शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

सिनेमाही माणसांना अंतर्बाह्य बदलवितो; गौरी कोंगे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 11:03 IST

माणसे बदलविण्याची जेवढी ताकद पुस्तकांमध्ये आहे, त्याच ताकदीने सिनेमादेखील माणसांत अंतर्बाह्य बदल घडवून आणतो, असे मत प्रख्यात मराठी सिनेअभिनेत्री गौैरी कोंगे हिने ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.

ठळक मुद्देमल्टिप्लेक्सचे दर सामान्यांच्या आवाक्याबाहेर

संतोष कुंडकर ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : माणसे बदलविण्याची जेवढी ताकद पुस्तकांमध्ये आहे, त्याच ताकदीने सिनेमादेखील माणसांत अंतर्बाह्य बदल घडवून आणतो, असे मत प्रख्यात मराठी सिनेअभिनेत्री गौैरी कोंगे हिने ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.कापूस कोंड्याची गोष्ट, रंगा पतंगा, डिस्को सन्या, ताटवा, आईचा गोंधळ, ईरादा पक्का, बाबू बॅन्ड बाजा, तुह्या धर्म कोन्चा?, जाणिवा, ३.५६ किल्लारी, लाठी, लॉस्ट अँड फाऊंड अशा एकापेक्षा एक दर्जेदार मराठी सिनेमांत आपल्या अभिनयाची छाप सोडणाऱ्या गौरीचे आणखी नऊ मराठी चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहेत. एक ते चार बंद, श्रीदेवी फटाका, लेथ जोशी, लाडू घ्या लाडू, रेडू, व्हिडिओ पार्लर, मातंगी, चिवटी, नागरिक अशी या चित्रपटांची नावे आहेत.एका कार्यक्रमानिमित्त गौैरी वणी येथे आली असता, तिने चित्रपट क्षेत्रातील अनेक बाबींवर प्रकाश टाकला. मराठीत आशयघन सिनेमांची निर्मिती होते; परंतु अशा सिनेमांना प्रेक्षक मिळत नाहीत. याउलट विनोदी धाटणीतील किंवा आयटम साँग असलेले हिंदी चित्रपट करोडोचा व्यवसाय करतात. मराठी सिनेमांना थिएटर मिळत नाही. उत्तम मराठी सिनेमा सर्वत्र प्रदर्शित व्हावा, ही आमची तगमग असते. परंतु मल्टिप्लेक्समध्ये सिनेमा लागला तर त्याचे दर सामान्यांच्या आवाक्याबाहेर असतात. या आणि अशा अनेक कारणांनी मराठीतील सिनेमा प्रेक्षकांपर्यंत पोहचत नाही. मराठी सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर काही दिवसांतच तो कुठल्यातरी चॅनलवरून दाखविला जातो. त्यामुळेदेखील प्रेक्षक थिएटरपर्यंत जात नाहीत. पुणे येथे राहणाऱ्या गौरीच्या घरात अभिनयाची कोणतीही पार्श्वभूमी नाही. शाळा, कॉलेजातील स्नेहसंमेलनांमधील नाटकात काम करता करता पुढे व्यावसायिक नाटकं व त्यानंतर थेट मराठी सिनेमात एन्ट्री असा तिचा सारा रूपेरी प्रवासच थक्क करणारा आहे.

टॅग्स :cinemaसिनेमा