शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

अमरावतीमधील सर्वाधिक बँक खातेदारांचा चोरला डेटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2017 23:53 IST

आॅनलाईन लोकमतअमरावती : यु-ट्युबच्या माध्यमातून बनावट एटीएम बनविणाऱ्या टोळीने अमरावतीतील सर्वाधिक बँक खातेदारांचा डेटा चोरल्याची कबुली पोलिसांना दिली. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी प्रॉडक्शन वॉरन्टवर ताब्यात घेतलेल्या हरिदास हरविलास विस्वास (२९,रा. मलकानगिरी, ओडीशा), विशाल तुळशीराम उमरे (३४,रा. वरोरा, चंद्रपूर) व किसन लालचंद यादव (३०,रा. गाजीपुर, दिल्ली) या तिघांनाही न्यायालयाने ३ जानेवारी २०१८ पर्यंत ...

ठळक मुद्देबॅक खात्यातून परस्पर पैसे चोरीचे प्रकरण : तिन्ही आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी

आॅनलाईन लोकमतअमरावती : यु-ट्युबच्या माध्यमातून बनावट एटीएम बनविणाऱ्या टोळीने अमरावतीतील सर्वाधिक बँक खातेदारांचा डेटा चोरल्याची कबुली पोलिसांना दिली. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी प्रॉडक्शन वॉरन्टवर ताब्यात घेतलेल्या हरिदास हरविलास विस्वास (२९,रा. मलकानगिरी, ओडीशा), विशाल तुळशीराम उमरे (३४,रा. वरोरा, चंद्रपूर) व किसन लालचंद यादव (३०,रा. गाजीपुर, दिल्ली) या तिघांनाही न्यायालयाने ३ जानेवारी २०१८ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.बँक खात्यातून परस्पर पैसे चोरणाऱ्या या टोळीतील मुख्य सूत्रधार हरिदास विस्वास याने त्याचा साथीदार विशाल उमरे याच्या माध्यमातून अमरावतीमधील बँक खातेदारांचा डेटा चोरला आहे. विशाल उमरे हा मे महिन्यात अमरावतीतील एका लॉजवर राहत होता. दररोज शहरातील विविध एटीएमची झडती घेत होता. ज्या ठिकाणी गर्दी अधिक आहे, त्या एटीएमवर रांगेमध्ये उभा राहरून खातेदाराच्या एटीएमवर लक्ष केंद्रित करून त्यावरील अंक स्मरणात ठेवून तत्काळ अंक विस्वासच्या मोबाईलवर पाठवित होता. एसबीआयची बडनेरा शाखा, शाम चौक स्थित मुख्य शाखा, राठीनगर व गाडगेनगरातील शाखेतून एटीएमधारकांची माहिती चोरल्याची कबुली विशालने पोलिसांना दिली.एटीएम, शॉपिंग मॉलमधील ग्राहकलक्ष्यविस्वासचे सहकारी एटीएम, शॉपिंग मॉल व अन्य आॅनलाईन खरेदीच्या ठिकाणी बँक खातेदारांचा डेटा चोरायचे. विशाल उमरे याच कामासाठी अमरावतीत आला आणि तो निर्मला लॉजवर राहिल्याची कबुली पोलिसांनी दिली. बँक खातेदारांच्या मागे उभे राहून शोल्डर रिडिंगचा फंडा वापरून तो नागरिकांच्या हातातील एटीएमवर लक्ष वेधायचा. त्यावरील १६ पैकी आठ अंक जवळपास सारखेच असायचे. त्यामुळे केवळ शेवटचे चार अंक मोबाईलवर टाईप करून ते लगेच विसवासला पाठवायचे. पैसे विड्रॉल करणाऱ्या खातेदार कोणता पिनकोड टाईप करतो. याकडे तो लक्ष ठेवायचा. ते चार अंक मेमोरीत ठेवून काही वेळानंतर तो पीनकोड विस्वासला पाठवायचे काम विशाल करीत होता. एका एटीएमचा अंक सांगण्यासाठी विस्वास विशालला ५०० रुपये द्यायचा, तर बँक खात्यात पैसे अधिक असेल, तर १० टक्के कमिशनसुद्धा देत होता.विस्वासचे बँक खाती गोठवलीविस्वासने शेकडोंच्या बँक खात्यावर डल्ला मारला. चंद्रपूर पोलिसांनी त्याच्याकडून ५६ हजारांची रोख जप्त केली. विसवासला या गोरखधंद्यातून ३० टक्के लाभ मिळायला, अन्य सर्व पैसे कमिशन व प्रवासी वाहतुकीवर तो करीत असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. यातून त्याने ६ लाखांची कमाई केल्याची कबुली दिली. ही रक्कम त्यापेक्षा मोठी असण्याची शक्यता आहे.नोटाबंदीच्या काळात मंदावला होता धंदाविस्वास हा २००९ मध्ये शिक्षणासाठी दिल्लीत गेला. भाड्याने खोली घेऊन तो बहिणीसह राहत होता. मात्र, कालातंराने त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून सायबर गुन्हेगारीत प्रवेश केला. मात्र, नोटाबंदीच्या काळात त्याचा धंदा मदावला होता, अशी कबुली त्याने पोलिसांना दिली.