शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
3
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
4
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
5
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
6
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
7
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
8
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
9
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
10
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

चॉकलेटी घातक मेनाच्या कोटिंगचे सफरचंद विक्रीला

By admin | Updated: May 1, 2016 00:04 IST

जिल्ह्यात आंब्यांमध्ये व केळीमध्ये कॅल्शिअम कार्बाइडचा वापर करून लोकांना फळांद्वारे रोज मृत्यू विकले जात आहे.

फळांद्वारे मृत्यूची विक्री : आकर्षणासाठी व्हॅक्सचा वापरसंदीप मानकर अमरावतीजिल्ह्यात आंब्यांमध्ये व केळीमध्ये कॅल्शिअम कार्बाइडचा वापर करून लोकांना फळांद्वारे रोज मृत्यू विकले जात आहे. चवदार टरबूजातही लाल रंगाचे रासायनिक पदार्थ इंंजेक्शनने टाकून लोकांच्या जीविताशी रोज खेळ खेळल्या जात आहे. आरोग्याला पोषक असलेल्या सफरचंदमध्येही सहजतेने उपलब्ध होणाऱ्या चॉकलेटी मेनाचा कोटींग करून सफरचंदाद्वारा घराघरांत विष पोेहोचविण्याचा प्रकार फळविक्रेते करीत आहेत.विशेषत: या सफरचंदाला बाजारात मोठी मागणी असून हे फळ दोनशे ते तिनशे रुपये किलोने विकले जात आहे. लालसर काळे रंगाचे सफरचंद जादा दिवस टिकावे, ते खराब होऊ नये, यासाठी या ठिकाणाहून सफरचंदचा स्टॉक अमरावतीत येतो. तेथूनच चॉकलेटी रंगाचा मेनाचा सफरचंदवर कोटींग केले जाते. मात्र नागरिकांना कल्पनाही नसेल, अशा प्रकारे आरोग्याला अत्यंत हानीकारक असलेले हे सफरंदला लावलेले मेन अनेक आजार बळावतात. अमरावती शहरात येथील बाजार समितीत २५ ते ३० ठोक फळविक्रेते आहेत. शहराला फळांचा पुरवठा होतो. शनिवारी बाजार समितीत १० क्विंटलएवढी सफरचंदची आवक झाली आहे. यासफरचंदला सात ते पंधरा हजार एवढा क्विंटल मागे भाव मिळाला आहे. बाजारात अनेक प्रकारचे सफरचंद विक्रीस असून हे सफरचंद टवटवीत दिसण्यासाठी अनेक प्रकारची शक्कल फळविक्रेते लढवितात. यामध्ये फळांवर खाजगी दुकानातून आणलेले स्टिकर लावून ते फळ कुठल्याही दर्जाचे असले तरी यूएसए व इतर देशातून ही फळे आली असल्याचे त्या स्टिकरवर नमूद असते. नंतर सुरू होते ग्राहकांची लूट. फळे बेभाव विकून नागरिकांच्या जिवीताशीही खेळ खेळला जात आहे. यामध्ये बेस्ट क्वालिटी गार्डन फ्रुट, रोसेला , रेड चिप ४०१५ चिलन फ्रेस रेड बेलन्स यूएसए झेनाई, वोहींग फ्रेस फ्रुट असे विविध स्टिकर लावून ही फळे विकली जात आहे. मात्र फळांचा ट्रक आल्यानंतर या प्रजातींची फळे ठोक मध्ये जेव्हा माल येतो. तेव्हा लावली जातात की जेव्हा सफरचंद अमरावतीला आल्यानंतर लावली जातात याबदल प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे. अन्न प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या घातक सफरचंदाचे नमून घेतल्यास सत्य उघड होईल. काश्मीरमधून येतात सफरचंद काश्मीरातून सफरचंद येते. मात्र फळे विक्रेते स्थानिक पातळीवर स्टिकर लावून ते फळी विदेशातून आल्याचे सांगण्यात येते. दीर्घकाळ टिकावा म्हणून सफरचंदवर चॉकलेटी व्हॅक्स लावले जाते. रसायनिक प्रक्रियेतून तयार केलेले मेन आरोग्याला हानीकारक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. आरोग्याला पोषक असलेली फळे घातक सफरचंद मध्ये मानवी शरीराला आवश्यक असणारे सर्व घटक असल्यामुळे अनेक डॉक्टर रुग्णांना सफरचंद खाण्याचा सल्ला देतात. परंतु कृत्रिमरीत्या तयार करण्यात आलेल्या चॉकलेटी मेनाचा वापर करून ही फळे चमकवितात. त्यामुळे कर्करोगासारखे आजार रोज विकला जात आहे. सफरचंदमध्ये 'क' जीवनसत्वसफरचंदमध्ये 'क' जीवनसत्व असते. तसेच त्यामध्ये डी कॉम्प्लेस ग्रुप असते. हे आहारात घेतल्याने आयर्न (लोह) मिळते. यामुळे शरीरात रक्तवाढीस मदत होते, असे डॉक्टरांचे मत आहे. जर फळे खायची असेल तर गरम पाण्याने वरील लेप धुऊन, पुसून काढावे. नंतरच ती फळे खावी. हे आजार उदभवतात नियमित व्हॅक्स (मेन) लावलेली सफरचंद खाण्यात आल्यास रोगप्रतिकार शक्ती कमी होते. पोट दुखणे, लाहन मुलांची वाढ खुंटने व काही कालावधीनंतर कर्करोगही होण्याची संभावना असते, असे हद्य रोगतज्ज्ञ मनोज निचत यांनी सांगितले.