शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
3
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
4
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
5
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
6
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
7
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
8
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
9
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
10
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
11
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
12
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
13
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
14
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
15
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
16
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
17
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
18
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
19
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली

आश्रमाची करा सीआयडी चौकशी

By admin | Updated: August 13, 2016 00:00 IST

पिंपळखुटा येथील शंकर महाराजांच्या आश्रमाची गुन्हे अन्वेषण विभागामार्फत (सीआयडी) चौकशी करण्यात यावी, ...

ठराव पारित : धामणगावात मातंग समाजाची बैठकअमरावती : पिंपळखुटा येथील शंकर महाराजांच्या आश्रमाची गुन्हे अन्वेषण विभागामार्फत (सीआयडी) चौकशी करण्यात यावी, या प्रमुख मागणीसह इतर महत्त्वपूर्ण मागण्यांचा ठराव मातंग समाजाच्या धामगणाव रेल्वे येथील सभेत शुक्रवारी सायंकाळी पारित करण्यात आला. महिलांचीही उल्लेखनीय उपस्थिती असलेल्या या सभेत प्रथमेशवर झालेल्या अन्याविरुद्ध आक्रमक भाषणे झालीत. उमेश भुजाडणे, कमला वानखडे, विनोद तिरीले, संतोष वाघमारे, सुरेश गायकवाड, नीलेश वानखडे, नागोराव बिहाडे, रेखा वानखेडे, सीमा पायघन, छाया बिहाडे, रजनी वानखडे यांच्यासह अनेकांनी अन्यायाविरुद्धच्या लढ्यात जान फुंकली. प्रथमेशवर झालेला अन्याय भयंकर आहे. मातंग समाजाच्या कुण्या विद्यार्थ्यांवर आजवर उद्भवलेल्या वार्ईट प्रसंगांमधील हा सर्वाधिक वाईट पद्धतीने झालेला अत्याचार आहे. ही सर्वात मोठी घटना आहे. मातंग समाज शिक्षणापासून दूर आहे. प्रथमेशला आर्थिक मदतकष्टकरी लोकांचा भरणा अधिक असलेल्या मातंग समाजातील मंडळींनी प्रथमेशसाठी आर्थिक मदत उभारणे सुरू केले. शुक्रवारी तीन हजार रुपये जमविण्यात आले. हा पहिला टप्पा प्रथमेशच्या वडिलांना पोहोचविला जाईल. याशिवाय प्रथमेशासाठी मदतनिधी उभारण्याचे काम सातत्याने सुरूच राहील, असे सभेत ठरविण्यात आले. वर्धा, चंद्रपुरातही निषेधप्रथमेशवरील अन्यायाविरुद्ध धामणगावात उभारलेल्या लढ्याचे लोण आता विदर्भात पोहोचू लागले आहे. चंद्रपूर आणि वर्धा येथे शानिवारी निषेध व्यक्त करून लहुजी शक्ती सेनेमार्फत प्रशासनाला आश्रमाच्या सीआयडी चौकशीच्या मागणीची निवेदने देण्यात येतील. चंद्रपुरातील कार्यकर्ते धामणगावातील सभेला उपस्थित होते. एसपींना निवेदनधामणगावात पार पडलेल्या सभेदरम्यान समाजाचा जो सूर उमटला, त्या अनुषंगाने शनिवारी जिल्हा पोलीस अधीक्षक लखमी गौतम यांना मातंग समाजाच्यावतीने अमरावतीत निवेदन सोपविले जाईल. धामणगाव तालुका आणि अमरावती तालुक्यातील सदस्यांची संख्या यावेळी अधिक असेल, अशी माहिती भुजाडणे यांनी दिली. १० लाखांची मदत द्याआश्रमाच्या सदोष व्यवस्थापनामुळे प्रथमेशचे प्राण पणाला लागले. प्रथमेशच्या ईलाजासाठीची सर्व व्यवस्था करणे आश्रमाचे कर्तव्यच आहे. त्याशिवाय प्रथमेशला १० लक्ष रुपयांची मदत करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.‘लोकमत’च्या अभिनंदनाचा ठरावमातंग समाज कायम दुर्लक्षित आहे. नेतेही आमच्या समाजाला न्याय देण्यासाठी सरसावत नाहीत. भयंकर प्रकार घडून शासन, प्रशासन, आश्रम व्यवस्थापनाने गंभीर दखल घेतली नाही. ‘लोकमत’ने या मुद्द्याला वाचा फोडली. यंत्रणा हलली. त्यासाठी ‘लोकमत’च्या अभिनंदनाचा ठराव पारित केला गेला.महिलाही आक्रमकअमरावती : हवे तसे वापरण्यासाठी आमची मुले नाहीत. शाळा, नोकऱ्या, अनुदान टिकविण्यासाठी आमच्या मुलांचा वापर करायचा आणि गरज संपली की, कोंबड्यांचा कापावा तसा गळा कापून संपविण्याचा प्रयत्न करायचा, हा कुठला न्याय? हा कुठला धर्म? हे कुठले अध्यात्म? असे जळजळीत सवाल भाषणांदरम्यान उपस्थित करण्यात आलेत. ज्या शंकरमहारांजांच्या आश्रमाच्या अखत्यारित ही शाळा आणि वसतिगृह चालविले जाते, त्या आश्रमात यापूर्वीही आक्षेपार्ह प्रकार घडले आहेत. एका मुलाला हात गमवावा लागला होता. पुण्यातील धनदांगड्या मंडळींना राजकीय इच्छापूर्तीसाठी हा आश्रम वापरण्यास सूट देण्यात आली होती. अतिरेक झाल्यानंतर त्यांना आश्रमात येण्यास मज्जाव करण्यात आला होता. श्रीमंतांना महत्त्व असलेल्या या आश्रमात असे अनेक आक्षेपार्ह प्रसंग घडले आहेत. शिक्षणाचा दर्जा राखण्याऐवजी अनुदानासाठी शाळा, वसतिगृह उघडण्यात आली आहेत. व्यवस्थापनाच्या नात्यागोत्यातील आणि परिचित मंडळी नोकरीवर आहे. एकूणच आश्रमाच्या नावाखाली सुरू असलेल्या शंकास्पद कारभाराची सीआयडीमार्फत चौकशी करावी, अशी जोरदार मागणी सभेत करण्यात आली. तसा ठरावही पारित करण्यात आला. यावेळी काहींनी काळ्या फिती लावून निषेध केला.अवघी सभा प्रथमेशच्या मुद्याभोवतीच फिरली. प्रचंड संताप व्यक्त केला गेला. अखेरपर्यंत लढण्याचा निर्धार झाला. विदर्भभर अनेक मशाली प्रज्ज्वलित होतील. वेळप्रसंगी आक्रमक आंदोलने छेडली जातील. - उमेश भुजाडणे, जिल्हा उपाध्यक्ष, लहुजी शक्तीसेना