शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

चुरशीची लढत, अपक्ष किरण सरनाईक विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 05:00 IST

४० तास निरंतर चाललेल्या मतमोजणी प्रक्रियेत पहिल्या पसंतिक्रमाच्या आणि दुसऱ्या पसंतिक्रमाच्या मतगणनेच्या एकूण २६ फेऱ्या पार पडल्या. २७ उमेदवारांसाठी एकूण ३०,९१८ मते मोजली गेली. यातील १०८९ अवैध आणि २९,८२९ मते वैध ठरली. प्रथम पसंतिक्रमाच्या फेरीत १४,९१६ मतांचा ‘क्वालिफाइंग कोटा’ (विजयासाठी आवश्यक मते) २७ पैकी एकाही उमेदवाराने पूर्ण केला नाही. त्यामुळे दुसऱ्या पसंतिक्रमाच्या मतांची मोजणी सुरू करण्यात आली.

ठळक मुद्देशिक्षक मतदारसंघ; महाआघाडीचे श्रीकांत देशपांडे दुसऱ्या, अपक्ष शेखर भोयर तिसऱ्या स्थानी

  लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : उत्कंठावर्धक ठरलेल्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार किरण सरनाईक यांनी अनपेक्षित विजय संपादन करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. मूळचे वाशिम जिल्ह्यातील सरनाईक यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार महाआघाडीचे श्रीकांत देशपांडे यांच्यापेक्षा ६४१५ मताधिक्य घेऊन विजय संपादन केला. श्रीकांत देशपांडे ९१९१ मते घेऊन दुसऱ्या स्थानी, तर अपक्ष उमेदवार शेखर भोयर ६४५४ मतांसह तिसऱ्या स्थानी आहेत. सरनाईक यांनी २६  व्या फेरीअखेर दुसऱ्या पसंतीच्या मतांचा ‘क्वॉलिफाईंग कोटा’ पूर्ण केला. ४० तास निरंतर चाललेल्या मतमोजणी प्रक्रियेत पहिल्या पसंतिक्रमाच्या आणि दुसऱ्या पसंतिक्रमाच्या मतगणनेच्या एकूण २६ फेऱ्या पार पडल्या. २७ उमेदवारांसाठी एकूण ३०,९१८ मते मोजली गेली. यातील १०८९ अवैध आणि २९,८२९ मते वैध ठरली. प्रथम पसंतिक्रमाच्या फेरीत १४,९१६ मतांचा ‘क्वालिफाइंग कोटा’ (विजयासाठी आवश्यक मते) २७ पैकी एकाही उमेदवाराने पूर्ण केला नाही. त्यामुळे दुसऱ्या पसंतिक्रमाच्या मतांची मोजणी सुरू करण्यात आली. या प्रक्रियेत सर्वाधिक कमी मते प्राप्त केलेले उमेदवार मतगणना प्रक्रियेतून बाद केले जातात. बाद उमेदवारांच्या मतपत्रिकेवरील दुसऱ्या क्रमांकाची मते ज्या इतर उमेदवाराच्या नावे असतील, त्या उमेदवाराच्या एकूण मतांमध्ये समाविष्ट केली जातात. या पद्धतीच्या फेरीला त्यामुळेच  ‘बाद फेरी’ असेही संबोधतात. २६ व्या बाद फेरीअंती किरण सरनाईक यांना १५६०६ इतकी मते मिळाली.  १४९९६ मतांचा क्वालिफाईंग कोटा त्यांनी पूर्ण केला. 

मेळाव्यांद्वारे शिक्षकांशी संपर्क साधणार - सरनाईक

विभागातील पाचही जिल्ह्यांत मेळाव्यांद्वारे शिक्षकांशी संपर्क साधणार. याशिवाय वैयक्तिक भेटदेखील घेणार. महाआघाडीच्या उमेदवाराचा पराभव झाल्याने या मतदारसंघात इतिहास घडल्याचे विजयी उमेदवार किरण सरनाईक म्हणाले. माणसाचा अंत पाहणारी ही मतमोजणीची प्रक्रिया आहे. अधिकृत घोषणेला कदाचित रात्रीचे २ ही वाजू शकतात. येत्या सहा वर्षांत प्रत्येक समस्येचा निपटारा करण्याचा प्रयत्न राहणार आहे. आपणा सर्वांकडून प्रेम, वात्सल्य व सूचना पाहिजे, असे सरनाईक म्हणाले.

रटाळ प्रक्रिया, ४० तासांवर वेळशिक्षक मतदारसंघाच्या मतमोजणीची प्रक्रिया ही ‘एकल संक्रमण’ पद्धतीने असते. ही क्लिष्ट व रटाळ प्रक्रिया असल्याची अनेक उमेदवारांची प्रतिक्रिया होती. गुरुवारी सकाळी ६ वाजता सुरू झालेली प्रक्रिया शुक्रवारी रात्री उशिरा किमान ४० तासांपर्यंत सुरू होती.

एकाच टेबलवर मतमोजणीनिवडणुकीत बाद फेरीतील उमेदवारांची मतमोजणीची प्रक्रिया ही एका हॉलमधील एकाच टेबलवर घेण्यात आली. त्यामुळे अन्य उमेदवारांच्या पसंतीच्या मतांची निश्चिती करण्याला वेळ लागला. यामुळेच मतमोजणीची संपूर्ण प्रक्रिया रेंगाळल्याचे दिसून आले.

पंधराव्या फेरीनंतर वाढविले कर्मचारी मतमोजणीसाठी एका टेबलवर एक मतदान अधिकारी व दोन सहायक अशी व्यवस्था करण्यात आलेली होती. मात्र, पंधराव्या फेरीनंतर बाद फेरीतल्या उमेदवारांची मतसंख्या जास्त असल्याने मतमोजणीला विलंब लागत असल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आल्याने या टेबलवर सहाय्यासाठी कर्मचारी संख्या वाढविण्यात आली.

विजय निश्चितीविषयी संभ्रमविजयासाठी १४९१६ मतांचा कोटा एकाही उमेदवाराला मिळत नसल्याने या पद्धतीविषयी एकवाक्यता नव्हती. अंतिम उमेदवार विजयी की २६ व्या उमेदवाराची दुसऱ्या पसंतीची मते मोजण्यात यावी, ती २७ व्या उमेदवाराच्या नावे जमा करण्यात येऊन विजयासाठी मतांचा कोटा मिळतो काय, याविषयी संभ्रम होता. 

बेरजेत भिन्नता, फेरमोजणीची मागणी२४ व्या फेरीनंतर श्रीकांत देशपांडे यांच्यापेक्षा नऊ मतांनी आघाडी होती. नवीन फेरीला अवकाश असल्याने प्रतिनिधी बाहेर आले. मात्र, नंतर १७० मतांनी माघारल्याचे सांगण्यात आले. हा प्रकार संशयास्पद असल्याने संगीता शिंदे यांच्या मतांची फेरमोजणी करण्याची मागणी शेखर भोयर यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे लेखी स्वरूपात केली. ही मागणी नाकारण्यात आली व लेखी देण्यात आले.

२० व्या फेरीमध्ये निर्णायक आघाडीपहिल्या पसंतीच्या २० व्या फेरीमध्ये नीलेश गावंडे या उमेदवाराची दुसऱ्या पसंतीची १०४२ मते अपक्ष उमेदवार किरण सरनाईक यांना मिळाली. ही आघाडी त्यांच्यासाठी निर्णायक ठरली. या फेरीनंतर अन्य उमेदवारांना मात्र मतांसाठी संघर्ष करावा लागल्याने चाहत्यांच्या चेहऱ्यावर ताण दिसून आला.

 

टॅग्स :Electionनिवडणूक