सगणे व अजय वणवे यांच्यावरील हल्ल्याची सीआयडी चौकशी व्हावी, या हल्ल्यातील आरोपींना कठोर शासन व्हावे, शंकर महाराज आश्रमातील ट्रस्टी, पदाधिकारी व कर्मचाऱ्यांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, शंकर महाराज आश्रम ट्रस्टचे सर्व आर्थिक स्त्रोत, आर्थिक व्यवहाराची चौकशी व्हावी, शंकर महाराज आश्रम ट्रस्ट व शैक्षणिक संस्थांवर बंदी घालावी आदी मागण्या सादर निवेदनात करण्यात आल्या आहेत. यावेळी अंनिसचे तालुका अध्यक्ष रवींद्र निंघोट, मोझरीचे शाखाध्यक्ष शफीक शहा, अंकुश वाघ, संतोष निमकर, अभिजित भेलकर, गणेश भुरे, योगेश पाटील, सुनील राऊत, योगेश लोणकर, अमित खारोडे, हेमराज बेलकर, सेवक भुरे, मनोज हटवार, दिलीप छापामोहन, ओमप्रकाश वाघमारे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)