शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

६० कोटींतून साकारतोय चित्रा चौक ते नागपुरी गेट उड्डाणपूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 22:11 IST

येथील चित्रा चौक ते नागपुरी गेटपर्यंत उभारण्यात येत असलेल्या उड्डाणपूलाचे बांधकाम सुरू झाले असून, ६० कोटींच्या निधीतून सदर पूल साकारला जाणार आहे. कंत्राटदाराला या पुलाचे काम दोन वर्षात म्हणजे ३ जानेवारी २०२० पर्यंत करायचे आहे.

ठळक मुद्देपूलांचे काम सुरू : दोन वर्षांची मर्यादा

संदीप मानकर।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : येथील चित्रा चौक ते नागपुरी गेटपर्यंत उभारण्यात येत असलेल्या उड्डाणपूलाचे बांधकाम सुरू झाले असून, ६० कोटींच्या निधीतून सदर पूल साकारला जाणार आहे. कंत्राटदाराला या पुलाचे काम दोन वर्षात म्हणजे ३ जानेवारी २०२० पर्यंत करायचे आहे.आठ दिवसांपूर्वी उड्डाणपुलाच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात झाली. यामध्ये चित्रा चौकात पिल्लरच्या फाऊंडेशनचे काम होत आहे. यामध्ये चित्रा चौकातील नागपुरी गेटकडे असोरिया पेट्रोल पंपाजवळ उतरणाऱ्या उड्डाणपुलाची लांबी ८२० मीटर एवढी आहे. याच पुलावरून भातकुली मार्गावर उतरणारी लांबी ही १३० मीटर अशी एकूण लांबी ही ९५० मीटर एवढी आहे. याच टेंडरमध्ये मालवीय चौक ते नागपुरी गेट चौकापर्यंत पुलाखालील रस्त्याचे काँक्रीटीकरण, दोन्ही बाजूच्या नाल्या व त्यावर पेव्हर बसविण्याची कामे केली जातील. ही कामे चाफेकर कंस्ट्रक्शन कंपनीला मिळाले असून, केंद्रीय मार्ग निधीतून सदर कामे ही करण्यात येत आहे.चित्रा चौक ते नागपुरी गेट, चांदणी चौकापर्यंत नेहमीच वाहतुकीची कोंडी असते. इतवारा बाजारात तर दिवसभर जड वाहने जाण्यासाठी जागा नसते. त्यामुळे सदर मार्गावर उड्डाणपूल ही प्राथमिक गरज ठरली आहे. त्यामुळे आमदार सुनिल देशमुख यांच्या प्रयत्नाने व पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या सहकार्याने केंद्रीय मार्ग निधीतून या कामासाठी निधी मंजूर करून आणला आहे. दोन महिन्यांपूर्वीच सदर कामांचे भूमिपूजन हे करण्यात आले होते. या कामाची मुख्य अभियंता विवेक साळवे, कार्यकारी अभियंता सदानंद शेंडगे यांनी पाहणी केली आहे. उपअभियंता आशुतोष शिरभाते यांच्या नियंत्रणात उड्डाणपुलाचे बांधकाम कंत्राटदारामार्फत होत आहे.